काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ??
काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ??
महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ही योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली असून, या योजनेचा सर्वांना फायदा होणार आहे.या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू व्यक्तींच्या गंभीर आजारांवर मोफत इलाज केले जातील आणि त्यांना आर्थिक मदत देखिल केली जाईल.लेखात या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर तुम्हाला सर्व माहिती दिसेल. या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ऑनलाइन अर्ज कसा करावा ,योजनेसाठी निधी कसा मिळवायचा या संदर्भात सर्व काही माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 ऑनलाईन अर्जकसा करावा (Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana 2023 in Marathi)
योजनेचं नाव -मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना
सुरुवात कोणी केली?- देवेंद्र फडणवीस
कधि सुरू करण्यात आली? -2014 साली
लाभार्थी कोण?- महाराष्ट्रातील नागरिक
उद्देश्य काय? -महाराष्ट्रातील लोकांना उपचारासाठी अर्थिक मदत करणे
हेल्पलाईन क्रमांक कोणता?
02222025540/02222026948
अधिकृत वेबसाईट
'कोणती?
https://cmrf.maharashtra.gov.in/index.action
काय आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार गरीब आणि गरजू व्यक्तींच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार करणार आहे आणि त्यांना आर्थिक मदत देखीलल केली जाईल.मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून यकृत प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हृदय प्रत्यारोपण, कृत्रिम अवयव बसवणे आणि ICU मध्ये नवजात बालकांवर उपचार करण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कृत्रिम अवयव बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या 50 % किंवा 1 लाख रुपये , नवजात बालकांच्या ICU मध्ये उपचारासाठी एकूण खर्चाच्या 50 % किंवा 1 लाख रुपये या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल. 20,000 रुपये खर्च केल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 ,000 रुपये मिळतील आतापर्यंत केवळ पाच हजार रुपये मिळत होते. 20,000 ते 40,000 रुपये खर्च केल्यास 15,000 रुपये, 10,000 ते 1 लाख रुपये खर्च झाल्यास, 50,000 रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 % दिले जातील
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 उद्दिष्ट
आजही आपल्या महाराष्ट्र राज्यात असे अनेक लोक राहतात ज्यांच उत्पन्न कमी आहे.जर काही वैदकीय अडचण भासली तर बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणीमुळे योग्य ते इलाज मिळत नाहीत. गरीब आणि गरजू लोकांना
इलाजासाठी अर्थिक मदत करणे हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच मुख्य उद्देश आहे ज्यामुळे सर्वांना योग्य ते इलाज मिळतील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना फायदे
●महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना इलाजासाठी अर्थिक मदत होईल.
●20 हजार रुपये खर्च केल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत 10 हजार रुपये मिळतील.
●20,000 ते 40,000 रुपये खर्च केल्यास 15,000 रुपये मिळतील.
●10,000 ते 1 लाख रुपये खर्च झाल्यास, 50,000 रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 टक्के दिले जातील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 पात्रता
●केवळ महाराष्ट्र राज्यांतील नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात
●या योजनेसाठी अर्ज केल्यावरच योजनेचा फायदा मिळेल
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना 2023 कागदपत्र
●आधारकार्ड
●रेशन कार्ड
●उत्पनाच्या दाखला
●मोबाईल नंबर
●अपघात झाल्यास FIR
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना निधि मिळवण्याची प्रक्रिया
या योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या वेबसाइटवर म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वेबसाइटवर यावे लागेल.
●त्यानंतर तुम्हाला PROCESSER नावाचा पर्याय दिसेल तुम्हाला पर्यायावर क्लिक करावे लागेल.
●त्यानंतर, पहिल्या क्रमांकावर तुम्हाला , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
●त्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या चार प्रकारच्या सवलती तुम्हाला संपूर्ण माहितीसह दिसतील.
●प्रथम क्रमांकावर दिसत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सशुल्क उपचार उपलब्ध असतील.
●या योजनेत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जो काही समन्वय विकसित करायचा आहे तो रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी फोनवर संपर्क साधावा.
●दुसरे, धर्मादाय रुग्णालये आहेत जिथे तुम्हाला दरांवर मोफत सवलत मिळेल.
●तुमच्या जिल्ह्य़ात जे काही धर्मादाय रुग्णालय बांधले जाणार आहे त्यात खाटांच्या उपलब्धतेची माहिती तुमाला समाविष्ट दिसेल.
●तिसरे, तुम्हाला नॅशनल चिल्ड्रन अफोर्डेबल केअर प्रोग्राममध्ये मोफत उपचार देखील मिळतील.
●या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील रूग्णांवर मोफत उपचार केले जातील.