epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सामान्य ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामान्य ज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ मार्च, २०२२

मार्च २३, २०२२

सामान्यज्ञान प्रश्नावली

 


महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर -- मराठी

------------------------------

 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

उत्तर -- गंगापूर ( नाशिक )

------------------------------

महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले

-----------------------------

 महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?

उत्तर -- ७२० किलोमीटर

------------------------------

ज्ञानेंद्रिये किती आहेत ?

उत्तर -- पाच

------------------------------

 मुख्य दिशा किती ?*

उत्तर -- चार

------------------------------

 उपदिशा किती ?*

उत्तर -- चार

------------------------------

आठवड्याचे वार किती ?*

उत्तर -- सात

------------------------------

आपले राष्ट्रगीत कोणते ?*

उत्तर -- जनगणमन

------------------------------

 आपला राष्ट्रध्वज कोणता ?*

उत्तर -- तिरंगा

-----------------------------

 आपले राष्ट्रीय फूल कोणते ?*

उत्तर -- कमळ

------------------------------

आपले राष्ट्रीय फळ कोणते ?*

उत्तर -- आंबा

------------------------------

 आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?*

उत्तर -- मोर

------------------------------

आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?*

उत्तर -- वाघ

------------------------------

 आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?*

उत्तर -- हाॅकी

------------------------------

 इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?

उत्तर -- सात

------------------------------

पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- गरूड

------------------------------

प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- सिंह

------------------------------

 फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- गुलाब

------------------------------

 एका दिवसाचे किती तास असतात ?

उत्तर -- २४ तास

------------------------------

 एका वर्षात किती महिने असतात ?

उत्तर -- १२

--------------------------

 सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?

उत्तर -- पूर्व

------------------------------

 सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?

उत्तर -- पश्चिम

--------------------------------------------

 महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?

उत्तर -- मुंबई

------------------------------

 आपल्या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर -- दिल्ली

------------------------------

 आकाशाचा रंग कोणता आहे ?

उत्तर -- निळा

------------------------------

 हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?

उत्तर -- सोंड

------------------------------

 आईच्या आईला काय म्हणतात ?

उत्तर -- आजी

------------------------------ महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?

उत्तर -- जारूळ

------------------------------

 महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?

उत्तर -- कळसूबाई

-------------------------------------------

 महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?

उत्तर -- अरबी

------------------------------

 महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

उत्तर -- ३६

------------------------------

 कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?

उत्तर -- नारळ ( माड )

------------------------------

 महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?

उत्तर -- शेकरू ( मोठी खार )

------------------------------

महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर -- मराठी

-----------------------------

महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?

उत्तर -- नागपूर

------------------------------

गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

उत्तर -- त्र्यंबकेश्वर (नाशिक)

------------------------------

प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- सातारा

------------------------------

 कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर -- हिरवा

------------------------------

 महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?

उत्तर -- जायकवाडी

------------------------------

 भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते ?

उत्तर -- वड

------------------------------

 भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?

उत्तर -- रूपया

-----------------------------

 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ?

उत्तर -- हरियाल

------------------------------

मोराच्या डोक्यावर काय असते ?

उत्तर -- तुरा

------------------------------

ग्रहांना प्रकाश कोठून मिळतो ?

उत्तर -- सूर्यापासून

------------------------------

 पृथ्वीचा आकार कसा आहे ?

उत्तर -- गोल

-----------------------------

चंद्राच्या प्रकाशाला काय म्हणतात ?

उत्तर -- चांदणे

------------------------------

ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?

उत्तर -- पौर्णिमेची रात्र

------------------------------

 भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?

उत्तर -- बारा महिने

------------------------------

 ग्रेगरियन वर्षाचे महिने किती ?

उत्तर -- बारा महिने

------------------------------

आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?

उत्तर -- पृथ्वी

-----------------------------

पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?

उत्तर -- सूर्यापासून

------------------------------

 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?

उत्तर -- पृथ्वी

------------------------------

 पृथ्वीवर किती टक्के भूभाग आहे ?

उत्तर -- २९ %

------------------------------

पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे ?

उत्तर -- ७१ %

-----------------------------

 पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- पश्चिम

------------------------------

 दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

उत्तर -- उत्तर

------------------------------

 सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पूर्व

------------------------------

 सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?

उत्तर -- पश्चिम

------------------------------

 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात ?

उत्तर -- दिन

------------------------------

सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?

उत्तर -- रात्र

------------------------------

 दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो ?

उत्तर -- पूर्ण दिवस

------------------------------

 इंग्रजी वर्षाप्रमाणे ३१ दिवसांचे महिने किती ?

उत्तर -- सात

------------------------------

मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते ?

उत्तर -- चैत्र

------------------------------

 आंब्याच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- कोय

------------------------------

 फणसाच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- आठळी

------------------------------

कापसाच्या बीला काय म्हणतात ?

उत्तर -- सरकी

----------------------------

 चिंचेच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- चिंचोका

------------------------------

 कोणत्या फळापासून आमरस तयार होतो ?

उत्तर -- आंबा

------------------------------

कोंबड्याच्या डोक्यावर काय असते ?

उत्तर -- तुरा

------------------------------

चिंचेची चव कशी असते ?

उत्तर -- आंबट

------------------------------

आवळ्याची चव कशी असते ?

उत्तर -- तुरट

------------------------------

कारल्याची चव कशी असते ?

उत्तर -- कडू

------------------------------

 मीठाची चव कशी असते ?

उत्तर -- खारट

------------------------------

 साखरेची चव कशी असते ?

उत्तर -- गोड

------------------------------

 पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?

उत्तर -- वड

------------------------------

 झुरळाला पाय किती असतात ?

उत्तर -- सहा

------------------------------

 पोळा सणाला कोणत्या प्राण्याची पूजा करतात ?

उत्तर -- बैल

------------------------------

तबेल्यात कोणाला बांधतात ?

उत्तर -- घोडा

------------------------------

 सजीवांचे किती गट आहेत ?

उत्तर -- दोन

------------------------------

 सजीवांचे दोन गट कोणते ?

उत्तर -- प्राणी व वनस्पती

------------------------------

 कोळी किड्याला किती पाय असतात ?

उत्तर -- आठ

------------------------------

वनस्पतीची मुळे कोठे असतात ?

उत्तर -- जमिनीत

------------------------------

जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे ?

उत्तर -- गुलाबी

------------------------------

श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?

उत्तर -- आॅक्सिजन वायू

------------------------------

मेंदू कोठे असतो ?

उत्तर -- डोक्याच्या कवटीत

------------------------------

जिल्हयाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

उत्तर -- जिल्हा अधिकारी (कलेक्टर )

------------------------------

 भारतीय संविधान केव्हापासून लागू करण्यात आले ?

उत्तर -- २६ जानेवारी १९५०

------------------------------

भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील?

उत्तर -- केशरी, पांढरा, हिरवा

------------------------------

 नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर

------------------------------

 पन्हाळा गड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- कोल्हापूर

------------------------------

 रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- रायगड

------------------------------

बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- नंदुरबार

------------------------------

 शुन्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

उत्तर -- भारत

------------------------------

 २६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?

उत्तर -- प्रजासत्ताक दिन

------------------------------

१५ आॅगस्ट हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?

उत्तर -- स्वातंत्र्य दिन

------------------------------

 भारतीय राजमुद्रेखाली कोणते वचन आहे ?

उत्तर -- सत्यमेव जयते.

------------------------------

समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?

उत्तर -- खारट

------------------------------

 ' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ?

उत्तर -- दिल्ली

------------------------------

 ' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ?

उत्तर -- आग्रा

-----------------------------

' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत

------------------------------

' मेरी कोम ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- मुष्टियुध्द

------------------------------

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. राजेंद्रप्रसाद

------------------------------

 भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

उत्तर -- जवाहरलाल नेहरू

------------------------------

भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- राकेश शर्मा

-----------------------------

 भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

उत्तर -- सरदार पटेल

------------------------------

 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी

------------------------------

तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- नंदुरबार

------------------------------

 सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा

------------------------------

सर्वात मोठा पक्षी कोणता ?

उत्तर- शहामृग

------------------------------

 सर्वात जास्त बुध्दिमान प्राणी कोणता ?

उत्तर -- मनुष्य

------------------------------

 घोडे बांधतात त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर -- तबेला / पागा

------------------------------

 चार रस्ते एकत्र येतात, त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर -- चौक

------------------------------

जादुचे खेळ करणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- जादूगर

------------------------------

होडी चालवणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- नावाडी / नाखवा

------------------------------

 दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?

उत्तर -- शिलालेख

------------------------------

 डोंगर पोखरून आरपार गेलेल्या रस्त्यास काय म्हणतात ?

उत्तर -- बोगदा

---------------------------

सापाचा खेळ करून दाखविणा-याला काय म्हणतात ?

उत्तर -- गारूडी

------------------------------

 तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ?

उत्तर -- सजा

-----------------------------

 भारतामध्ये मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी मिळतो ?

उत्तर -- १८ वर्षे पूर्ण

------------------------------

 महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?

उत्तर -- १ मे १९६०

------------------------------

महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर -- ३६

------------------------------

 महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

उत्तर -- अरबी

------------------------------

समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?

उत्तर -- मीठ

---------------------------

 चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?

उत्तर -- अमावास्येची रात्र

------------------------------

विमाने जेथे थांबतात, त्या जागेस काय म्हणतात ?

उत्तर -- विमानतळ

------------------------------

एक डझनमध्ये किती वस्तू असतात ?

उत्तर -- १२

------------------------------------------

गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

उत्तर -- वासरू

======================

मार्च २३, २०२२

महाराष्ट्रातील किल्ले

  

                  सिंहगड किल्ला

सिंहगड हा भारतातील पुणे शहराच्या नैऋत्येस 35 किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
या किल्ल्यावर उपलब्ध असलेल्या काही माहितीवरून असे दिसून येते की हा किल्ला 2000 वर्षांपूर्वी बांधला गेला असावा.
कौंडिण्येश्वर मंदिरातील लेणी आणि कोरीव काम याचा पुरावा आहे.
तानाजीच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीने “गड आला, पण सिंह गेला” – “किल्ला जिंकला, पण सिंह गमावला” अशा शब्दांत पश्चात्ताप व्यक्त केला.
एकेकाळी विस्तीर्ण तटबंदीचे काही भाग भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यावर तानाजीचे स्मारक तसेच राजाराम प्रथम यांची समाधी आहे.

*****
               जीवधन किल्ला
जीवधन (किंवा जीवधन) हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघर या आधुनिक शहराजवळ 1 किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
समुद्रसपाटीपासून 1,145 मीटर (3,757 फूट) उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतराजीत आहे.
1815-1818 दरम्यान इंग्रजांनी वेढा घालून किल्ला लुटला आणि नष्ट केला.जीवधन हे ट्रेकिंग शौकिनांच्या ‘प्रसिद्ध 5’ ट्रेकिंग स्थळांचा एक भाग आहे. चावंड, हडसर, शिवनेरी आणि नाणेघाट ही फेमस ५ ट्रेकमधील इतर ठिकाणे आहेत.
किल्ल्याच्या वर काही अनपेक्षित भांडार आहेत जे योग्य सावधगिरीने शोधले जाऊ शकतात. माथ्यावर देवीचे मंदिर आहे. मेन गेट आणि कल्याण गेटची स्थिती चांगली आहे.
*****
                     पन्हाळा किल्ला

पन्हाळा किल्ला (पन्हाळगड, पन्हाल्ला (अक्षरशः “सापांचे घर”) म्हणूनही ओळखला जातो, हा भारतातील महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या वायव्येस 20 किलोमीटर अंतरावर पन्हाळा येथे आहे.
सह्याद्री पर्वत रांगेतील खिंडीकडे पाहताना हे सामरिकदृष्ट्या स्थित आहे, जो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील विजापूरपासून किनारपट्टीपर्यंतचा प्रमुख व्यापारी मार्ग होता.
त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे, हे दख्खनमधील मराठे, मुघल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक चकमकींचे केंद्र होते, त्यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे पावनखिंडची लढाई.येथे, कोल्हापूरच्या राणी, ताराबाई यांनी तिची सुरुवातीची वर्षे घालवली. किल्ल्याचे अनेक भाग आणि त्यातील वास्तू अजूनही शाबूत आहेत. आकाराने झिगझॅग असल्यामुळे त्याला ‘सापांचा किल्ला’ असेही म्हणतात.
1659 मध्ये, विजापूरचा सेनापती अफझलखानाच्या मृत्यूनंतर, त्यानंतरच्या गोंधळात शिवाजीने विजापूरकडून पन्हाळा घेतला.
********


                वासोटा किल्ला

वासोटा किल्ला (याला व्याघ्रगड (व्याघ्रगड) देखील म्हणतात) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे.
पंत प्रतिनिधीची शिक्षिका ताई तेलीन हिने किल्ला पकडला तेव्हा त्याचा बचाव केला होता.
वासोटा किल्ल्याचे श्रेय पन्हाळ्यातील कोल्हापूर शिलाहार प्रमुख भोज II (1178-1193) यांना दिले जाते
१६ व्या शतकात वासोटा नेहमीच मराठे, शिर्के आणि मोरे यांच्याकडे राहिला.1655 मध्ये जावळी जिंकताना शिवाजीने किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला. अवघड नैसर्गिक संरक्षणामुळे शिवाजीने किल्ल्याचे नाव बदलून “व्याघ्रगड” (व्याघरा – म्हणजे वाघ) ठेवले.
१८१८ मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर जोरदार तोफखान्याने बॉम्बफेक करून वासोट्यावरील अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या (चंडिका मंदिर, दारू-कोठार इ.) आणि ५ लाखांची मालमत्ता लुटली.
******
              हरिश्चंद्रगड किल्ला
हरिश्चंद्रगड हा भारतातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
त्याचा इतिहास माळशेज घाट, कोथळे गावाशी जोडलेला आहे आणि आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण करण्यात याने मोठी भूमिका बजावली आहे.
******
राजमाची किल्ला
राजमाची किल्ला (किल्ला) हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील (पश्चिम घाट) अनेक ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे.
यात श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन जुळे किल्ले असून, दोन बालेकिल्ल्यांच्या सभोवताली विस्तीर्ण माची (पठार) आहे.
उधेवाडी हे राजमाची किल्ल्याच्या मनरंजन बालेकिल्लाच्या दक्षिणेकडील पायथ्याशी असलेल्या माचीवर (२०११ च्या जनगणनेच्या अहवालानुसार) सुमारे ६० घरांचे छोटेसे गाव आहे.राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, (अ) लोणावळ्यापासून [५] आणि (ब) रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे किंवा कोंढाणे गावातून.
लोणावळा – राजमाची हे अंतर 15 किमी आहे आणि या वाटेवर काही चढ-उतार असले तरी ते जवळजवळ एक साधे पायवाट आहे.


            विसापूर किल्ला, माळवली

विसापूर किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील विसापूर गावाजवळील एक डोंगरी किल्ला आहे. हा लोहगड-विसापूर तटबंदीचा एक भाग आहे.
हे पुणे जिल्ह्य़ात माळवली रेल्वे स्थानकापासून ५ ते ६ किमी अंतरावर आहे, त्यापैकी ३ किमी खड्डा रस्ता आहे.
त्याची समुद्रसपाटीपासून 1084 मीटर उंची आहे. ते लोहगडाच्याच पठारावर बांधले आहे.
विसापूर किल्ला त्याच्या दुहेरी लोहगड किल्ल्यापेक्षा मोठा आणि उंचावर आहे.हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी 1713-1720 CE दरम्यान बांधले होते.
विसापूर किल्ला लोहगडापेक्षा खूप नंतर बांधला गेला पण दोन्ही किल्ल्यांचा इतिहास एकमेकांशी घट्ट जोडलेला आहे.


                रायगड किल्ला

रायगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महाड, रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. दख्खनच्या पठारावरील हा सर्वात मजबूत किल्ला आहे.
रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक केल्यावर त्यांनी रायगड किल्ल्याला आपली राजधानी केली, जे नंतर मराठा साम्राज्यात विकसित झाले, अखेरीस पश्चिम आणि मध्य भारताचा बराचसा भाग व्यापला.
रायगड किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आहे.



            राजगड किल्ला
राजगड (शाब्दिक अर्थ सत्ताधारी किल्ला) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला एक डोंगरी किल्ला आहे.
पूर्वी मुरुमदेव या नावाने ओळखला जाणारा, हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे 26 वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी होता.
त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलविण्यात आली.
तोरणा नावाच्या जवळच्या किल्ल्या वरून सापडलेला खजिना राजगड किल्ल्याला पूर्णपणे बांधण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी वापरला गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम प्रथम यांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांची राणी सईबाई यांचा मृत्यू, आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांचे परतणे, महादरवाजाच्या भिंतीमध्ये अफझलखानाचे शीर दफन करणे यासह अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये मुघल सेनापती जयसिंग पहिला, मुघल सेनापती याच्यासोबत पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांनी ठेवलेल्या 12 किल्ल्यांपैकी राजगड किल्ला देखील एक होता.


            लोहगड किल्ला
लोहगड (लोहगड) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अनेक डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे.
शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये ते ताब्यात घेतले, परंतु 1665 मध्ये पुरंदरच्या तहाने त्यांना ते मुघलांच्या स्वाधीन करण्यास भाग पाडले.
शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये किल्ला पुन्हा ताब्यात घेतला आणि त्याचा खजिना ठेवण्यासाठी वापरला.
लोहगड किल्ल्याचा उपयोग सुरतेतील लूट ठेवण्यासाठी होत असे.
पुढे पेशवेकाळात नाना फडणवीस यांनी या किल्ल्याचा काही काळ राहण्यासाठी वापर केला आणि किल्ल्यात एक मोठी टाकी, पायरी विहीर अशा अनेक वास्तू बांधल्या होत्या.
*****
शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ वसलेला 17 व्या शतकातील लष्करी तटबंदी आहे.
शिवनेरी किल्ला हे मराठा साम्राज्याचे सम्राट आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे.
शिवनेरी हा किल्ला शिवाजीचे वडील शहाजी राजे यांनी आपल्या मुलाला आणि पत्नी जिजामाता यांना आक्रमक आणि नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बांधला होता.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ल्यावर झाला (काही माहितीनुसार 1627) आणि त्यांचे बालपण तेथेच गेले.
किल्ल्याच्या आत शिवाई देवीला समर्पित एक लहान मंदिर आहे, ज्यांच्या नावावरून शिवाजी हे नाव पडले.1673 मध्ये इंग्रज प्रवासी फ्रेज याने किल्ल्याला भेट दिली आणि त्याला तो अजिंक्य वाटला.
त्याच्या नोंदीनुसार, किल्ल्यामध्ये इतकी सुविधा होती की सात वर्षे हजार कुटुंबांचे पोट भरण्यासाठी पुरेसा होता.
२०२१ मध्ये, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये “महाराष्ट्रातील मराठा मिलिटरी आर्किटेक्चरच्या” अनुक्रमांक नामांकनाचा भाग म्हणून समाविष्ट केले गेले.


                    जंजिरा किल्ला
मुरुड-जंजिरा हे भारतातील महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या किनारी शहराच्या अगदी जवळ एका बेटावर वसलेल्या एका प्रसिद्ध किल्ल्याचे आणि पर्यटन स्थळाचे स्थानिक नाव आहे.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा किनार्‍यावर राजापुरीकडे आहे आणि त्यापासून सुमारे 40 फूट (12 मीटर) अंतरावर असतानाच ते दिसू शकते. सुटकेसाठी खुल्या समुद्राकडे एक लहान पोस्टर्न गेट आहे.
या किल्ल्याचे विशेष आकर्षण म्हणजे कलालबांगडी, चावरी आणि लांडा कासम नावाच्या 3 अवाढव्य तोफा.
या तोफांना त्यांच्या शूटिंग रेंजची भीती वाटते असे म्हटले जाते. पश्चिमेला दुसरा दरवाजा समुद्राभिमुख आहे, त्याला ‘दर्या दरवाजा’ म्हणतात.घोसाळगड नावाचा आणखी एक किल्ला आहे, जो मुरुड-जंजिरा च्या पूर्वेला सुमारे ३२ किमी (२० मैल) डोंगराच्या माथ्यावर आहे, ज्याचा उपयोग जंजिऱ्याच्या राज्यकर्त्यांसाठी चौकी म्हणून केला जात होता.
मुरुड येथील जंजिऱ्याच्या नवाबांचा राजवाडा आजही सुस्थितीत आहे.
मुख्य गेटच्या बाजूला असलेल्या बाहेरील भिंतीवर, वाघासारखा पशू हत्तींना पंजे मारत असल्याचे चित्रण करणारे शिल्प आहे.


              प्रतापगड किल्ला
प्रतापगड म्हणजे ‘शौर्य किल्ला’ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेला एक मोठा डोंगरी किल्ला आहे.
1659 मध्ये झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. हा किल्ला आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी नीरा आणि कोयना नद्यांच्या काठाचे रक्षण करण्यासाठी आणि पार खिंडीचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, त्यांचे पंतप्रधान यांना दिली.
ते 1656 मध्ये पूर्ण झाले. शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यातील प्रतापगडाची लढाई या किल्ल्याच्या तटबंदीखाली 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली होती.
किल्ला खालचा किल्ला आणि वरचा किल्ला असे विभागता येतो.वरचा किल्ला टेकडीच्या शिखरावर बांधला होता. हे अंदाजे चौरस आहे, प्रत्येक बाजूला 180 मीटर लांब आहे.
देवाच्या महादेवाच्या मंदिरासह अनेक कायमस्वरूपी इमारती आहेत. हे किल्ल्याच्या वायव्येस स्थित आहे, आणि 250 मीटर पर्यंतच्या थेंबांनी वेढलेले आहे.
अफझल बुरूज किल्ल्यापासून व्यवस्थित पसरलेला आहे आणि किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाचे रक्षण करतो.
प्रतापगडाच्या लढाईनंतर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते आणि अफझलखानाचा मृतदेह बुरुजाखाली दबल्याचे सांगितले जाते.



                  सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला हा पश्चिम भारतातील महाराष्ट्राच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्रातील बेट व्यापलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.

हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता.

हा किल्ला महाराष्ट्राच्या कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या किनाऱ्यावर, मुंबईच्या दक्षिणेस ४५० किलोमीटर (२८० मैल) अंतरावर आहे.

परदेशी (इंग्रजी, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज) व्यापार्‍यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे आणि जंजिऱ्यातील सिद्धींचा उदय रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.1664 मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी बांधकामाची देखरेख केली. खुर्ते बेट म्हणून ओळखल्या जाणार्‍या छोट्या बेटावर हा किल्ला बांधला गेला.

हा किल्ला बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी 200 वडेरा लोकांना आणले.

कास्टिंगमध्ये 4,000 पौंडांपेक्षा जास्त शिसे वापरले गेले आणि पायाभरणी केली गेली.

25 नोव्हेंबर 1664 रोजी बांधकाम सुरू झाले. तीन वर्षांच्या कालावधीत (1664-1667) बांधलेला

सागरी किल्ला 48 एकरांवर पसरलेला आहे, दोन मैल (3 किमी) लांब तटबंदी आणि 30 फूट (9.1 मीटर) भिंती आहेत. ) उंच आणि 12 फूट (3.7 मीटर) जाड. भव्य भिंती शत्रूंना आणि अरबी समुद्राच्या लाटा आणि भरती-ओहोटींना प्रतिबंधक म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केल्या होत्या.



                  पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते

पुरंधरचा किल्ला पुण्याच्या आग्नेयेला ५० किमी अंतरावर पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून ४,४७२ फूट (१,३९० मीटर) उंचावर आहे.

पुरंदर आणि वज्रगड (किंवा रुद्रमाळ) हे दुहेरी किल्ले ज्यापैकी नंतरचे दोन किल्ले लहान आहेत, ते मुख्य किल्ल्याच्या पूर्वेला आहेत. या किल्ल्यावरून पुरंदर हे गाव पडले.1646 मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज, अजूनही त्यांच्या तारुण्यात, मराठा साम्राज्यासाठी त्यांच्या पहिल्या विजयांपैकी एकात, छापा टाकून किल्ल्यावर नियंत्रण स्थापित केले.
  


                  तोरणा किल्ला
तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात, हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित एक मोठा किल्ला आहे.
हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे कारण हा शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी काबीज केलेला पहिला किल्ला होता.
या टेकडीची समुद्रसपाटीपासून 1,403 मीटर (4,603 फूट) उंची आहे, ज्यामुळे हा जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे.
प्रचंडगड यावरून हे नाव आले आहे.अशा प्रकारे तो मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांपैकी एक बनलेला पहिला किल्ला बनला. शिवाजींनी ‘प्रचंडगड’ किल्ल्याचे तोरणा असे नामकरण केले आणि त्यामध्ये अनेक स्मारके व बुरुज बांधले.
तोरण्यावरून रायगड, लिंगाणा, राजगड, पुरंदर किल्ला, सिंहगड दिसतो.



              अंजनेरी किल्ला

नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेतील अंजनेरी हा किल्ला हनुमानाचे जन्मस्थान मानला जातो.

अंजनेरी हे नाशिकपासून त्र्यंबकरोडने २० किमी अंतरावर आहे.

हे स्थानिक नाशिककरांसाठी खास पावसाळ्यात प्रसिद्ध ट्रेकिंग स्पॉट बनले आहे.अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असून हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे.
रघुनाथराव पेशवे उर्फ   राघोबादादा यांनी वनवासात असताना या जागेचा उपयोग उन्हाळी माघार म्हणून केला होता.

रामशेज किल्ला

रामशेज किल्ला (रामशेज – रामाचा पलंग) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकच्या उत्तर-पश्चिमेस १० किलोमीटर (६.२ मैल) अंतरावर असलेला एक छोटासा किल्ला आहे.
असे मानले जाते की प्रभू राम श्रीलंकेला गेले तेव्हा त्यांनी किल्ल्यावर थोडा वेळ मुक्काम केला होता.
साडेसहा वर्षे चाललेल्या मुघल साम्राज्याविरुद्धच्या लढाईत रामसेज किल्ल्याचा वापर करण्यात आला.
किल्ल्याचे पहिले किल्लेदार (फोर्ट कमांडर) सूर्याजी जाधव होते, परंतु त्यांची साडेपाच वर्षांनी बदली झाली आणि मराठा साम्राज्याच्या रोटेशन धोरणानुसार लवकरच नवीन किल्लेदाराची नियुक्ती करण्यात आली.
१६८२ मध्ये औरंगजेबाने सहाबुद्दीन खानला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले.
शाहबुद्दीन खानने आपल्या 40,000 मनुष्य सेना आणि मजबूत तोफखानासह, काही तासांत किल्ला ताब्यात घेण्याचे वचन दिले, परंतु किल्ल्यातील 600 मराठा सैनिकांनी आपल्या चौक्या धरल्या आणि गोफणीच्या जोरदार रांगा लावून, गवताच्या ढिगाऱ्या पेटवून अनेक महिने सैन्याला मागे ढकलले.


                  शनिवार वाडा

शनिवार वाडा हा पेशव्यांचा 13 मजली वाडा 1736 साली बाजीराव-पहिला याने बांधला होता.

हे पेशव्यांच्या मुख्यालयात होते आणि ते पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ही रचना बांधण्यात आली होती.मुख्य प्रवेशद्वार ‘दिल्ली दरवाजा’ म्हणून ओळखला जातो आणि इतरांना गणेश, मस्तानी, जांभळ, खिडकी अशी नावे आहेत.
शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला बाजीरावांचा पुतळा. बाजूला गणेश महाल, रंगमहाल, आरसा महल, हस्ती_दंत महल, दिवाणखाना आणि कारंजे दिसतात.
हा राजवाडा पेशव्यांच्या सत्तेचे आसनस्थान होता आणि नंतर 1828 मध्ये आग लागून नष्ट झाला. या राजवाड्याला बळकटी देणार्‍या भिंती, भक्कम दरवाजे, अतिरिक्त संरक्षणासाठी स्पायकरने जडवलेल्या भिंती आहेत.



















रविवार, १६ जानेवारी, २०२२

जानेवारी १६, २०२२

सामान्य ज्ञान

 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास

👉 ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र

👉 ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास

👉 जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

👉 मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

👉 पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास

👉 क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास

👉 मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास

👉 न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास

👉 जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास

👉 सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास

👉  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास

👉 व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास

👉 सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

👉 हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास

👉 फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास

👉 मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास

👉 डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

👉 मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास

👉 इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधांचा अभ्यास

👉 हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या

👉 अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास

👉 अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र

👉 एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र

👉 एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🌊आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे🌊


▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

डिसेंबर १३, २०२१

सामान्य ज्ञान-12



एका शब्दात उत्तर सांगा ?

(१) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो  ?

उत्तर -- पूर्व


(२) पृथ्वीचा आकार कसा आहे ?

उत्तर  -- गोल


(३) आठवड्याचे दिवस किती ?

उत्तर --  सात


(४) एक वर्षाचे महिने किती  ?

उत्तर  -- बारा


(५) भारतीय सौर वर्षाचे महिने किती?

उत्तर :-- ‌बारा


(६) ग्रेगरियन  वर्षाचे महिने किती?

उत्तर  --   बारा


(७) मुख्य दिशा किती आहेत  ?

उत्तर --  चार


(८)  उपदिशा किती आहेत ?

उत्तर --  चार


(९)  मुख्य ऋतू किती आहेत ?

उत्तर --  तीन


(१०)  भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर  --  मोर


(११) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

उत्तर -- वाघ


(१२) नदीच्या काठांना काय म्हणतात ?

उत्तर -- तीर  


(१३) कोळी किड्याला किती पाय असतात ?

उत्तर --  आठ


(१४) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?

उत्तर --.  शहामृग


(१५) ज्ञान देणा-या अवयवांना काय म्हणतात ?

उत्तर --  ज्ञानेंद्रिये


(१६) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?

उत्तर  -- पाच


(१७) चवीचे प्रकार किती आहेत ?

उत्तर -- चार


शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

डिसेंबर १०, २०२१

सामान्य ज्ञान-11




वनस्पती सामान्यज्ञान प्रश्नावली

तुम्हांला माहीत असलेल्या वनस्पतींची नावे सांगा.

 १) कोणत्या वनस्पतींची आपण मुळे खातो ?

उत्तर --  गाजर ,  मुळा ,  बीट.

---------------------------------------------

*२) कोणत्या वनस्पतीचे आपण खोड खातो ?*

*उत्तर  --  ऊस,   बटाटा,  आले.* 

---------------------------------------------

*३) कोणत्या वनस्पतीची आपण पाने खातो ?*

*उत्तर  --  कोबी,   मेथी,  पालक.*

---------------------------------------------

*४) कोणत्या वनस्पतीची फळे आपण भाजी म्हणून खातो ?*

*उत्तर  --  टोमॅटो ,  भेंडी ,  भोपळा.*

---------------------------------------------

*५) कोणत्या वनस्पतीच्या आपण बिया खातो ?*

*उत्तर  -- वाटाणा,  तूर , हरभरा ,  मूग ,  वाल*

---------------------------------------------

*६) कोणत्या वनस्पतीची खोडे खडबडीत असतात ?*

*उत्तर -- वड,  पिंपळ , आंबा*

---------------------------------------------

*७) कोणत्या वनस्पतींची खोडे गुळगुळीत असतात ?*

*उत्तर -- कडुनिंब ,  निलगिरी, ‌ गुलमोहर,  पेरू*

-----------------------------------------------


*८) कोणत्या वनस्पतींची पाने खरखरीत असतात ?*

*उत्तर --  पारिजातक , बांबू  ,  सूर्यफूल.*

----------------------------------------------

*९) कोणत्या वनस्पतींची पाने गुळगुळीत असतात ?*

*उत्तर -- आंबा,  अळू,  पिंपळ ,  जास्वंद.*

----------------------------------------------

*१०) कोणत्या वनस्पतींच्या खोडांना काटे असतात ?*

*उत्तर -- गुलाब,  बोर , निवडुंग,  करवंद,  लिंबू.*

----------------------------------------------

*११) कोणत्या वनस्पती भक्कम खोडाच्या असतात ?*

*उत्तर  --  वड,  पिंपळ,  आंबा, चिंच, गुलमोहर.*

---------------------------------------------

*१२) कोणत्या वनस्पती आधाराने वाढतात  ?*

*उत्तर  --  कारल्याचा वेल,  भोपळ्याचा वेल,  द्राक्षाचा वेल , जाई.*

---------------------------------------------

*१३) कोणत्या वनस्पतींना शेंगा येतात  ?*

*उत्तर --- गवार,  शेवगा,  मटार ,  गुलमोहर, फरसबी*

-----------------------------------------------

*१४) कोणत्या फळात एक बी असते  ?*

*उत्तर -- आंबा,  आवळा , बोरे,  जांभूळ,  खजूर*

-----------------------------------------------

 *१५) कोणत्या फळात अनेक  बिया असतात ?*

*उत्तर -- कलिंगड,  सीताफळ ,  फणस , चिकू,  पेरू*

----------------------------------------------

*१६) कोणत्या वनस्पतींना रंगीत फुले येतात ?*

*उत्तर -- गुलाब , जास्वंदी,  झेंडू,  डेलिया,  सूर्याफूल*

.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

ऑक्टोबर २६, २०२१

सामान्य ज्ञान-10

सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे.



१) सजीवांचे दोन गट कोणते?

उत्तर - प्राणी आणि वनस्पती .


२) सजीवांना कशाची गरज असते?

उत्तर - अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश.


३) पाठीचा कणा असलेल्या सजीवांना काय म्हणतात ?

उत्तर  -  पृष्ठवंशीय सजीव उदा.(जलचर, पक्षीवर्ग,  सरपटणारे, सस्तन प्राणी.


४) पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना काय म्हणतात?

उत्तर  - अपृष्ठवंशीय सजीव- उदा.(गोगलगाय)


५) सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत ?

उत्तर  - वाढ, श्वसन, उत्सर्जन ,प्रजनन, चेतनाक्षमता ,हालचाल, ठराविक आयुर्मान ,पेशीमय रचना.*


६) वाढ होत नाही त्यांना काय म्हणतात ?

उत्तर  - निर्जीव


७) निर्जीवांना कशाची गरज नसते?

उत्तर - अन्न, पाणी ,हवा यांची गरज नसते,


८) सजीवांची वाढ होण्यासाठी कोणत्या घटकांची गरज असते?

उत्तर - निर्जिव


9)एकपेशीय सजीवांची  दोन नावे सांगा?

उत्तर  -  अमीबा , पॕरोमेशिअम


१०) बहुपेशीय सजीवांची नावे  सांगा?* 

उत्तर - मानव , वडाचे झाड , कांद्याचे रोप, गाय, उंदिर, झुरळ, हत्ती इत्यादी.


शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१