Breaking news

Tuesday, September 12, 2023

कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र Online Registration माहिती

कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र ऑनलाइन राजिस्ट्रेशन आणि माहिती


कुसुम योजना महाराष्ट्र 2023 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते ?

• अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा खरा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.


• ज्या शेतकऱ्यांना  वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.


• २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदानासाठी देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?


• पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.


शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर अधिक उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.


सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.


• शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.


पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः


●शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा पुरवला जातो


● शेतकऱ्यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.


● भूजल अतिरेक तपासणीची क्षमता शेतकऱ्यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.


● शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास महाडीबीटी फार्मर स्कीम महि मदत करतेकुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता


•अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.


• सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.


• अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.


• सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.


• जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकामाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.


• प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.


online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना कुसुम योजनेचे लाभार्थी -


• शेतकरी सहकारी संस्था शेतकऱ्यांचा गट


• जल ग्राहक संघटना शेतकरी उत्पादक संस्था


कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे.


• आधार कार्ड पासपोर्ट साईझ फोटो


• रेशन कार्ड नोंदणी प्रत


• प्राधिकरण पत्र जमीन प्रत


• चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत) मोबाइल नंबर


• बँक खाते विवरण


अटी-नियम व शर्ती
■मला माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत मला कोणत्याही सौर संयंत्र हस्तांतरण, विक्री, तांत्रिक बदल करण्याची परवानगी नाही याची मला जाणीव आहे.
■सौर पंपाची कोणतीही साधने चोरी / नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास घटना घडलेपासून मी प्रथम माहिती अहवाल 15 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस ठाण्यात दाखल करीन व महाऊर्जा कार्यालयाकडे अहवाल देण्याची जबाबदारी माझी राहिल.
■मुदतीत असा अहवाल दाखल न केल्यास कदाचित नुकसान भरपाई मिळू शकणार नाही याची मला चांगली जाणीव आहे.
■सौर पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. या निर्धारित कालावधीत सौर पंप नादुरूस्त झाल्यास सौर पंपाची दुरुस्ती व देखभाल ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे आणि ती विनामूल्य आहे.
“kusum mahaurja com”
■या कालावधीत पंप नादुरूस्त झाल्यास दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची जबाबदारी माझी आहे.
■मी या सौर पंपाच्या स्थापित रचनेमध्ये कोणतेही बदल करणार नाही, असे झाल्यास झालेल्या नुकसानीस मी जबाबदार राहील,
■काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सौर पंप बंद झाल्यास सौर पंपातील त्रुटीमुळे किंवा अशा अपयशामुळे शेती उत्पादनांच्या नुकसानीस महाऊर्जा कार्यालय जबाबदार असणार नाही.
■महावितरणकडून पारंपरिक वीज खरेदी बंधन (आरपीओ) अंतर्गत या सौर पंपाद्वारे निर्माण झालेली सौर उर्जा या बंधपूर्ततेसाठी वापरण्यास मी मान्यता देतो. वरील सर्व नियम व शर्ती माझ्या तसेच माझ्या वारसांवर बंधनकारक असतील.
■आज मी रोजी सौर पंपाचे मिळणेसाठी हे हमीपत्र राजीखुशीने देत आहे.
■वरील माहिती मला समजली असून / मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दबावा शिवाय ते मान्य करीत आहे.

No comments:

Post a Comment