17 जून-विज्ञान दिनविशेष
★१७ जून १७७३ : ब्रिटिश पदार्थविज्ञान व वैद्यकशास्त्रज्ञ थॉमस यंग यांचा जन्म. (मृत्यू: १० मे)
★१८०० : आयरिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम् पार्सन्स रॉसी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर)
★१८१४ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ राबर्ट ग्रँट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर)
★ १८३२ : ब्रिटिश पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रज्ञ सर विल्यम् क्रूक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल)
★१८६० : ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम हेन्री पर्किन यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर)
★१९२० : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच वैद्यकशास्त्रज्ञ फ्रैंकॉइस जेकॉब यांचा जन्म. यांना 'द जिनेटिक कंट्रोल ऑफ एन्साइम अॅण्ड व्हायरस सिंथेसिस' या संशोधन कार्याबद्दल १९६५ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. यांनी रेग्यूलर जिन्स चा शोध लावला. तसेच आरएनए आणि डीएनए संबंधी महत्त्वाचे संशोधन केले.
★१९४० : नोबेल पारितोषिक विजेते, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर आर्थर हार्डेन यांचे निधन. यांनी अल्कोहोलिक फरर्मेंटेशन आणि पाचकरस यासंबंधी मोलाचे संशोधन केले. यांना 'द इन्व्हेस्टिगेशन ऑन द फरमेंटेशन ऑफ ऑफ शुगर अॅण्ड फरमन्टिव्ह एन्झिम्स' या संशोधन कार्याबद्दल १९२९ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: १२ ऑक्टोबर)
★१९५० अमेरिकेचे डॉ आर एच लॉलेर यांचा किडनी-प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग यशस्वी.
★१९६७ चीनने पहिल्यांदा हायड्रोजन बाँबची चाचणी घेतली.
★१९६७ अमेरिकन स्कायलॅब-१ मधील अंतराळवीरांनी अंतराळात २४ दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा