epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

नोव्हेंबर २८, २०२२

संधीचा फायदा

                       संधीचा फायदा


एकदा, एका मंदिराच्या पुजार्‍याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्‍याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो.*

*तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल.*

*पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्‍याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्‍याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो.*

*थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही.*

*शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्‍याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो.* 

*शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.*

*तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही.*

*तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस.*पुजार्‍याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.*


*🧠तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.*

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

डिसेंबर ०४, २०२१

कष्टाचे फळ

                     कष्टाचे फळ



           एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.

   त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.

        दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले.

           त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले. गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’


बोध : कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.


शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर २५, २०२१

गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारा सन्मान

 गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारा सन्मान



        एकदा काही दुष्ट ब्राह्मण सल्लामसलत करून काशीच्या राजाकडे जाऊन तक्रार करायला लागले की, राजा महाराजांच्या या पवित्र विश्वनाथपुरी काशीमध्ये रघुराम या चर्मकाराचा मुलगा, रविदास मोठा अनर्थ करीत आहे. त्याच्याकडे पुष्कळ पैसा जमा झाल्यामुळे तो मोठा गर्विष्ठ झालेला आहे. त्याने चोराचे मंडळ तयार केलेले आहे आणि चोच्या करायला लावून श्रीमत होत आहेत. त्याने पक्के दोन मजली घर आणि एक सत्संग भवन तयार केलेले आहे. ज्यामध्ये गुरू बनून तो स्वत बसतो आणि वेदशास्त्र तसेच देव ब्राह्मणांची रात्रंदिवस निंदा करीत असतो. आणि त्यामध्येच चोराची पण बैठक होत असते. तो मोठा पाखेडी, ढोंगी आणि गर्विष्ठ आहे तो ब्राह्मणांच्या कधीच पाया पडत नाही. उष्टा प्रसाद वाटून सर्वांचा धर्म भ्रष्ट करीत आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांना फसवून आपले शिष्य बनविले आहे. त्याच्यामुळे धर्माचा नाश आणि ब्राम्हणाचा घोर अपमान होत आहे. आम्ही लोक निराश होऊन तुम्हाला विनती करीत आहोत. महाराज धर्म आणि गो ब्राह्मणांचे रक्षक आहेत. त्यांनी या दुष्ट चर्मकाराला योग्य तो दंड देऊन धर्माची रक्षा करावी. ही तक्रार ऐकून काशीच्या राजाने शिपाई पाठवून गुरु रविदासाना राजवाड्यात बोलाविले आणि त्यांच्या विरूध्दच्या तक्रारी सांगून त्याची बाजू मांडण्यास सांगितले. गुरु रविदासानी नम्रतेने आणि शांत चित्ताने निवेदन केले 'महाराज, ज्या लोकांनी आपल्याकडे माझ्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत, ते सगळे अत्यंत भयभीत आहेत. त्यांना भीती वाटते की, रविदासामुळे त्यांच्या धंद्याला नुकसान पोहचेल. "महाराज, एक गोष्ट सत्य आहे की, मी संग्रही, भोग परायण आणि मायामोहात आसक्ती असलेल्या लोकांना ब्राह्मण मानीत नाही. माझा विश्वास आहे की, जे राग द्वेषरहित आहेत, निष्पाप आणि निर्भयी आहेत, ते ब्राह्मण आहेत." "माझा विश्वास आहे की, ज्याचे मन निंदा शिव्या आणि मारल्याने विचलित होत नाही. क्षमा हीच ज्याचे महान बळ आहे, ज्याने काम, क्रोध, लोभ याना जिंकलेले आहे, जो सयमी आणि शीलवान आहे, तोच ब्राह्मण आहे. "महाराज, माझा विश्वास आहे की, जो कोणाशीही वैर ठेवत नाही. गंभीर, प्रज्ञावान, चागल्या आणि वाईट मार्गाचे ज्याला ज्ञान आहे, ज्याने कोणत्याही प्राण्याला दुःख दिले नाही, लोककल्याणच ज्याचे ध्येय आहे, तोच ब्राह्मण आहे. महाराज, माझा विश्वास आहे की, जो दान घेत नाही, जो दुसऱ्याच्या कीर्तने प्रसन्न आणि | दुसऱ्याच्या दु खाने दुःखी होतो, ज्याने इच्छा आणि तृष्णेला नष्ट करून टाकले आहे. ज्याचे कर्माचे बंधन तुटलेले आहे ज्याचे हृदय कोमल आणि प्रज्ञेने प्रकाशित आहे, जो मोहाला सोडून नेहमी ब्रह्म मध्ये विहार करतो. तोच ब्राह्मण आहे. महाराज, माझ्या येथे चोरांची बैठक होत असते आणि माझे सहकारी चोरी करतात, परंतु ते ज्ञान, शील, विवेक, संयम, करुणा, मैत्री, समता, क्षमा, इ. संपत्तीचे चोर आहेत. ते सोने, चांदी, पितळ, कपडे इ. भौतिक द्रव्याची चोरी करीत नाहीत. "महाराज, या सगळ्या सामान्य कर्माने माझ्या येथे समृद्धी आली आहे, राहण्यासाठी घर आणि सत्संगासाठी भवन बनलेले आहे महाराज, तुमच्यासारख्या ज्ञानी, धर्मज्ञ आणि नीतीपरायण राजाच्या छत्रछायेत, या विश्वनाथाच्या काशीमध्ये माझ्यासारख्या चर्मकारालासुद्धा तुम्ही आत्मविश्वासाने आचरण करण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. रामराज्यामध्येसुद्धा सामान्य जनतेला धर्माचे आचरण करण्याची अशाप्रकारची स्वतंत्रता नव्हती. देहासहित स्वर्गामध्ये जाण्याच्या इच्छेने तप करणाऱ्या बिचाऱ्या 'शुभका'चे डोके तो शूद्र होता म्हणून कापण्यात आले. महाराज, तुमचे शासन रामराज्यापेक्षा अधिक उदार आहे. ही तुमच्यासाठी महान गौरवाची बाब आहे. जसा तुम्हाला योग्य वाटेल तसा न्याय करा. गुरू रविदासांच्या या ज्ञान-गंभीर उत्तराने राजा अत्यंत प्रभावित झाला. त्याने मोठ्या आदराने गुरु रविदासाना आपल्या जवळील सिंहासनावर बसविले आणि त्यांचा मोठा सन्मान केला. राजसिंहासनावर बसण्याचा सन्मान मिळाल्यानंतर रविदास गर्विष्ठ बनले नाहीत, तर फळे लागलेल्या आंब्याच्या फांद्या प्रमाणे अधिक विनम्र झाले.

सप्टेंबर २५, २०२१

राजे शिवाजी

                 'राजे शिवाजी 



            (जन्म वैशाख शुध्द द्वितीया शके १५४९ (१९ फेब्रुवारी १६३०) - मृत्यू - ३ एप्रिल १६८०, दुपारचे बारा)- ज्यांचे ज्यांचे या भारतावर व भारतीय संस्कृतीवर प्रेम आहे, अशा व स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती शिवरायांची आज तारखेप्रमाणे जयंती आहे. जवळ जवळ साडेतीनशे वर्षांच्या त्या काळ्याकुट्ट कालखंडात धर्मवेड्या अशा परधर्मीय राज्यकर्त्यांनी व त्यांच्या हस्तकांनी इथल्या जनतेवर केलेल्या अत्याचारांची ती भयानक चित्र मन चक्षूसमोरून सरकू लागली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोव्याची पोर्तुगीजशाही आणि जंजिऱ्याची सिद्दिशाही अशा चार-पाच जुलमी राजवटींखाली एकदर जनता चिरडली-भरडली जात होती. देवळे पाडली जात होती, मूर्ती फोडल्या जात होत्या, बाटवाबाटवी शिगेला पोहोचली होती. लोकांची लुटालूट करून गावेच्या गावे बेचिराख केली जात होती आणि स्त्रियावर केल्या जाणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच उरली नव्हती. पण आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या बंधु-भगिनींवर असे पाशवी अत्याचार चालू असतानाही त्या वेळचे शूर, बुद्धिमान पण स्वत्व हरवून बसलेले बरेचसे मराठे त्या शाह्यांच्या सरदारक्या स्वीकारण्यात व त्याची राज्ये दृढमूल करण्यात भूषण मानीत होते. याला एकच ज्वलंत अपवाद निघाला तो म्हणजे शिवनेरीवर जिजामातेच्या उदरी सन १६३० शके १५४९ मध्ये जन्माला आलेला शिवबा! या शिवबाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, त्याच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांना सांगितले. 'यापुढे हे अत्याचार कायमचे थांबविण्यासाठी स्वराज्य स्थापन केले पाहिजे, तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी यापुढे आपण जिवाच रान केलं पाहिजे.' शिवरायांचा हा तेजस्वी संदेश ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगात वीरश्रीचे वारे सचारले. म्हणूनच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणागड घेतला आणि त्यानंतर शत्रूचे गडामागून गड व प्रदेशामागून प्रदेश जिंकून, त्यांनी स्वराज्याचा केवढातरी विस्तार केला. या झंझावाती वीराला मारण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून आलेला अवाढव्य अफझलखान हाच त्या वीराच्या बिचव्याला बळी पडला. मोगलातर्फे पुण्यास आलेला शाहिस्तेखान एका हाताची बोटे गमावून दिल्लीस परत गेला आणि कपटी औरंगजेबाने या वीरश्रेष्ठला बोलावून घेऊन आग्यास नजरकैदेत ठेवले असता, हा युक्तिबाज वीर आपल्या मुलासह मिठाईच्या पेटाऱ्यातून पसार झाला. महाराजांच्या अगी धाडस, चातुर्य, शौर्य, मुत्सद्देगिरी, गरिबांविषयी कणव, धर्मनिष्ठा, परधर्माच्या बाबतीत सहिष्णुता, मातृ पितृभक्ती, सताविषयी आदर, अन्यायाची चीड असे सर्वच सद्गुण त्याच्यात होते.

सप्टेंबर २५, २०२१

संत तुकाराम

                संत तुकाराम


            - संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे बालपण आई-वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली अतिशय मजेत गेल. रंगान सावळा असलेला तुका दिसायला अतिशय देखणा होता. तेज:पुंज होता. आईचा अतिशय लाडका होता. इंद्रायणीच्या डोहात डुंबायला त्याला खूप आवडायचे. मुलांबरोबर तो खूप खेळायचा. तुकारामाच्या बोलण्यात एका प्रकारचे लाघवीपण होते दिवसभर हुंदडणारा तुका उन्हे उतरायला लागली की, मग मात्र आईच्या भोवतीभोवती फिरत राहायचा. आई छोट्या तुक्याला संत ज्ञानेश्वरांची आणि संत नामदेवांची गोष्ट सांगायची, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचून दाखवायची, नामदेव महाराजांचे सहज सोपे अभंग पाठ करुन घ्यायची. रात्र कोंदाटू लागली की तुका आईच्या कुशीत झोपायचा.  झोपताना मात्र आई खूप वेळेला नामदेवासंबंधी सांगायची. म्हणायची, "बरे का तुका' आपला हा नामदेव तुझ्यासारखा छोटा असताना, पंढरपुरातल्या आपल्या घरासमोरच्या विठ्ठल मंदिरात नैवेद्याचे ताट घेऊन जायचा आणि साक्षात श्रीविठ्ठलाला घास भरवायचा. श्रीविठ्ठला बरोबर संवाद करायचा. त्याने खूप सुंदर अभंग लिहिले. तुकारामा, माझी इच्छा आहे की तू सुद्धा नामदेवासारखा विठ्ठलभक्त हो अभंग लिही. नामदेवाने ठरविले होते की, शतकोटी अभंग लिहिन म्हणून. त्याने विठ्ठलासमोर तशी प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा आता तू पूर्ण कर...' कनकाई म्हणजे तुकारामाची आई छोट्या तुकोबावर संत नामदेवांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचे संस्कार करायची. छोट्या तुकारामाला रोज अभंग पाठ करायला लावायची. त्याचा परिणाम असा | झाला की, छोटा तुका पहाटे उठून, इंद्रायणीच्या डोहात स्वच्छ आंघोळ करुन, विठ्ठल मंदिरात जाऊ लागला आणि नामदेव महाराजांचे अभंग अतिशय गोड आवाजात म्हणू लागला. कनकाई रोज पहाटे छोट्या तुकाबरोबर देवळात जायची. तुकारामावर त्यांच्या आईने अप्रतिम संस्कार केले.हळूहळू तुकाराम तरुण होऊ लागला. स्वतःच अभंग रचू लागला. तेव्हा कनकाईला खूप आनंद व्हायचा. तुकाराम महाराजांचे अभंग लोकांच्या जिभेवर आहेत. हे संत तुकोबाराय छत्रपती शिवरायांचे गुरु होत. मुलांनो या गोष्टीवरुन ध्यानात घ्यायची गोष्ट काय तर तुकाराम महाराजांसारखी आपण सुद्धा आईची इच्छा पूर्ण करावी. आपल्या प्रिय आईला  आपल्या कर्तृत्वाचा आनंद उपभोगायला द्यावा.

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर २४, २०२१

स्त्री पुरुष समानता

          स्त्री-पुरुष समानता 

              'माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष हे सारखेच महत्वाचे आहेत. दोघामध्ये अनेक गुण समान असतात आणि काही गुणविशेष. या विशेष गुणांचे कारण निसर्ग असतो आणि संस्कारही असतात ज्यावेळी विशेष गुणाचे आणि संस्काराचे प्राबल्य वाढते त्यावेळी माणसाच्या या दोन घटकापैकी एक सत्ताधारी बनतो व दुसऱ्या घटकास आपल्या अधिकाराखाली ठेवतो. ज्या समाजात अशा प्रकारे पुरूषाचा अधिकार चालतो तेथे पुरुषप्रधान संस्कृती जपली जात असते आणि डेथे स्त्रियांचा अधिकार चालतो तेथे स्त्रीप्रधान संस्कृती अस्तित्वात असते. जगात स्त्रीप्रधानता चालणारे मानवी समाज अपवादात्मक आढळतात, जसे ब्रह्मदेश, श्रीलंका व आपल्याकडील केरळ व आसाम ही राज्ये आहेत. सर्व मानवजात एक आहे. स्त्री आणि पुरूष हे समान दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद | होऊ शकत नाही. जीवनात व्यक्तिगत विकासाकरिता समानसधी, समान हक्क आणि समान अधिकार प्रत्येक व्यक्तिस मिळाला पाहिजे स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि | पुरूषानी अमुक कामे करावी, असा निर्बंध करणे शुध्द अन्याय व क्रूरपणा आहे. ज्याला जे काम साधेल त्याने ते करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाराचा अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुध्दिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे ज्या कामास जे पुरूष बुध्दिसामर्थ्याने योग्य नाहीत त्याच्याकडून ती कामे होत असल्यामुळे व स्त्रियांस ती करण्याची परवानगी नसल्यामुळे एकदरीत ती कामे व्हावी तशी होत नाहीत व तशी न झाल्यामुळे मनुष्यजातीच्या सुखास चट्टा बसत | आहे. हरएक शास्त्रात, कलेत व धंद्यात स्त्री-पुरुषाची चढाओढ लागून ज्याच्या त्याच्या-जिच्या तिच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे. शास्त्राभ्यास किंवा कुलाभ्यास करण्यास स्त्रिया असमर्थ असतील, तर त्या तशा ठरतील, पण अनुभवाने तसे ठरेतोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करणे हा शुध्द सुलतानी दाडगेपणा होय. अमेरिकेत मुलाप्रमाणे मुलींस वरिष्ठ शिक्षण देण्याचा उपक्रम केल्यापासून जे परिणाम घडून आले आहेत, त्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येईल की जी शास्त्रे व कला केवळ पुरुषासच सुसाध्य आहेत असे आपणास वाटत होते; ती शास्त्रे व त्या कला स्त्रियाना तितक्याच सुसाध्य आहेत. व शास्त्रकलांच्या अभ्यासामुळे स्त्रियाचेही नैसर्गिक चारूत्व कमी होऊन अपत्यसंगोपनाचे काम त्यांच्याने बरोबर वठेनासे होईल, अशी जी भीती होती ती केवळ निराधार होती. या दोन गोष्टी उत्तम रीतीने सिध्द झाल्या आहेत. अमुक कामे स्त्रियांनी करावी आणि अमुक पुरूषानी करावी असा आपल्या बुध्दीत सध्या जो आग्रह उत्पन्न होतो त्याचे बरेच कारण कामाची वाटणी करण्याचे काम आमच्या हाती आहे हे होय. ती बायकाच्या हाती असती तर त्यानीही अशीच एकदेशीय वाटणी करून आपणाकडे उंच कामे आणि आम्हाकडे हलकी कामे ठेवली असती । कोणत्याही विद्वान व विचारी स्त्रीचे मत घ्या ती कधीही असे म्हणणार नाही की, स्त्री-पुरूषाना एकच शिक्षण देण्यात स्त्रियाचे नुकसान आहे. हा स्त्री पुरूषांत चालत आलेला | बाद नाहीसा करण्याचा एकच उपाय आहे, तो हा की, मुलाना व मुलींना हव्या त्या शाळेत जाऊन हवे ते ज्ञान पाहिजे तितके संपादू द्यावे. सर्वांना समान संधी हा मूल्यशिक्षणाचा एक भाग आहे, आपल्या शाळेत स्त्री-पुरुष समानतेची भावना रूजविण्यासठी हे बदल घडवू या वर्गाचे प्रतिनिधित्व मुलीलाच द्या, वर्गाचे पटनोंदणी अनुक्रम लिहिताना, बाचताना मुलींचे नाव वर्णाक्षरानुसार बाचा, वर्गात त्याच्या प्रथम नावाने बोलवा, शाळेत प्रतिज्ञा, प्रार्थना मुलीच सांगतील, वर्ग हजेरीपट नेण्याचे काम मुलींना करू द्या शाळेत मुलींना पुढील रांगेमध्ये बसवा, सामुदायिक कवायतीचे नेतृत्व मुलींना करू द्या. मैदानी स्पर्धा, शालेय उपक्रमात मुलींचा | सहभाग असावा, शाळेतील कार्यक्रमात मुलींना प्राधान्य द्या, मुलींना समान संधी, समान दर्जा, समान वागणूक द्या.

सप्टेंबर २४, २०२१

बाबू राजेंद्रप्रसाद

           बाबू राजेंद्रप्रसाद 

             - सात्त्विक प्रवृत्तीचा पहिला राष्ट्रपती :- (जन्म ३ डिसेंबर १८८४ मृत्यू २८ फेब्रुवारी १९६३), हे १९३४ मध्ये बिहारमध्ये एक भीषण भूकंप झाला. हजारो माणसे जमीन दुभंगली. विहिरी आटल्या नद्या वाळूने भरल्या आणि डॉ. राजेंद्रप्रसाद लोकजीवन सावरण्यासाठी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह पुढे झाले तसे ते मुखी पडली. दावणीची गुरे जागीच मेली इमारती कोसळल्या. परे भुईसपाट झाली च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होते. १९११ मध्ये काँग्रेसचे सभासद झाले लोकसेवेचा वारसा त्यांना वडिलांपासून मिळाला होता. १९०६ | राजेंद्रबाबूंचा जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारमधल्या सारन जिल्ह्यातील जीरादेई गावी झाला. त्यांचे आजोबा हदवाचे दिवाण होते. वडील महादेव सहाय वैद्यकी करणारे लोकसेवक होते. बाबुर्जीचे प्राथमिक शिक्षण पारंपरिक पद्धतीने एका मौलवीकडे झाले. उर्दू-फारशी भाषेचे तज्ज्ञ झाले. १९०३ सालच्या कलकत्ता विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत २० हजार विद्यार्थ्यात ते पहिले आले. उच्च शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. १९०६ मध्ये बी. ए. १९०८ मध्ये एम. ए., १९०९ मध्ये एल. एल. बी. व १९१५ मध्ये एल. एल. एम झाले राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. प्रफुल्लचंद्र रे व डॉ. जगदीशचंद्र बोस हे त्यांच्या संपर्कात आले. हे दोघेही त्यांचे प्राध्यापक होते काही काळ राजेंद्रबाबूंनी मुजफ्फरपूर शहरातील भूमिहार महाविद्यालयात प्राध्यापकाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी १९११ साली कलकत्ता हायकोर्टात वकिली सुरू केली. कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोश मुखर्जी यांनी त्यांना विधी महाविद्यालयातील कायद्याचे अध्यापक नेमले, त्यांची वकिलीही उत्तम चालली होती. १९९७ साली त्यांनी म. गांधींना चंपारण्याच्या लढ्यात सोबत केली. नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर इंग्रज सरकारने जाचक निर्बंध लादले. शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली. गांधी बॅरिस्टर होते. त्यांनी लोकन्यायालय संघटना उभारली बाबूजी त्यात सामील झाले ते कायदेपंडित होते, भाषाप्रभू होते, लोकसंग्राहक होते. १९१९ साली रौलेट अॅक्टलाविरोध करणारे आंदोलन उभे राहिले. बाबूजी त्यात सहभागी झाले. १९२० साली असहकाराच्या आंदोलनात ते सामील | झाले. १९३० साली कायदेभंगाच्या चळवळीत ते पुढे झाले. १९३४ मध्ये बिहारच्या भूंकपात विधायक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते हिंदी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते होते. पाटण्याच्या हिंदी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले १९४२ साली स्वातंत्र्य आंदोलनाच्या चले जाव मोहिमेत इंग्रजांनी त्यांना अटक केले. २ सप्टेंबर १९४६ साली ते हंगामी मंत्रिमंडळात सामील झाले. २६ जानेवारी १९४९ साली घटना मंजूर होऊन ते घटनेनुसार पहिले राष्ट्रपती झाले. १९६२ साली त्यांनी स्वेच्छेने राष्ट्रपतिपद सोडले. ११ मे १९६२ ला त्यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे डॉ. राधाकृष्णन् यांच्या हाती दिली. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 'राजेंद्र युग मावळले !" असे उद्गार पंतप्रधान जवाहरलालजींनी सद्गदित होऊन काढले. देशाने एक युगान्त पाहिला.

सप्टेंबर २४, २०२१

संत मीराबाई

                संत मीराबाई 



(जन्म १४९९ मृत्यू २ मार्च १५४७ ) ' मीराबाई ही मेवाड या रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी हिचा जन्म इ.स १४९९ मध्ये झाला चितोडचा राजा राणा संग याचा वडीलपुत्र भोजराजा याच्याशी मीराबाईचा विवाह झाला मीराबाईचा युध्दात मारला गेला तेव्हापासून मीराबाई एखाद्या तपस्वी योगिनीसारखी राहू लागली बालपणापासून तिची श्रीकृष्णावर भक्ती होती श्रीकृष्ण तिचे अतिशयच प्रेम होते रात्रदिवस ती श्रीकृष्णाच्या चितनात मग्न राहत होती ती सत शिरोमणी गुरु रविदासाची शिष्य होती मीरा के प्रभु गिरीधर नागर, चरणकमल बलहारी रे मीरेचा प्रभू पर्वत उचलून धरणारा भगवान, त्याचे चरणकमल सर्व भय हरण करण्यास समर्थ आहेत. असे मीराबाई | विश्वासाने अनेक पद्यातून सांगते, मीराबाई चारचौघात उघड भजन करीत असे राजघराण्यातील पडदानशीन स्त्रीने असे वागणे तत्कालीन लोकाना | रूचले नाही. तिचा अतिशय छळ झाला. नव्या राजाने म्हणजे तिच्या दिराने आपल्या बहिणीबरोबर उदाबाईबरोबर मीराबाईकडे पेटाच्यातून स पाठवला मीराबाईने तो हसत हसत गळ्यात घातला, त्या सर्पाचा पुष्पहार बनला हे वर्तमान ऐकून नवा राजा चिडला. त्याने उदाबाईबरोबर विषाचा प्याला पाठवला भावाची आज्ञा मान्य करून उदाबाई मीराबाईकडे गेली, "वहिनी, नव्या राजाने तुला विष पाजण्यासाठी पाठविल आहे " |सांगताना उदाबाईचा कठ दाटून आला. 'उदाबाई, मला याचे किमपि दुःख वाटत नाही. मी माझा देह कृष्ण परमात्म्याला अर्पण केला आहे. असं अम म्हणून ती श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गेली. उदाबाईन दिलेला तो विषाचा प्याला श्रीकृष्णास नैवेद्य दाखवून प्राशन केला मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले, परंतु श्रीकृष्णाची मूर्ती हिरवीगार दिसू लागली. मीराबाईने श्रीकृष्णाची प्रार्थना केली, हे रूक्मिणीकाता, मी विष प्राशन केल्याने तुझा रंग पालटावा का ? कालिया सर्पाचे अतिभयकर विष तुला बाधले नाही आणि या विषाने तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला खूप दू ख झाले आहे. तू पूर्ववत होऊन मला लागलेली तळमळ दूर कर. "मीराबाईची प्रार्थना ऐकून ती मूर्ती पूर्ववत झाली. तो मूर्ती लहानपणी तिला एका साधूने दिली होती. मीराबाईचे सद्गुरू महात्मा रैदास, रविदास, रोहिदास या नावाने ओळखले जाणारे संत शिरोमणी संत रविदास होते. नव्या राजाने मीराबाईला काट्याची शेज पाठवली. रात्री मीराबाई झोपायला गेली तर ती फुलासारखी नरम झाली. तिच्या त्या दीराने मीराबाईला मारून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी तिचे रक्षण केले. श्रीकृष्णाशिवाय कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाशिवाय राहता येत नव्हते. श्रीकृष्णाची भक्ती तिला आनंदमय वाटत होती. सासरच्या लोकांनी दिलेला त्रास मीराबाईने भक्तीच्या जोरावर सहन केला. मीराबाई सासर सोडून | माहेरी आली. श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रमलेली मीराबाई नंतर वृंदावनात गेली. तिथे तिने साधू संतांच्या सहवासात राहून अनेक भक्तीपर पदे | रचिली साधू सताना तिने ती गाऊन दाखविली तिच्या पद्यरचनेमुळे तिला सतसाधुत्वाचा मान मिळाला. सत सूरदास यांची मीराबाईशी भेट झाली होती. सत तुलसीदास हे तिच्या समकालीन होते. सताच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्या चरणाना ती वंदन करीत होती. गिरीधारी श्रीकृष्णाच्या चरणी तिचे ध्यान लागले होते, त्या चरणाचा तिला रात्रंदिवस ध्यास लागला होता श्रीकृष्णप्रेमात वृंदावनी मीराबाई आली होती राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात कवयित्री द्वारकेत जाऊन राहिली १५४६ मध्ये तो श्रीकृष्णरूपात मिळून गेली.

सप्टेंबर २४, २०२१

शाल आणि श्रीफळ

        शाल आणि श्रीफळ 



         :' पुण्यात पेशव्यांच्या दरबारात एक मनुष्य गेला. तो हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तामीळ, तेलगू, बंगाली, उर्दू, सिंधी व मल्याळी अशा एकूण दहा भाषा सारख्याच सहजतेने व अस्खलित बोलू शके, तो पेशव्यांना म्हणाला, 'महाराज, आपल्या दरबारी असलेले नाना फडणीस यांची चातुर्याबद्दल ख्याती आहे, तेव्हा माझी मातृभाषा कोणती आहे, हे त्यांनी सांगावें' पेशव्यांनी नानाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहातच, नाना त्या बहुभाष्याला मुद्दाम म्हणाले, 'हे पाहा, सध्या माझ्यापुढं एवढी कामे आहेत की, तुमच्याकडे लक्ष द्यायला मला | वेळ नाही. तुम्ही दोन-तीन दिवस पेशव्यांचे पाहुणे म्हणून राहायला तयार असाल, तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन' त्या बहुभाषी पाहुण्यानं ती गोष्ट | मान्य करताच, नानांनी त्याची राहाण्या-जेवणाची व्यवस्था अतिशय चांगल्या ठेवण्याच्या सूचना सेवकांना दिल्या. पाहुणा आला, त्याच दिवशी रात्री नानाच्या सूचनेनुसार त्याला असं जड व चमचमीत जेवण वाढलं गेल, की जेवण होताच आणि मऊशार गाद्या गिरद्यात आडवे होताच, त्याला गाढ झोप लागली. ते पाहून त्याला येणाऱ्या भाषा जाणणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन, नाना त्याच्या खोलीत गेले आणि त्यांनी एका सेवकाला त्याच्या तोंडावर पाणी शिंपडायला सांगितले. पाण्याचा हाबकारा तोंडावर बसताच, गाढ झोपी गेलेल्या त्या पाहुण्याची झोप चाळवली जाऊन अर्धवट गुंगीत 'हे काय? हे काय? अशा अर्थी 'आ शृं! आशृं।' असं म्हणू लागला. त्या बरोबर त्याला चांगला जागा करून नाना म्हणाले, 'पाहुणे, तुमची मातृभाषा गुजराथी आहे. खरं की नाही नानांनी योजलेल्या युक्तीमुळे चकित झालेल्या त्या पाहुण्याने त्यांचे म्हणणे | दिलखुलासपणे मान्य केले आणि बरोबर आणलेली शाल व श्रीफळ त्यांना अर्पण करून, दुसऱ्या दिवशी तिथून प्रयाण केले. '

सप्टेंबर २४, २०२१

विद्येचा उपयोग

             विद्येचा उपयोग 



               एके काळी बोधिसत्व मृगकुळामध्ये जन्मला होता तो मृगविद्येत अत्यंत निपुण होता त्याला दोन ह होत्या त्या दोन्ही बहिणींनी त्याच्या दोन मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी बोधिसत्वाकडे पाठविले पण, त्यापैकी खारदिया नावाच्या बहिणीचा मुलगा बोधिसत्वान त्याला बोलावलं तरी त्याच्याजवळ आला नाही. मग बोधिसत्वानं त्याचा नाद सोडून दिला. पण, मा | बहिणीचा मुलगा त्रिपल्लत्थ हा मामानं नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे खारदियेचा मुलगा अभ्यासाच्या वेळी अरण्यात उनाडा करत भटकत असे. एके दिवशी पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला घाबरून तो मोठमोठ्यान ओरडू लागला. त्याच्या आईने त्याची ही अवस्था पाहिली ती धावतच बोधिसत्वाकडे आली नि म्हणाली, दादा, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या बाळाची सुटका का तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'खारदिया, तुझ्या मुलाला मी अनेकदा वेळेवर येण्यास सांगूनही तो माझ्याकडे आला नाही. त्याला उगाचच इकडे तिकड भटकण्याची, खोड्या करण्याची सवय लागली. आता पाशात अडकल्यावर त्याला सोडवायला जाण्यात काहीच अर्थ नाही. मी जर तिथे गेलो तर तो पारधी त्याच्याबरोबर मलाही ठार मारेल' खारदियाला वाईट वाटल ती रडत रडत मुलाला समजावयाला गेली, पण तिला मुलगा दिसलाच नाही. पारध्यान त्याला केव्हाच मारून नेलं होत. काही काळानंतर त्रिपल्लत्थ नेमका त्याच पारध्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा त्याची | आईही बोधिसत्वाकडे येऊन म्हणाली, 'दादा, मी तुझ्या मुलाला तुझ्याजवळ विद्या शिकायला ठेवलं पण, आज तो संकटात आहे. काहीही का पण, त्याला सोडव तेव्हा बोधिसत्व म्हणाला, 'तू काही काळजी करू नकोस. तो सर्व विद्या शिकला आहे. तो सर्व संकटातून स्वतःची | सुटका करेल' इकडे तो पारधी येण्यापूर्वी त्रिपल्लत्थने आपले पोट फुगवल डोळे वटारून नि हातपाय ताणून मेल्याच सोंग घेतल. थोड्या वेळान पारधी येऊन पाहतो तो याच्या तोंडातून फेस आलेला. त्यान याच्या पोटावर दोन-तीन टिचक्या मारल्या. त्याला वाटलं हा मेला त्याच मास लौका | शिजवलं पाहिजे. नाही तर सर्व श्रम वाया जातील म्हणून त्यानं त्याच्या भोवतीच जाळं काढून घेतलं मग मास काढण्यासाठी तो सरी साफ करू लागला तोच त्रिपल्लत्थ उठला. नि वेगान पळत सुटला. त्याला पाहून त्याच्या आईला खूप आनंद झाला.

सप्टेंबर २४, २०२१

कृतघ्न सिंह

                  कृतघ्न सिंह



             एका घनदाट जंगलात एक सिंह रहात होता. छोट्याछोट्या प्राण्यांची शिकार करून खात होता. एकदा काय झालं, सिंह जंगलात खूपखूप फिरला. पाणवठ्यावर मनसोक्त पाणी प्याला. निळ्याशार थंडगार पाण्यात त्याने एक डुबकी मारली व अंग शहारत काठावर आला. इतक्यात झाडावर लपलेल्या शिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी सूऽसूड करत मागच्या उजव्या पायातून आरपार गेली. सिंहानं रागानं एकच गर्जना केली. सारं जंगल हादरून गेलं. या अकल्पित घटनेनं सिंह घाबरून पळत सुटला. पायातून भळभळा रक्त गळत होते. कशीबशी त्यांने गुहा गाठली. गुहेत जाऊन सिंह आडवा झाला. त्याला खूप वेदना होत होत्या. सिंहाला ताप चढला. जखमी सिंह दोन-चार दिवस तसाच पडून होता. त्याचं जंगलात फिरणं बंद झालं होतं. अन्न पाणी मिळत नव्हतं, गुहेच्या जवळच एक लांडगा रहात होता. दररोज दिसणारा सिंह का बरं दिसत नाही म्हणून उत्सुकतेने त्याने गुहेत डोकावलं तर कण्हत पडलेला आजारी सिंह त्याला दिसला. लांडग्यान लांबूनच त्याची | विचारपूस केली. सिंहाने घडलेला प्रसंग सांगितला. लांडग्याला त्याची दया आली. सिंहाला मदत करण्याचे त्याने ठरविले. आपल्या शिकारीतला थोडा भाग तो सिंहाला देऊ लागला. सिंहाची सेवा करू लागला. सिंहाला बरे वाटले. त्याच्या पायाची जखम भरून आली. पाय बरा झाला. सिंह आणि लांडगा यांच्यात मैत्री झाली. दोघेही जंगलातून सोबतीनं फिरू लागले. दोघं मिळून शिकार करू लागले. सिंहाबरोबर फिरताना लांडग्याला खूप मजा वाटायची. जंगलाचा राजा त्याचा मित्र होता ना! काही दिवस मजेत गेले. पण एक दिवस काय झालं, जंगलात वणवा शिरला. सारं जंगल जळून खाक झालं. जंगलातले प्राणी मरून गेले. गुहेमुळे सिंह आणि लांडगा मात्र वाचले, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोघांनाही उपवास घडू लागला. शिकार काही मिळेना केवळ पाणी पिऊन दिवस काढणं जमेना. पोटात आग होऊ लागली तसा सिंह लांडग्यावर चिडू लागला. सिंहाच्या | मनातलं कपट लांडग्याच्या लक्षात आले. आता आपली धडगत नाही हे त्यानं ओळखलं. पण, फार उशीर झाला होता लांडग्यांने पळण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. सिंहानं लांडग्याचा खरपूस समाचार घेतला. म्हणून शत्रूला मदत अन् त्याच्याशी मैत्री कधीच करू नये.

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर २३, २०२१

सोनार सोने खाणारच

        सोनार सोने खाणारच 



          एकदा बादशहाला सोन्याचा हत्ती करून घेण्याची लहर आली. सोनार सोने चोरतात म्हणून त्यान बिरबलाला सांगून सोनारांना राजवाड्यातच कामाला बोलाविले ते दिवसभर राजवाड्यात काम करीत त्यांना सोने बरोबर मोजून व कस लावून दिल जाई. अखेर हत्ती तयार झाला त्याचे वजन केले गेले. ते अगदी बरोबर भरले एक दिवस ते सर्व सोनार बादशहाकडे आले आणि म्हणाले, 'महाराज आता आम्ही हा हत्ती नदीवर वाळूत नेऊन चांगला पॉलिश करून आणतो ' बादशहाने बिरबलाकडे पाहिले बिरबलानेही मान हलविली पहारेकऱ्यांच्या पहाऱ्यात सोन्याचा हत्ती नदीकिनारी नेण्यात आला. बिरबलाला मात्र चैन पडत नव्हती सोनार सोने चोरणार याची त्याला खात्री होती. पहारेकन्याच्या | वेषातच तो त्याच्याबरोबर बाहेर पडला आणि गुपचूप त्याच्यावर पहारा करू लागला इतर पहारेकऱ्यांना त्या सोनाराबी खाण्या-पिण्यात चांगलेच गुतविले होते ते बाजूला मजा मारीत होते. हळूच सोनारानी वाळू उरकली त्यातून दुसरा हत्ती बाहेर काढला आणि त्या जागी सोन्याचा हत्ती पुरून ठेवला हत्ती घेऊन ते दरबारात हजर झाले. चकचकीत हत्ती पाहून बादशहा खूश झाला. बिरबलाला त्याने त्यांची मजुरी द्यायला सांगितली बिरबल हसत म्हणाला, 'सोनार सोने चोरणारच ! आपण या कामातून किती सोने चोरलेत? सोनाराचा पुढारी म्हणाला, महाराज, हे कसं शक्य आहे. आपण आम्हाला सोनं मोजून दिल आम्ही तितक्याच वजनाचा हत्ती दिला. 'बिरबल शांतपणे म्हणाला, 'महाराज, यानी थोड सोन चोरलेल नाही. संपूर्ण हत्ती चोरलाय, सोन्याचा हत्ती वाळूत दडवून हा पितळेचा हत्ती घेऊन ते इथ आलेत हव असल्यास महाराजानी तज्ज्ञाकडून हत्तीची पारख करून घ्यावी सोनार घाबरले. त्यांनी गुन्हा कबूल केला. दिवसा राजवाड्यात काम केल्यानंतर रात्री सोनाराच्या घरी त्यानी पितळी हत्ती बनविला होता हुशार बिरबलामुळे चोरी पकडली गेली होती बादशहाने बिरबलाला इनाम दिले सोनारांना मात्र चांगली शिक्षा मिळाली.

सप्टेंबर २३, २०२१

इंद्र आणि लाकूडतोड्या

         इंद्र आणि लाकूडतोड्या



             - एक लाकूडतोड्या अरण्यात एक नदीकाठी असलेले एक झाड तोडीत असताना अचानक त्याची नदीत पडली. त्यामुळे तो दुःखी होऊन रडू लागला. त्याची ही अवस्था पाहून इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने लाकूडतोड्याला विचारले, 'अरे बाबा, तुला काय झाल ? तू का रडतोस ?' त्यावर लाकूडतोड्याने आपली कुन्हाड पाण्यात पडल्याचे इद्राला सांगितले. तेव्हा इंद्राने पाण्यात उडी मारली व एक सोन्याची कुऱ्हाड वर आणली आणि लाकूडतोड्याला विचारले, 'अरे, हीच का तुझी कुल्हाड?' तो म्हणाला, 'नाही, ही नाही माझी कुन्हाड नंतर पुन्हा इंद्राने पाण्यात उडी मारली व चांदीची कुन्हऱ्हाड आणली असता, आपली नाही, असे लाकूडतोड्याने सांगितले. मग तिसऱ्या वेळी इद्राने त्याची स्वत ची कुऱ्हाड त्याला आणून दिली. तेव्हा त्या लाकूडतोड्याला मोठा आनंद झाला आणि त्याने इंद्राचे फार आभार मानले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून इंद्रही संतुष्ट झाला आणि त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुन्हाडी त्याने त्याला बक्षीस दिल्या. वरील गोष्ट त्या लाकुडतोड्याच्या शेजाऱ्याला समजताच तोही नदीवर गेला व आपली कुल्हाड मुद्दाम पाण्यात टाकून नदीकाठी रडत बसला. ते रडणे ऐकूण पूर्वीप्रमाणे इंद्र त्या ठिकाणी आला व पाण्यात उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड त्याने वर आणली तेव्हा त्या माणसाला मोठा मोह झाला व तो म्हणाला, 'हो, हो! हीच माझी कुन्हाड' इतके बोलून इंद्राच्या हातातील कुन्हाड घेण्यास तो पुढे आला. तेव्हा त्याच्या लबाडपणाबद्दल इंद्राने त्याची निर्भर्त्सना केली व त्याला सोन्याची कुल्हाड तर दिली नाहीच, पण त्याची स्वत ची कुन्हाडही त्याला मिळाली नाही. तात्पर्य - साधेपणा व सचोटी हे दोन सद्गुण सर्वांना आवडतात व ते ज्याच्या अंगी असतील तोही सर्वांना प्रिय होतो, परंतु साधेपणा आणि सचोटी 1 याचा नुसता आव आणून जो लबाडी करायला जातो. त्याची मात्र शेवटी फजिती झाल्याशिवाय राहत नाही.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

सप्टेंबर २२, २०२१

मोहरम

                   'मोहरम'



              : महमद पैगंबराला हिरा पर्वतावर साक्षात्कार झाला. तो काळ फारच संकटाचा होता सामान्य जनता सत्ताधाऱ्याच्या जुलमामुळे हैराण झाली होती. हैराण झालेले लोक मनातून देवाचा धावा करीत होते. न्याय व नीतिमत्ता यांना दुष्ट लोकांचे ग्रहण लागले. तेव्हा बालून सामान्य जनांची सुटका करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो, अशी भावना होती. महमद पैगबराला साक्षात्कार झाला. परंतु तो स्वतःला परमेश्वराचा अवतार समजत नव्हता, तर प्रोषित समजत होता. त्याने ईश्वरावादाचा प्रचार केला. हळूहळू हा प्रचार वाढत गेला. विस्कळीत झालेला समाज एकत्र येऊ लागला. महमद पैगंबराला फातमा नावाची मुलगी होती. तिला हसन आणि हुसेन अशी दोन मुले होती. आपआपसातील वैराने प्रगती खुंटते हा विचार यतीज घराण्यातील लोकांना व हसन-हुसेन यांना पटत होता. म्हणून यतीज घराण्याने आपल्याला बोलावले आहे, असे समजून हसन-हुसेन कुफा नावाच्या गावी गेले. यतीज घराणे आपल्यात येत आहे, याचा आनंद दोघाच्या चेहऱ्यावर होता. कथाकथन - परंतु यतीज घराण्याचा हेतू चांगला नव्हता. त्यांना दगाबाजी करून त्या दोघांना मारावयाचे होते. त्यामुळे सात दिवस लढण्यात, मारामारी करण्यात गेले. ही लढाई बगदादमधील करबला मैदानावर झाली. यतीज घराणे मोठे पडल्यामुळे त्यांनी दोघांना पकडून ठेवले व काहीही खायलाप्यायला दिले नाही. आठवा दिवस तसाच गेला, नवव्या दिवशी हसन हुसेन नमाज पढण्यासाठी वाकले. त्याचा फायदा घेऊन, त्यांची हत्या केली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवव्या व दहाव्या दिवशी उपवास केला जातो. तेव्हा पाण्याचा थेंबही प्यायचा नसतो. हा उपवास सकाळी पाच वाजता सुरू होऊन संध्याकाळी सात वाजता संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन यांची प्रतिकृती बनवून संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन याची प्रतिकृती बनवून त्यांचे दफन केले जाते. (म्हणजे तलावात या प्रतिकृतीचे विसर्जन केले जाते) नंतर आघोळ वगैरे केली जाते. सात दिवस चालणाऱ्या लढाईत ह्या दोघांना पाणी व जेवणसुध्दा दिले नाही, म्हणून त्या दिवशी सर्वांना सरबत वाटले जाते. गोर-गरिबाना अन्नदान केले जाते यासंबंधी दतकथा अशी सांगितली जाते, की हसन हुसेन आपण शत्रूना दिसू नये म्हणून खड्ड्यात लपत, तेव्हा कोळी त्या खड्ड्यावर जाळे - विणीत. जेणे करून हे दोघे शत्रूच्या नजरेस पडणार नाहीत, परंतु सरडा हा प्राणी मात्र आपली मान हलवून हे येथेच लपले आहे, असे दर्शवी. तेव्हापासून सरड्याची मान सतत हलत असते. उत्तर प्रदेशात प्रतिकृती म्हणून 'ताजिया' बनविण्यात येतो. शिया लोक 'मातम' करतात. कारण या दोघांना मारण्यात आमचा हात नाही, आम्हाला माफ करा, असे म्हणून स्वत च्या शरीरावर इजा करून घेतात. या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात. बंधुभाव वाढवितात.

सप्टेंबर २२, २०२१

पापी व पुण्यवान

             'पापी व पुण्यवान



पांडव १२ वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून परत आले तेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी दुर्योधनाकडे केली. पाच पांडवांना निदान पाच गावे द्यावी, अशी कमीत कमी मागणी श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे करण्याचा अधिकार त्यांना दिला होता त्या शिष्टाईसाठी श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले तेव्हा त्यांनी राजा दुर्योधनाकडे मुक्काम करून त्यांच्याकडेच पंचपक्वानांचे भोजन घ्यावे, असे कौरवांनी त्यांना सुचविले, पण, श्रीकृष्णांनी त्याची विनंती अमान्य करून विदुराकडे मुक्काम करून त्यांच्याकडेच भोजन घ्यायचे ठरविले. विदुर हे महान विद्वान, राजकारणपटू व विरक्त सज्जन होते. दासीपुत्र होते, गरिबावस्थेत राहत होते. विदुरांनी श्रीकृष्णाचे मनापासून स्वागत केले आपल्या गरिबखान्यात (घरात) त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. श्रीकृष्णाला भोजनासाठी विदुरांनी आपल्या ऐपतीनुसार 'कण्या' शिजविल्या होत्या. कण्या म्हणजे गहू किंवा ज्वारीच्या भरड पिठाचा सांजा. त्या कण्या श्रीकृष्णाने आवडीने खाल्या. त्यांनी राजा दुर्योधनाच्या पंचपक्वान्नाला अव्हेरून साध्या कण्या खाल्ल्या. असे का केले श्रीकृष्णांनी ! कारण कौरवांचा राजा दुर्योधन हा महापापी, अन्यायी, दुष्कर्मा होता. त्याच्या राजवाड्यात राहून त्याच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे म्हणजे पाप्याला उत्तेजन देणे गरीब, दासीपुत्र विदुर हा पुण्यवान सज्जन होता. त्याच्या घरच्या साध्या कण्या खाणे पुण्यकर्म होते. दुष्टाच्या पाप्याच्या घरच अन्न पापमय असत अन् ते खाणाऱ्यालाही पापकृत्य करायला लावते. उलट पुण्यवान, संत, सज्जनांच्या घरचे साधे भोजन माणसाला पुण्यवान बनवते, सत्कृत्य करण्याचं सामर्थ्य प्रदान करते. गोष्ट ऐकल्यावर मी आईला विचारल, 'आई, पाप अन् पुण्य म्हणजे काय ? पापी कुणाला म्हणाव ? अन् पुण्यवान्, सज्जन कोण ?' आई म्हणाली, पापपुण्याची व्याख्या तुकाराम महाराजांनी अशी सांगितली आहे, 'परोपकार ते पुण्य पाप ते परपीडन' लोकांना सत्कर्मांत मदत करणे म्हणजे परोपकार, त्यालाच पुण्य म्हणतात आणि लोकांना जे छळतात, त्रास देतात, त्याची धनसंपत्ती जबरदस्तीने हिसकवून घेतात, अशी दृष्कृत्ये म्हणजे पाप करणारी माणस म्हणजे पापी माणस, अन् लोकांना अन्न-वस्त्र देणारी, संकटकाळी मदत करणारी, सत्कृत्ये करणारी माणस पुण्यवान, सज्जन माणस होत. पांडवाचे राज्य हिसकावून घेणारी, सती द्रौपदीची विटंबना करणारे, सज्जन पांडवांना त्रास देणारे, त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणारे कौरव पापी विदुर सज्जनांचा पक्ष घेणारा, न्यायी सल्ला देणारा, पांडवाचा म्हणजे सज्जनांचा पक्ष घेणारा, म्हणून तो पुण्यवान माणूस. आपण स्वत दुष्ट, पापी बनू नये. एवढेच नव्हे तर दुष्ट, पापी लोकांची संगतसुध्दा धरू नये. त्यांच्या कार्यात मदत करू नये, त्यांचा मानमरातब स्वीकारू नये. त्याच्या ऐश्वर्याचा लाभही घेऊ नये, हेच श्रीकृष्णांनी आपल्या वागणुकीत दाखवून दिले आहे.

सप्टेंबर २२, २०२१

संत गाडगे महाराज

               'संत गाडगे महाराज



      (जन्म २३ फेब्रुवारी १८७६, मृत्यू २० डिसेंबर १९५६) - कीर्तन व स्वत चे आदर्श आचरण या द्वारे बहुजन समाजातील मागासवर्गीयामधील अधश्रद्धा त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीची उदासीनता घालविण्यासाठी ज्यांनी आपले सर्व आयुष्य वेचलं त्या संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील कोतेगावी झाला. त्यांच मूळ नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकार व आईचे नाव सखूबाई. पण पुढे जनजागृतीसाठी ते गावोगावी कीर्तने करीत फिरू लागले. त्यावेळी ते अंगात सदैव गोधडीसारखा अंगरखा घालीत व हाती मातीचे गाडगे बाळगीत. म्हणून त्याना 'गोधडेबाबा' तर कुणी 'गाडगेबाबा' या नावाने संबोधत, परीट जातात जन्मलेल्या गाडगेबाबांचे लग्न १८९२ साली कुताबाईंशी झाले पण से संसारात विशेष रमले नाहीत. स्वत ला जरी शिक्षण बिलकूल घेता आले नाही, तरी प्रखर व चिकित्सक असल्यामुळे त्यांना भोवतालचा बहुजन समाज अज्ञान, अधश्रध्दा व व्यसने यात बुडून स्वत च स्वत ला बरबाद करून घेत असल्याचं कळून आलं आणि म्हणून या समाजाच्या उद्धारासाठी त्याच्यात कीर्तनाद्वारे जागृती करण्याचे त्यांनी ठरवले. ते आपल्या काही टाळकऱ्यासमवेत गावोगाव जाऊ लागले आणि देवापुढे बकरे व कोंबडे बळी देणे किंवा त्यांना दारूचे नैवद्य दाखवून मग ती दारू स्वत च घेणे, अस्पृश्यता मानणे, लाच खाणे, कज काढून थाटात लग्न करणे? शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे अशा गोष्टींवर आपल्या वारकरी पध्दतीच्या कीर्तनातून कडक टीका करू लागले. 'दगडाच्या देवा दह्याच्या घागरी । गरिबाच्या घरी ताक नाही।।' किंवा 'असा कसा तुमचा देव । कोंबड्याचा घेतो जीव ।' अशा तऱ्हेचे अधरूढींवर प्रहार करणारे अभंग-चरण गात, मधूनच श्रोत्यांना खोचक प्रश्न विचारून त्याची स्वत च उत्तरे देत तर अधुनमधून 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' असा गजर करीत. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर | गुजरात व कर्नाटकातील भोळ्या लोकांना सन्मार्ग दाखविला. पंढरपूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्री त्यांनी यात्रेकरूंना विनामूल्य राहता यावे, यासाठी धनिकाकडून देणग्या मिळवून सर्व सोयींनी सुसज्ज अशा मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. श्रीमताकडून येणारे पक्वान्नयुक्त जेवण ते गरिबांना देत व व स्वतः आपल्या मातीच्या गाडग्यात कुणा गरिबाकडून चटणी-भाकर मागून ती ते खात आयुष्यभर ते असेच वागले. सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थाना त्यानी आर्थिक मदत केली. नेहमीप्रमाणे कीर्तन करीत करीत असेच ते आपल्या टाळकऱ्यांसह चालले असता त्यांचे अमरावतीस निधन झाले. ● सुविचार -• देव हा मातीच्या मूर्तीत नसून तो माणसात पाहावा.

सप्टेंबर २२, २०२१

उजवा श्रेष्ठ की डावा?

             उजवा श्रेष्ठ की डावा? 



            भोज राजाच्या दरबारात विद्वान व गुणी लोकांचा खूप आदरसत्कार होत असे. राजाची गुणवत्ता व दानशूर प्रवृत्ती ऐकून दूरदूरचे विद्वान त्याच्या दरबारात येत असत. राजा भोज त्याची विद्वत्ता व गुण पाहून खूप मोठे पुरस्कार देत. त्यांच्या दरबारात एक खूप विद्वत्ता असलेले भद्रमणी नावाचे ब्राह्मण होते. ते नेहमीच कालीदासाचा सन्मान करीत व त्यांच्यावर खूप प्रेमही करीत. कधी कधी कवी कालीदास व भ्रजमणी यांच्यात वाद विवाद इतका मनोरंक व्हायचा की सर्व दरबारी व मंत्री त्यांची वाहवा करीत या वादविवादात बहुतेक कवी कालीदास हेच विजयी होत. त्या वेळी राजा भोज त्यांना खूप धनद्रव्य देत. एके दिवशी संध्याकाळी भोज आपल्या बागेत फिरायला निघाले. त्यांच्या डाव्या बाजूला भद्रमणी व उजव्या बाजूला कवी कालीदास चालत होते. राज्यकारभाराच्या गोष्टीमध्ये मधून मधून कवी कालीदास साहित्यिक गंमती-जमतीच्या संगत कविता म्हणून दाखवीत तेव्हा राज भोज ती ऐकून खूप आनंदित व्हायचा. ते पाहून भद्रमणीला खूप वाईट वाटायचे. भद्रमणीला असे वाटायचे की राजाला कविता ऐकवून कालीदास माझे महत्त्व राजासमोर कमी करीत आहे. जेव्हा त्याच्याकडून राहवले गेले नाही. तेव्हा तो राजा म्हणाला, 'महाराज, डावा हात नेहमीच शूरतेमध्ये पुढे असतो.' तेव्हा राजा भोज म्हणाला, 'ते कसे काय?" 'राजन, सर्वांत प्रथम डावा हात पुढे करून लढाईत शत्रूचे डोके धरले जाते. मग उजव्या हाताने तलवारीच्या साह्याने वार केला जातो.' भद्रमणी म्हणाला, 'ठीक आहे.', राजा म्हणाला, 'लढाईत ढालपण डाव्या हातात पकडली जाते, अशा प्रकारे शत्रूपासून आपले संरक्षण करण्यासाठी सर्वांत प्रथम डावा हातच पुढे होतो.' भद्रमणी म्हणाला. 'हेही ठीक आहे' राजा भोज म्हणाला. "आणि राजन धनुष्य बाणाचा उपयोग करण्यासाठीही डावा हातच कामी येतो,' भद्रमणी म्हणाला 'तुम्ही अगदी खरे सांगत आहात.' तेव्हा राजा भोजने भद्रणीकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले की 'हे सारे सांगण्याची गरज का भासली?" परंतु कवी कालीदास हे सरस्वतीचे कृपापात्र पुत्र होते. त्या वेळी भद्रमणी हे आपणास हलकट सिद्ध करू पाहत आहेत. ते राजाच्या उजव्या बाजूने चालत होते. ते लगेच म्हणाले, 'पंडित भद्रमणी हे योग्यच सांगत आहेत की, 'डावा हात लढाईत नेहमीच पुढे असतो, परंतु तो असतो तुच्छ!" "असे का?" राजाने विचारले तेव्हा कवी कालीदासने उत्सुकतेने सांगितले, 'महाराज, मात्र दान देतेवेळी तो नेहमीच मागे असतो. दान हे नेहमीच उजव्या हातानेच दिले जाते. ' राजा भोज कवी कालीदासाच्या या उत्तराने त्यांची वाहवा करू लागले कारण डाव्या हाताला शौर्यादी कार्यासाठीच बनविले आहे. म्हणून सत्कर्म किंवा दान देण्याचा अधिकार नाही. हे कवी कालीदासाचे उत्तर ऐकून पंडित भद्रमणी यांचे मस्तक लाजेने खाली झुकले. अशाप्रकारे कालीदासाने भद्रमणीला पुन्हा एकदा हरविले होते. तेव्हा राजा भोजाने खूप प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातील मुक्तामणी जडित किमती पुरस्कार म्हणून कवी कालीदासाला दिला.

सप्टेंबर २२, २०२१

वि. दा. सावरकर

             वि. दा. सावरकर



        (जन्म २८ मे १८८३ मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६) आघाडीचे क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक - वि दा सावरकर | आणि भाषाशुध्दी व लिपी शुद्धीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर हे नाशिकजवळील भगूर गावी जन्मले येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर श्वसूर रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांच्या साहाय्याने ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गेले आणि १९०५ साली बी. ए. झाल्यावर १९०६ साली ते श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे 'इंडिया हाऊस मध्ये राहून अभ्यास करीत असता ते १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयती वगैरसारखे राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने लंडनमध्ये पिस्तुलाने कर्झन वायलीचा खून केला. त्याबद्दलचा निषेध करणाच्या तिथल्या भारतीयांना त्यांनी उघड विरोध केला. त्यामुळे त्याच्या नावाचा इंग्लंडमध्ये गवगवा होऊन त्याचीही गणना क्रांतिकारकामध्ये केली जाऊ लागली व त्यांना बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली. इकडे नाशिकला त्याचे वडिलबंधू गणेशपत ऊर्फ बाबा यांना अभिनव भारताच्या मित्रमेळ्या'तील देशभक्तिपर गीताबद्दल १९०९ साली जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकला जॅक्सनचा खून झाला. या खून करणाऱ्या क्रांतिकारांना लडनवासी सावरकरांनीच पिस्तुल पुरविल्याचा छडा पोलिसाना लागला. त्यामुळे पॅरिसला गेलेले सावरकर लेडनला येताच त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक करण्यात आली व आगबोटीतून हिंदुस्थानात आणले जाऊ लागले. पण ती बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदरात धक्क्यापासून दूर उभी राहिली असता सावकरानी शौचकूपाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली व किनारा गाठला. पण, फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडून भारतीय पोलिसांच्या हवाली केले. हिंदुस्थानात आणल्यावर त्यांच्यावर खटले भरून त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांची अंदमानच्या कोठडीत रवानगी करण्यात येऊन त्याची व त्यांच्या सासऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अंदमानात चौदा वर्षे यमयातना भोगून झाल्यावर त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले आणि अलिपूर व येरवडा येथील तुरूंगात ठेवण्यात आले. दि. ६ जानेवारी १९२४ पासून त्यांना रत्नागिरीस स्थानबद्ध करण्यात आले. तिथे असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी सहभोजने सुरू केली आणि भागोजी कीर यांच्याकडून पतितपावनाचे मंदिर बांधून घेऊन ते अस्पृश्यांसाठी खुले ठेवले पुढे ते हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाले. त्याचे वाङ्मय मराठी साहित्याला भूषणभूत असून, त्यात वैचारिक निबंध, खडकाव्ये, आत्मचरित्र, कविता, नाटके आदींचा समावेश आहे. शेवटच्या आजारात अन्नत्याग करून त्यांनी जीवन संपविले.

सप्टेंबर २२, २०२१

मी आझाद आहे आणि आझादच राहीन

 मी आझाद आहे आणि आझादच राहीन 



     महात्मा गांधींनी सन १९२१ साली असहकाराची चळवळ सुरू केली. गावोगावी विदेशी मालावर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या अशांसारख्या कार्यक्रमांना ऊत आला चौदा वर्षाचा चंद्रशेखर त्या वेळी बनारस सरकारी संस्कृत विद्यालयावर निरोधन करायला गेला व तो पकडला जाऊन त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. खटल्याच्या वेळी न्या. मू. खारेघाट यांनी त्याला विचारले, "तुझे नाव काय?" "माझ नाव आझाद" "तुझ्या वडिलांचे नाव काय?" "माझ्या वडिलांचे नाव स्वातंत्र्य 'तुझ राहण्याचं ठिकाण? माझ राहण्याच ठिकाण इंग्रजांनी इथल्या देशभक्तांसाठी बांधलेला एखादा तुरुंग" चंद्रशेखरने सुनावणीच्या | दिलेल्या या उत्तरांनी चिडलेल्या न्यायमूर्तींनी तो वयाने लहान असल्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा न फर्मावता १५ फटक्यांची शिक्षा ठोठावली. लोकांना दहशत बसावी म्हणून पोलिसाने चंद्रशेखरला भर चौकात नग्न करून त्याच्या अंगावर चामडी वादीच्या चाबकाने फटक्यांमागून फटके द्यायला सुरुवात केली. पण जराही हायहूय वा अयाईग न करता तो बालवीर चाबकाच्या प्रत्येक फटकायासरशी 'भारतमाता की 'जय' व 'महात्मा गांधी की जय' असा उद्घोष करू लागला अखेर उघड्या अंगावर उठलेल्या रसरशीत वळांतून रक्त भळभळू मूर्च्छा येऊन रस्त्यावर कोसळला, पण कोसळता कोसळतानाही त्याच्या तोंडून अस्फुट घोष बाहेर पडला. 'भारत माता की जय" तेव्हापासून लोक त्याचे 'तिवारी' हे आडनाव विसरले व त्याला 'चंद्रशेखर आझाद या नावाने संबोधू लागले. पुढे असामान्य धाडस व कल्पकता यांच्या जोरावर तो लवकरच क्रांतिकारकांचा 'सेनापती' बनला. लागून चंद्रशेखर भारतीय लोक स्वातंत्र्याला कितपत लायक झाले आहेत हे पाहण्यासाठी सायमन ह्या इंग्रज अधिकान्याच्या आधिपत्याखाली केवळ काही इंग्रजांचेच एक शिष्टमंडळ हिंदुस्थानात आले होते. भारतीय काँग्रेसने त्यांच्यावर बहिष्कार घातला हे 'सायमन कमिशन' त्यावेळी अखंड भारतात असलेल्या लाहोरला गेले लाला लजपतराय यांनी त्या 'सायमन कमिशन'च्या निषेधार्थ दि. ३०-१०-१९२८ रोजी हजारो भारतीयांची एक मिरवणूक काढली. त्यावेळी स्कॉट व सँडर्स या इंग्लिश पोलिस अधिकाऱ्यांनी त्या मिरवणुकीतील निदर्शकावर असा बेछूट लाठीमार केला की, लाला लजपतराय तर रक्तबंबाळ झाले व त्यातच थोड्या दिवसांत वारले लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धदिनी सँडर्सला पिस्तुलाने ठार केले. त्या कटात चंद्रशेखर यांचा हात होता. सन १९२९ मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन याच्या मोटारीखाली बॉम्बस्फोट करून त्याला मारण्याचा जो प्रयत्न झाला त्याचेही सूत्रधार चंद्रशेखर होते सरकारला हे समजत होते; पण अटीतटीचे प्रयत्न करूनही सरकारला ते सापडत नव्हते. अखेर आपण क्रांतिकार्यात गुतल्यामुळे घराकडे दुर्लक्ष होऊन, आईची व पाठच्या भावंडाची होऊ लागलेली उपासमार आणि भरीस अनेक महिन्यांचे भाडे थकल्यामुळे घरमालकाने घरातले सामान बाहेर फेकून देण्याची दिलेली धमकी, या मुळे डळमळीत झालेल्या वीरभद्र या आझादांच्या सहकाऱ्याने ५००० रूपये बक्षीस मिळविण्याच्या मोहाने, ते अलाहबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये असल्याची खबर पोलिसांना दिली. लगेच इंग्रज पोलिस सुपरिटेंडंट नाट बॉबर हा ४० सशस्त्र पोलिसांनिशी मोटारगाड्यातून पार्कपाशी आला आणि त्याने व त्याच्या पोलिसांनी आझादांवर बंदुकांतून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला आझादांनीही पिस्तुलाने नाट बाँबर व विश्वेश्वरसिंह यांना जायबंदी केले; पण त्याच्यावर होणाऱ्या वर्षावाने त्यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊ लागले. स्वत जवळ एकच गोळी शिल्लक राहिल्याचे लक्षात येताच आझाद पोलिसाना म्हणाले, 'मला तुम्ही जिवंत पकडू शकणार नाही मी नावाने आझाद आहे आणि जिवात जीव असेपर्यंत मी आझाद म्हणजे स्वतंत्रच राहीन' आझाद असे म्हणाले आणि पिस्तुलातली एकमेव गोळी स्वतःच्या मस्तकात मारून घेऊन भूमीवर कायमचे कोसळले

सप्टेंबर २२, २०२१

समजूतदार मेनसिस

          समजूतदार मेनसिस' 



      चीनमधील एका खेड्यात मेनसिस नावाचा मुलगा राहत होता त्याचे आई वडील अगदी गरीब होते मेनसिस चार वर्षांचा असतानाच त्याचे वडील मरण पावले. आता मेनसिसच्या आईला खूप कष्ट करावे लागत होते. मेनसिस हाच तिचा एक आधार होता. आपला मुलगा शाळेत जावा, खूप शिकावा, मोठा व्हावा, त्याने नाव काढावे असे तिला वाटत असे. यासाठीच ती धडपडत होती. मोलमजुरी करीत होती. मेनसिस आता शाळेत जाऊ लागला. पहिल्यादा त्याला शाळा खूप आवडायची. अभ्यासाचीही गोडी वाटू लागली. हे पाहून त्याच्या आईला खूप आनंद होत असे. पण नंतर हळूहळू त्याला शाळेचा कटाळा येऊ लागला. अभ्यास नकोसा वाटू लागला. तो शाळा बुडवू लागला. शाळेला म्हणून जायचा व बाहेर कुठेतरी भटकत असायचा. आई त्याला सक्तीने शाळेत पाठवायची पण तो पाटी दप्तर शाळेतच टाकून घरी पळून यायचा. आईला काहीतरी खोटी खोटी कारणे सांगायचा मेनसिसचे हे वागणे बघून त्याच्या आईला खूप वाईट वाटायचे. एक दिवस मेनसिस असाच शाळा चुकवून घरी आला. घरात त्याची आई एक रेशमी कपडा शिवत होती. तो विकून तिला बरेच पैसे मिळणार होते. मेनसिस शाळा बुडवून घरी आला होता. त्याच्या आईच्या लक्षात आले. पण ती मेनसिसला काहीच बोलली नाही. तिने मेनसिसकडे एकदा पाहिले व तो रेशमी कपडा तिने टराटरा फाडून टाकला ती अतिशय निराश झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. हे पाहून मेनसिस चागलाच घाबरला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, 'आई, काय गं झाले? तू रडतेस का? हा कपडा को फाडलास ?' रडत असलेली मेनसिसची आई त्याला समजावीत म्हणाली. "बाळ मेनसिस, तू असा का बरे वागतोस? तू शाळा चुकवितोस, अभ्यास करीत नाहीस, खोटे बोलतोस यामुळे मला फार वाईट वाटते रे तू शिकला नाहीस तर उद्या तू मोठा झाल्यावर तुझे कसे होणार ? मी तुला जन्मभर पुरणार आहे का? तू चांगले शिक्षण घेतले नाहीस, तर तुला दोन वेळच्या अन्नासाठी ढोरासारखे राबावे लागेल. तुला जगात कुणी विचारणार नाही कुत्र्याचे जिणे जगावे लागले. तू खूप शिकावास, तू मोठा व्हावास म्हणून मी किती कष्ट करते? त्याचे तुला काहीच वाटत नाही. मी राब राब राबते आणि तू मात्र शाळा चुकवतोस, मग मी तरी कशाला करू हे कष्ट ?" आईच्या या बोलण्याचा मेनसिसच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. त्याला आपली चूक समजली त्याला आपल्या वागण्याचे फार वाईट वाटले. आईच्या पाया पडून त्याने तिची क्षमा मागितली. पुन्हा अशी चूक न करण्याची प्रतिज्ञा केली. त्या दिवसापासून त्याने कधीही शाळा चुकविली नाही. मन लावून त्याने अभ्यास केला. खूप शिकून मोठा झाला. पुढे तो चीनमधील एक थोर पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला