epranali

This is educational blog.

Res

Breaking news

आपले सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

नोव्हेंबर ०७, २०२२

रमजान

                          रमजान 

इस्लामी कालगणनेनुसार नववा चांद्रमास. याच रमजान महिन्यात पवित्र कुराणाचे अंशतः प्रकटीकरण होण्यास सुरुवात झाली. इस्लामी पंचकर्मविधानांपैकी रमजानचा  उपवास हे एक कर्मविधान होय. या महिन्यात उषःकालापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास  पाळण्याबद्दल स्पष्ट आदेश आहे.  रमजान 'उष्ण दगडा'ला म्हणतात. या  महिन्यास रमजान या कारणास्तव म्हणतात, की या महिन्यात पाप जळून जाते. या महिन्यात परलोकाची चिंता व उपदेशाच्या उष्णतेमुळे मने प्रभावित होतात; ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे वाळवंट व दगड गरम होऊन जातात,  नेमका त्याचप्रमाणे वरील प्रभाव होतो. रमजान शब्दाची व्युत्पत्ती 'रम्ज'या शब्दापासून झालेली आहे. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसास रम्ज म्हणतात. या महिन्याचे तीन खंड

(विभाग) आहेत : आरंभी कृपा-खंड, | मध्ये क्षमा-खंड आणि शेवटी मोक्ष खंड. या महिन्यात पावसाप्रमाणे | परमेश्वराची कृपा व क्षमेचा वर्षाव होत असतो आणि नरकाग्नीपासून सुटका होऊन मोक्षप्राप्ती होते. प्रेषित मूसा ला दिल्या गेलेल्या तौरेत वा तोरा नामक दैवी ग्रंथात रमजानला 'खत' असे संबोधिले गेले आहे आणि याचा अर्थ 'अपराध दूर सारणारा' असा आहे. प्रेषित ईसा (येशू ख्रिस्त) याच्या इंजील (बायबल) मध्ये 'ताब' म्हणून उल्लेख आहे. याचा अर्थ अपराधापासून शुचिर्भूत करणारा असा आहे. प्रेषित | दाऊदच्या जबूर (डेव्हिड्स साम्स) मध्ये 'कुर्बिया' अर्थात बरकत देणारा असा त्याचा अर्थ आहे. देवदास अपराधापासून शुद्ध होऊन त्याच्या बरकतीमुळे त्यास ईशसामिप्याचा लाभ होतो. एकूण एक दैवी ग्रंथ याच | महिन्यात अवतरितझालेले आहेत.

 रमजान सर्व महिन्यांत श्रेष्ठ महिना आहे. या महिन्याची एक रात्र हजार महिन्यांहून अधिक चांगली असते. या महिन्यातले महिनाभरचे उपवास ईश्वराने (अल्लाहने) अनिवार्य ठरविले आहेत. हा संयम पाळण्याचा महिना आहे आणि संयमाचा मोबदला स्वर्ग होय. हा सदाचरणाचाही महिना आहे. दिवसभर अन्न-जल वर्ज्य, धूम्रपान निषिद्ध, अभद्र भाषण टाळावयाचे व पवित्र कुराणपठणात निमग्न रहायचे इ. आचार सर्व मुस्लिम स्त्रीपुरुषांना | सारखेच बंधनकारक आहेत; मात्र गर्भवती वा तान्हे मूल असलेल्या वमासिक पाळीत असलेल्या स्त्रिया; रुग्ण व प्रवासी यांना मात्र या नियमांत थोडीफार सूट मिळू शकते. या महिन्याच्या सत्ताविसाव्या तारखेस 'लैलतुलकद्र' म्हणजेच मंगलप्रदात्र येते. सदरहू 'कद्र'ची रात्र पुण्यप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते. त्या रात्री आगामी वर्षाच्या प्रत्येक व्यवस्थेसाठी देवदूत हे आपल्या पालनकर्त्यांच्या आज्ञेने भूतलावर उतरतात. ती अभय व शांतीची रात्र पुण्य व समृद्धीसाठी अरुणोदयापर्यंत असते. ह्या पवित्र मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली. मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली जातात तसेच ह्या मासात श्रद्धेनेउपवास (रोजा) पाळणारास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांची परमेश्वर क्षमा करतो. या महिन्यात उर्मट सैतानास जखडून ठेवले जाते. 'रमजान' या अरबी शब्दातसमाविष्ट असलेल्या पाच  वर्णाक्षिरांवरून त्याचा महिमा पुढीलप्रमाणे स्पष्ट होतो : परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश यासर्व गोष्टींचा समावेशक म्हणजे पवित्र रमजान मास होय.



नोव्हेंबर ०७, २०२२

रामनवमी

                       रामनवमी 

राम... राम म्हणजे स्वतः आनंदात | रममाण असलेला आणि दुसयांना आनंदात रममाण करणारा. 'श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असा अयोध्येचा राजा श्रीराम हा दशरथ व त्याची प्रथम पत्नी कौसल्या यांचा पुत्र होता. चैत्र शुक्ल नवमीला, दुपारी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात श्रीरामाचा जन्म झाला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. लोक राम जन्मोत्सव धुमधडाक्यात | साजरा करतात. कारण, त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादित राहूनही पुरुष 'उत्तम' कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला 'मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या' जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून | आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरुषोत्तम' असे म्हटले जाते.  राम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाला तीन भाऊ होते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसऱ्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथे कधीही भांडणे होत नाहीत. रामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. राम वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत. ते नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले. तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेलेहोते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्व दर्शवतो. | राम आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी राम सुग्रीवाला तर रावणाला मारुन सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव रामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे खूप प्रेम होते. त्याला थोडेही दुःख झाले तरी रामाच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रूही असावा तर | रामासारखा असे लोक म्हणत असत. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्नी संस्कार करण्यास नकार दिला होता. 'मृत्यूबरोबर वैर संपत असते. म्हणून आपल्या भावाला अग्नीसंस्कार दे. 'तू जर हे काम करत तू नसेल तर मी करतो. रावण जसा तुझा भाऊ होता तसा माझाही होता.' असे तेव्हा रामाने बिभीषणाला सांगितलेहोते. | रामासारखा पती मिळावा, अशी प्रत्येक स्त्री कामना करत असते. | रामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती. त्या दृष्टीकोनातून रामाचा सीता त्याग | आत्म बलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाने बिभीषणाला दिले होते. परंतु, रामाला या राज्याचा मोह झाला नाही.मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा, त्यासाठी महर्षी वाल्मीकी यांनी राम चरित्र लिहले. 'सदगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम !' हे सर्व गुण स्वतः अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊन सर्वजण धन्य होतात. कारण, राम देव संस्कृतीचे संरक्षक होते. राक्षसी संस्कृतीचा नाश करणाऱ्यांना भारतीय जनता डोक्यावर घेऊन नाचते. सामान्य जनतेनेही | रामाला आपल्या हृदयात चिरंतन स्थान दिले आहे. ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.



नोव्हेंबर ०७, २०२२

श्रीकृष्णजयंती

                     श्रीकृष्णजयंती 

      श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता. हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच "काला" होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता. माधव, गोपाल, मुकुंद, मुरारी, मधुसादन, श्रीहरी. श्रीकृष्ण ई. अनेक नावांनी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण होय. ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून. कृष्णाच्या जन्माची कथा तसेच त्याचे संपूर्ण जीवन अदभूत आहे. रामायणाच्या काळात यमुना नदीच्या दक्षिण किना-यावर मधुबन नावाचा सुपीक प्रदेश होता. हा प्रदेश म्हणजेच मथुरा. या ठिकाणी रामाचा बंधू शत्रुघ्न याचे दीर्घकाल राज्य होते. त्यानंतर यादव घराण्याचे राज्य होते. वासुदेव या यादव घराण्यापैकी एक होय. गोपालन, दुधविक्री हा या यादवांचा मुख्य व्यवसाय होता. कृष्णाचे गोपाल हे नाव याच अर्थाचे आहे. 'गो' म्हणजे गाय. गाईचे पालन करणारा तो गोपाल, असा त्यचा अर्थ आहे. तसेच तेथे शूरसेन राजा होता. कंस व देवकी ही शूरसेनाची मुले होती. देवकीचे वासुदेवाबरोबर लग्न झाले होते. देवकीच्या मुलांच्या हातूनच तुज मृत्यु होणार आहे. असे भविष्य कंसाला सांगितले होते. म्हणूनच भीतीने कंसाने देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकले. देवकीचे प्रत्येक मुल जन्मल्याबरोबरच तो मारून टाकत होता. देवकीचे आठवे बाळ जन्माला येणार होते एक दिव्य तेज आपल्या उदरात शिरत आहे, असा दृष्टांत देवकीला झाला होता. आठव्या मुलाला मारण्यासाठी कंसाने तयारी केली होतीच. परंतु आठव्या महिन्यात देवकी प्रसूत झाली. रात्री बारा वाजता मुसळधार पाऊस पडत होता. पहारेकरी झोपेत होते. वासुदेव आणि देवकी यांनी हे मुल वाचवायचे ठरवले. वासुदेव यमुना नदी ओलांडून मथुरेला गेला. तेथे नंद हा त्याचा मित्र होता. त्याच्या घरी यशोदेला मुलगी झाली होती. वासुदेवाने आपला मुलगा तेथे ठेवला आणि नंदाची मुलगी घेऊन तो परत आला. कंसाने हि मुलगीहि मारण्याचा प्रयत्न केला; परंतु टी तेजाचे रूप घेऊन आकाशात गेली. कंसाला "तुझे मरण जवळ आले आहे" असे या शक्तीने सांगितले. इकडे कृष्ण नंदाच्या घटी वाढत होता. वासुदेवाच्या रोहिणी या दुस-या राणीचा मुलगा म्हणजे बलराम होय. श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते. ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते. भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर मानवी साखळी काढून रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरा रचून शाररीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी, प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

नोव्हेंबर ०६, २०२२

होळी

                          होळी 



पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरून प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वाऱ्याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे नारायणने रक्षण केले. नंतर नारायणनेच हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करून वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते. 

आपण साजया करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर  असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या  मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले  मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. या आनंदातच वाळलेली पाने आणि  लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे.

नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित  करण्याचीही प्रथा आहे. होळीचे |मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे.  लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे  मनोविकार लपलेले असतात. ते  समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आपले मन स्वच्छ व्हावे आणि स्नेहाचे एक नवे पर्व आपण दुसऱ्या दिवसापासून सुरु करावे. घरात भरभरून आलेल्या धान्यातूनच नैवेद्य होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जाते. निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा आदर्श. आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता, आंब्याला लगडलेल्या बाळकैया मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस आले आहेत असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग  दर्शवणारी असते.

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

ऑक्टोबर ३०, २०२२

दिवाळीतील पाच दिवसांचे महत्त्व व माहिती

 दिवाळीतील पाच दिवसांचे महत्त्व व माहिती


 दिवाळीतील ५ दिवसांचे महत्त्व

दिवाळीतील पाच दिवसांची माहिती

   दीपावली हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ दिव्यांच्या ओळी भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा प्रकाश अज्ञानावर अंधकार विजय म्हणून प्रतीत होतो. हो म्हणजे पूर्णतः आणि ज्या म्हणजे पूर्ण तेथून जन्माला आलेला म्हणूनच पूजा म्हणजे पूर्ण तेथून जन्माला आलेली ती पूजा आणि पूजा की याने परिपूर्णता व संस्कृती प्राप्त होते पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढविणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात.


धनत्रयोदशी :
                        दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते.
          धन व ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपारिक चिन्हाने सुशोभीत करून स्वागत केले जाते.
      तिचे दीर्घ प्रतिक्षेनंतरचे आगमन दर्शविण्यासाठी घरात कुंकवाने छोटी छोटी पदचिन्हे काढली जातात. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने ह्या दिवशी गृहिणी सोनं व चांदीची भांडी खरेदी करतात.
       भारतात कुठे कुठे पशुपक्ष्यांची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो.
     दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, "आपो दीपो भव:", म्हणजे तुम्ही स्वतःच प्रकाश रूप व्हा.
      सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत.
      पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारंतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही.
        त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्न चित्त व्हावे लागेल. जर एक सुद्धा नाराज राहील, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल.
     दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचारावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका तर सगळ्यांना तो गोडवा वाटा, दिवाळीचा सण आम्हा-तुम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा.


नरक चतुर्दशी :
                           दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.
      ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे.
    या सणाची एक पुरातन कथा आहे. असूरांचा राजा नरकासुर प्रागज्योती सपूर (नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती तिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या 16000 कन्यांना आपल्या अंत:पुरात कैद ठेवले.
    नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली. व अदितीची मूल्यवान कर्ण कुंडल परत प्राप्त केले.
    म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट वृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे.ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे.


लक्ष्मीपूजन :
                        दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्त्वाचा, लक्ष्मीपूजन.
  या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणी चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते.
   छोटे छोटे दिव्याणी सारे शहर उजळून टाकले जाते. आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारल्या जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वी तलावावर ब्रह्मण करून भरभराट व समृद्धीचा आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केल्या जाते, आणि घरी बनविलेल्या मिठाईचे सर्वांना वितरण केले जाते.
        हा अतिशय शुभ दिवस मानल्या जातो, कारण त्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.
दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा उल्लेख आहे.
    अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात. आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात, आम्हाला समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे.
        भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पुजले जाते.
      ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्राद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करूया.
      दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोक या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत ,
          सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या जाते. पण प्राचीन काळी लोक आपले सारे धन समोर पसरवून ठेवत, आणि समृद्धीचा आनंद घेत होते.
       केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारचे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाची नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडी-बुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकारचे धन आहे.        असे म्हणतात की याच दिवशी मानवतेला अमृताची देन मिळाली होती.
       तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा.
     जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबल मध्ये लिहिले आहे की "ज्याच्या जवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडून जे काही थोडेफार आहे ते ही हिसकावून घेतल्या जाईल,"
         प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात समृद्धीचा वास जागता ठेवावा, समृद्धी आपल्या आतून सुरू होते.मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ राहील.


गोवर्धन पूजा (बली प्रतिपदा) :
                 दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो.
     ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर अरुढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णांने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. अशी सांगता आहे.


भाऊबीज :
                   भाऊ बहिणीतील अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्याच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

ऑगस्ट ०२, २०२२

माझा आवडता सण नागपंचमी

 माझा आवडता सण नागपंचमी | my favourate festival Nagpanchami| majha aavadata san Nagpanchami




       श्रावण महिन्यातील सुरुवातीला येणाऱ्या सणांपैकी एक सण आहे .श्रावण महिना हा सर्व महिन्यातील महत्त्वाचा महिना आहे .श्रावण महिना हा श्रद्धेचा,भक्तिमय वातावरणात निर्माण होण्यास लाभदायक असा महिना आहे.या महिन्यात अनेकजण आपापल्या परीने महिन्यातील सण साजरे करत असतात .संपूर्ण महिना हा महत्त्वाचा आहे.कोणताही मुहूर्त बघत नाहीत तर सगळा महिना हा चांगला असतोच त्यामुळे ह्या महिन्याला पूजाअर्चा केली जाते .


 नागपंचमी हा श्रावणतील महत्त्वाचा आणि सुरुवातीचा सण आहे .या सणाची खूप दिवसापासून तयारी चालूच असते  .


 नागपंचमी हा सण स्त्रियांसाठी खास असतो .नवीन लग्न झालेल्या नववधू माहेरी जाऊन नागपंचमीला खेळण्याची उत्सुकता लागलेली असते.


नागपंचमीला लहान मुलींपासून मोठया स्त्रियांना उत्सुकता लागलेली असते .या सणाच्या अगोदर एक दिवस भावाचा उपवास म्हणून  स्त्रिया हा उपवास करतात आणि वारुळाला पुजायला जातात .त्याठिकाणी जाऊन नागाला दूध पाजण्यासाठी नेले जात असते .प्रत्यक्ष जरी नाग त्या ठिकाणी येऊन दूध पीत नसला तरीही वारुळात दूध सोडून महिला येत असतात .


 दिवसभर उपवास पकडून दुसऱ्या दिवशी महिला पुरणपोळी करुन हा उपवास सोडत असतात .


नागपंचमी आली की मोठया झाडांना झोके बांधले जातात .त्याठिकाणी लहानापासून मोठया महिला यांना झोका खेळण्याची  लगबग झालेली असते . 


 सकाळी उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी केली जाते . पुरणपोळ्या खाऊन दिवसभर झोका खेळून नटून थटून संध्याकाळी गावातील सगळ्या महिला ह्या एका ठिकाणी एकत्र येत असतात .त्याठिकाणी गाणी, फुगडी,झिम्मा असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जात असतात .


मुलांसाठी सुद्धा हा सण महत्त्वाचा असतो . काही भागात या दिवशी पतंग उडवली जाते तर काही भागात पतंग उडवत नाही . तरीही ज्या भागात उडवत असतात त्या भागात आठवडा भर अगोदरच मुले पतंगी उडवत असतात .


मोठ्या पुरुषांच्या दृष्टीने हा सण महत्त्वाचा असतो ,ज्यावेळी घरातील महिला खेळण्यासाठी गावात जमा होतात त्याचवेळी तसेच पुरुष सुद्धा कबड्डी,सुरपाट्या खेळत असतात .


 असा सण खूप आनंद देत असतो . नागपंचमीच्या शुभेच्छा