epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १७ जून, २०२४

16 जून-विज्ञान दिनविशेष

                16 जून-विज्ञान दिनविशेष


★१६ जून १८०१: जर्मन गणिती पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ ज्युलिअस प्लूकर यांचा जन्म (मृत्यू: २२ मे) 

★१८७८ इथरचा उपयोग करून शस्त्रकर्म करण्याची सुरवात करणारे अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ क्रार्फड विल्यमसन लाँग यांचे निधन (जन्म: १ नोव्हेंबर)

 ★१८९७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज विटिंग यांचा जन्म (मृत्यु २६ ऑगस्ट)

★१९०२ : वैद्यकशास्त्रातील स्वतंत्रपणे नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञा अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ बारबरा मॅकक्लिंटॉक यांचा जन्म. 'जंपिंग जिन्स' ही कल्पना यांनीच मांडली. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ मोबाईल जिनेटिक एलिमेंटस' या संशोधन कार्याबद्दल १९८३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

 ★१९३० : अमेरिकन संशोधक एल्मर अँब्राझी यांचे निधन. यांनी निर्माण केलेला शोधकदीप (सर्चलाईट) सर्व जगात मान्यतेस पावला. तसेच यांनी दिशादर्शक भोवरा (गायरोस्कोपिक कंपास) शोधून काढला. (जन्म: १२ ऑक्टोंबर)

 ★१९७७ : अवकाश संशोधन क्षेत्रातील महान जर्मन अमेरिकन संशोधक वेर्नेर फॉन ब्राऊन यांचे निधन. यांनी अमेरिकेचा पहिला कृत्रिम उपग्रह आणि पायोनियर सॅटेलाईट सिद्ध केले. सन १९७५ मध्ये अमेरिकेने नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा अत्युच्च सन्मान बहाल केला. हिटलरच्या जर्मनीने नाईट्स क्रॉस हा सर्वोच्च बहुमान देऊन सन्मान केला होता. (जन्म: २३ मार्च)

★१९१९ जॉन अलकॉक आणि ऑर्थर व्हिटेन ब्राऊन यांनी आपल्या विमानातून कुठेही न थांबता अटलांटिक महासागर ओलांडला. अमेरिकेतील न्यू फाऊंडलैंड येथून उड्डाण करून ते आयर्लंडकडे उतरले. 

१९६३ सोवियत रशियाच्या कास्कोड्रम येथून व्होस्टोक-६ या अवकाशयानातून २५ वर्षीय व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हाचे अवकाशात पदार्पण. महिला ही अंतराळ प्रवास करण्यास समर्थ आहे, हे तेरेश्कोव्हांनी सिद्ध केले. तीन दिवसात ४८ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून १९ जून रोजी सुखरूप पृथ्वीवर परत आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा