epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

सैनिकाचे जीवन

         सैनिकाचे जीवन



   (The Life of a Soldier) 

      सैनिक हे आमच्या देशाचे बाह्य हल्ल्यांपासून संरक्षण करत असतात. ते देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असतात. त्याच्या शौर्यामुळे आणि दक्षतेमुळे आपण सर्व आपल्या देशामध्ये सुरक्षित राहू शकतो. सैनिक हे नेहमी खुबीच्या कपड्यामध्ये असतात. ते गणवेश आणि शिरस्त्राण परिघाम करून असतात तसेच ते जड चामड्याचे बूट घालतात आणि त्यांच्याजवळ रायफल किंवा बंदूक असते.

सैनिक असल्यामुळे आपण शांततेत राहू शकतो. तो रोज सकाळी लवकर उठतो आणि कवायतला हजर राहतो. कवायत एक ते दोन तास चालते. त्यानंतर तो परत जातो व न्याहरी करतो आणि पुन्हा आपल्या कर्तव्याला लागतो. तो दिवसभर कठीण परिश्रम करतो. त्यानंतर संध्याकाळी खेळ खेळतो. तो एक शिस्तबद्ध जीवन जगतो. युद्धाच्या कालखंडात त्याचे जीवन धोक्यात असते. तो लढाईच्या क्षेत्रातच राहतो. तो कधीही आराम करत नाही तसेच काही दिवस तो अन्नपाण्याविनाच राहतो. त्यावेळेस त्याचे जीवन हे साहसी माणसासारखे असते. तो शूर, वीर, धैर्यशाली असतो. अनेक कठीण प्रसंगांचा सामना करून तो देशाचे संरक्षण करतो. तो आपल्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी त्यागरहित जीवन जगतो. आपल्या कुटुंबापासून दूर राहतो. हे फार कमी व्यक्ती करू शकतात. देश स्वातंत्र्यासाठी, शांततेसाठी आणि युद्धापासून संरक्षणासाठी सैनिकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैनिक हा खरा नायक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा