epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारा सन्मान

 गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारा सन्मान



        एकदा काही दुष्ट ब्राह्मण सल्लामसलत करून काशीच्या राजाकडे जाऊन तक्रार करायला लागले की, राजा महाराजांच्या या पवित्र विश्वनाथपुरी काशीमध्ये रघुराम या चर्मकाराचा मुलगा, रविदास मोठा अनर्थ करीत आहे. त्याच्याकडे पुष्कळ पैसा जमा झाल्यामुळे तो मोठा गर्विष्ठ झालेला आहे. त्याने चोराचे मंडळ तयार केलेले आहे आणि चोच्या करायला लावून श्रीमत होत आहेत. त्याने पक्के दोन मजली घर आणि एक सत्संग भवन तयार केलेले आहे. ज्यामध्ये गुरू बनून तो स्वत बसतो आणि वेदशास्त्र तसेच देव ब्राह्मणांची रात्रंदिवस निंदा करीत असतो. आणि त्यामध्येच चोराची पण बैठक होत असते. तो मोठा पाखेडी, ढोंगी आणि गर्विष्ठ आहे तो ब्राह्मणांच्या कधीच पाया पडत नाही. उष्टा प्रसाद वाटून सर्वांचा धर्म भ्रष्ट करीत आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांना फसवून आपले शिष्य बनविले आहे. त्याच्यामुळे धर्माचा नाश आणि ब्राम्हणाचा घोर अपमान होत आहे. आम्ही लोक निराश होऊन तुम्हाला विनती करीत आहोत. महाराज धर्म आणि गो ब्राह्मणांचे रक्षक आहेत. त्यांनी या दुष्ट चर्मकाराला योग्य तो दंड देऊन धर्माची रक्षा करावी. ही तक्रार ऐकून काशीच्या राजाने शिपाई पाठवून गुरु रविदासाना राजवाड्यात बोलाविले आणि त्यांच्या विरूध्दच्या तक्रारी सांगून त्याची बाजू मांडण्यास सांगितले. गुरु रविदासानी नम्रतेने आणि शांत चित्ताने निवेदन केले 'महाराज, ज्या लोकांनी आपल्याकडे माझ्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत, ते सगळे अत्यंत भयभीत आहेत. त्यांना भीती वाटते की, रविदासामुळे त्यांच्या धंद्याला नुकसान पोहचेल. "महाराज, एक गोष्ट सत्य आहे की, मी संग्रही, भोग परायण आणि मायामोहात आसक्ती असलेल्या लोकांना ब्राह्मण मानीत नाही. माझा विश्वास आहे की, जे राग द्वेषरहित आहेत, निष्पाप आणि निर्भयी आहेत, ते ब्राह्मण आहेत." "माझा विश्वास आहे की, ज्याचे मन निंदा शिव्या आणि मारल्याने विचलित होत नाही. क्षमा हीच ज्याचे महान बळ आहे, ज्याने काम, क्रोध, लोभ याना जिंकलेले आहे, जो सयमी आणि शीलवान आहे, तोच ब्राह्मण आहे. "महाराज, माझा विश्वास आहे की, जो कोणाशीही वैर ठेवत नाही. गंभीर, प्रज्ञावान, चागल्या आणि वाईट मार्गाचे ज्याला ज्ञान आहे, ज्याने कोणत्याही प्राण्याला दुःख दिले नाही, लोककल्याणच ज्याचे ध्येय आहे, तोच ब्राह्मण आहे. महाराज, माझा विश्वास आहे की, जो दान घेत नाही, जो दुसऱ्याच्या कीर्तने प्रसन्न आणि | दुसऱ्याच्या दु खाने दुःखी होतो, ज्याने इच्छा आणि तृष्णेला नष्ट करून टाकले आहे. ज्याचे कर्माचे बंधन तुटलेले आहे ज्याचे हृदय कोमल आणि प्रज्ञेने प्रकाशित आहे, जो मोहाला सोडून नेहमी ब्रह्म मध्ये विहार करतो. तोच ब्राह्मण आहे. महाराज, माझ्या येथे चोरांची बैठक होत असते आणि माझे सहकारी चोरी करतात, परंतु ते ज्ञान, शील, विवेक, संयम, करुणा, मैत्री, समता, क्षमा, इ. संपत्तीचे चोर आहेत. ते सोने, चांदी, पितळ, कपडे इ. भौतिक द्रव्याची चोरी करीत नाहीत. "महाराज, या सगळ्या सामान्य कर्माने माझ्या येथे समृद्धी आली आहे, राहण्यासाठी घर आणि सत्संगासाठी भवन बनलेले आहे महाराज, तुमच्यासारख्या ज्ञानी, धर्मज्ञ आणि नीतीपरायण राजाच्या छत्रछायेत, या विश्वनाथाच्या काशीमध्ये माझ्यासारख्या चर्मकारालासुद्धा तुम्ही आत्मविश्वासाने आचरण करण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. रामराज्यामध्येसुद्धा सामान्य जनतेला धर्माचे आचरण करण्याची अशाप्रकारची स्वतंत्रता नव्हती. देहासहित स्वर्गामध्ये जाण्याच्या इच्छेने तप करणाऱ्या बिचाऱ्या 'शुभका'चे डोके तो शूद्र होता म्हणून कापण्यात आले. महाराज, तुमचे शासन रामराज्यापेक्षा अधिक उदार आहे. ही तुमच्यासाठी महान गौरवाची बाब आहे. जसा तुम्हाला योग्य वाटेल तसा न्याय करा. गुरू रविदासांच्या या ज्ञान-गंभीर उत्तराने राजा अत्यंत प्रभावित झाला. त्याने मोठ्या आदराने गुरु रविदासाना आपल्या जवळील सिंहासनावर बसविले आणि त्यांचा मोठा सन्मान केला. राजसिंहासनावर बसण्याचा सन्मान मिळाल्यानंतर रविदास गर्विष्ठ बनले नाहीत, तर फळे लागलेल्या आंब्याच्या फांद्या प्रमाणे अधिक विनम्र झाले.

1 टिप्पणी: