epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

स्त्री पुरुष समानता

          स्त्री-पुरुष समानता 

              'माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष हे सारखेच महत्वाचे आहेत. दोघामध्ये अनेक गुण समान असतात आणि काही गुणविशेष. या विशेष गुणांचे कारण निसर्ग असतो आणि संस्कारही असतात ज्यावेळी विशेष गुणाचे आणि संस्काराचे प्राबल्य वाढते त्यावेळी माणसाच्या या दोन घटकापैकी एक सत्ताधारी बनतो व दुसऱ्या घटकास आपल्या अधिकाराखाली ठेवतो. ज्या समाजात अशा प्रकारे पुरूषाचा अधिकार चालतो तेथे पुरुषप्रधान संस्कृती जपली जात असते आणि डेथे स्त्रियांचा अधिकार चालतो तेथे स्त्रीप्रधान संस्कृती अस्तित्वात असते. जगात स्त्रीप्रधानता चालणारे मानवी समाज अपवादात्मक आढळतात, जसे ब्रह्मदेश, श्रीलंका व आपल्याकडील केरळ व आसाम ही राज्ये आहेत. सर्व मानवजात एक आहे. स्त्री आणि पुरूष हे समान दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद | होऊ शकत नाही. जीवनात व्यक्तिगत विकासाकरिता समानसधी, समान हक्क आणि समान अधिकार प्रत्येक व्यक्तिस मिळाला पाहिजे स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि | पुरूषानी अमुक कामे करावी, असा निर्बंध करणे शुध्द अन्याय व क्रूरपणा आहे. ज्याला जे काम साधेल त्याने ते करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाराचा अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुध्दिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे ज्या कामास जे पुरूष बुध्दिसामर्थ्याने योग्य नाहीत त्याच्याकडून ती कामे होत असल्यामुळे व स्त्रियांस ती करण्याची परवानगी नसल्यामुळे एकदरीत ती कामे व्हावी तशी होत नाहीत व तशी न झाल्यामुळे मनुष्यजातीच्या सुखास चट्टा बसत | आहे. हरएक शास्त्रात, कलेत व धंद्यात स्त्री-पुरुषाची चढाओढ लागून ज्याच्या त्याच्या-जिच्या तिच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे. शास्त्राभ्यास किंवा कुलाभ्यास करण्यास स्त्रिया असमर्थ असतील, तर त्या तशा ठरतील, पण अनुभवाने तसे ठरेतोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करणे हा शुध्द सुलतानी दाडगेपणा होय. अमेरिकेत मुलाप्रमाणे मुलींस वरिष्ठ शिक्षण देण्याचा उपक्रम केल्यापासून जे परिणाम घडून आले आहेत, त्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येईल की जी शास्त्रे व कला केवळ पुरुषासच सुसाध्य आहेत असे आपणास वाटत होते; ती शास्त्रे व त्या कला स्त्रियाना तितक्याच सुसाध्य आहेत. व शास्त्रकलांच्या अभ्यासामुळे स्त्रियाचेही नैसर्गिक चारूत्व कमी होऊन अपत्यसंगोपनाचे काम त्यांच्याने बरोबर वठेनासे होईल, अशी जी भीती होती ती केवळ निराधार होती. या दोन गोष्टी उत्तम रीतीने सिध्द झाल्या आहेत. अमुक कामे स्त्रियांनी करावी आणि अमुक पुरूषानी करावी असा आपल्या बुध्दीत सध्या जो आग्रह उत्पन्न होतो त्याचे बरेच कारण कामाची वाटणी करण्याचे काम आमच्या हाती आहे हे होय. ती बायकाच्या हाती असती तर त्यानीही अशीच एकदेशीय वाटणी करून आपणाकडे उंच कामे आणि आम्हाकडे हलकी कामे ठेवली असती । कोणत्याही विद्वान व विचारी स्त्रीचे मत घ्या ती कधीही असे म्हणणार नाही की, स्त्री-पुरूषाना एकच शिक्षण देण्यात स्त्रियाचे नुकसान आहे. हा स्त्री पुरूषांत चालत आलेला | बाद नाहीसा करण्याचा एकच उपाय आहे, तो हा की, मुलाना व मुलींना हव्या त्या शाळेत जाऊन हवे ते ज्ञान पाहिजे तितके संपादू द्यावे. सर्वांना समान संधी हा मूल्यशिक्षणाचा एक भाग आहे, आपल्या शाळेत स्त्री-पुरुष समानतेची भावना रूजविण्यासठी हे बदल घडवू या वर्गाचे प्रतिनिधित्व मुलीलाच द्या, वर्गाचे पटनोंदणी अनुक्रम लिहिताना, बाचताना मुलींचे नाव वर्णाक्षरानुसार बाचा, वर्गात त्याच्या प्रथम नावाने बोलवा, शाळेत प्रतिज्ञा, प्रार्थना मुलीच सांगतील, वर्ग हजेरीपट नेण्याचे काम मुलींना करू द्या शाळेत मुलींना पुढील रांगेमध्ये बसवा, सामुदायिक कवायतीचे नेतृत्व मुलींना करू द्या. मैदानी स्पर्धा, शालेय उपक्रमात मुलींचा | सहभाग असावा, शाळेतील कार्यक्रमात मुलींना प्राधान्य द्या, मुलींना समान संधी, समान दर्जा, समान वागणूक द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा