epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

समजूतदार मेनसिस

          समजूतदार मेनसिस' 



      चीनमधील एका खेड्यात मेनसिस नावाचा मुलगा राहत होता त्याचे आई वडील अगदी गरीब होते मेनसिस चार वर्षांचा असतानाच त्याचे वडील मरण पावले. आता मेनसिसच्या आईला खूप कष्ट करावे लागत होते. मेनसिस हाच तिचा एक आधार होता. आपला मुलगा शाळेत जावा, खूप शिकावा, मोठा व्हावा, त्याने नाव काढावे असे तिला वाटत असे. यासाठीच ती धडपडत होती. मोलमजुरी करीत होती. मेनसिस आता शाळेत जाऊ लागला. पहिल्यादा त्याला शाळा खूप आवडायची. अभ्यासाचीही गोडी वाटू लागली. हे पाहून त्याच्या आईला खूप आनंद होत असे. पण नंतर हळूहळू त्याला शाळेचा कटाळा येऊ लागला. अभ्यास नकोसा वाटू लागला. तो शाळा बुडवू लागला. शाळेला म्हणून जायचा व बाहेर कुठेतरी भटकत असायचा. आई त्याला सक्तीने शाळेत पाठवायची पण तो पाटी दप्तर शाळेतच टाकून घरी पळून यायचा. आईला काहीतरी खोटी खोटी कारणे सांगायचा मेनसिसचे हे वागणे बघून त्याच्या आईला खूप वाईट वाटायचे. एक दिवस मेनसिस असाच शाळा चुकवून घरी आला. घरात त्याची आई एक रेशमी कपडा शिवत होती. तो विकून तिला बरेच पैसे मिळणार होते. मेनसिस शाळा बुडवून घरी आला होता. त्याच्या आईच्या लक्षात आले. पण ती मेनसिसला काहीच बोलली नाही. तिने मेनसिसकडे एकदा पाहिले व तो रेशमी कपडा तिने टराटरा फाडून टाकला ती अतिशय निराश झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. हे पाहून मेनसिस चागलाच घाबरला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, 'आई, काय गं झाले? तू रडतेस का? हा कपडा को फाडलास ?' रडत असलेली मेनसिसची आई त्याला समजावीत म्हणाली. "बाळ मेनसिस, तू असा का बरे वागतोस? तू शाळा चुकवितोस, अभ्यास करीत नाहीस, खोटे बोलतोस यामुळे मला फार वाईट वाटते रे तू शिकला नाहीस तर उद्या तू मोठा झाल्यावर तुझे कसे होणार ? मी तुला जन्मभर पुरणार आहे का? तू चांगले शिक्षण घेतले नाहीस, तर तुला दोन वेळच्या अन्नासाठी ढोरासारखे राबावे लागेल. तुला जगात कुणी विचारणार नाही कुत्र्याचे जिणे जगावे लागले. तू खूप शिकावास, तू मोठा व्हावास म्हणून मी किती कष्ट करते? त्याचे तुला काहीच वाटत नाही. मी राब राब राबते आणि तू मात्र शाळा चुकवतोस, मग मी तरी कशाला करू हे कष्ट ?" आईच्या या बोलण्याचा मेनसिसच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. त्याला आपली चूक समजली त्याला आपल्या वागण्याचे फार वाईट वाटले. आईच्या पाया पडून त्याने तिची क्षमा मागितली. पुन्हा अशी चूक न करण्याची प्रतिज्ञा केली. त्या दिवसापासून त्याने कधीही शाळा चुकविली नाही. मन लावून त्याने अभ्यास केला. खूप शिकून मोठा झाला. पुढे तो चीनमधील एक थोर पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा