epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १७ जून, २०२४

21 जून-विज्ञान दिनविशेष

             21 जून-विज्ञान दिनविशेष


★२१ जून १७८१ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ सिमेअन डेनिस पॉईसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल) 

★१८४६ : ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जेम्स मार्श यांचे निधन. आर्सेनिक टेस्टचा निर्माता म्हणून प्रसिद्ध असून या टेस्टला यांचेच नाव देण्यात आले. यांनी विषारी द्रव्यासंबंधी मोलाचे संशोधन केले. (जन्म: २ सप्टेंबर)

 ★१८५७ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ बॅनॉर लुईस देनार यांचे निधन. यांनी १८१८ मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड चा शोध लावला. (जन्म : ४ मे) 

★१८६३ : डार्क नेब्यूलाचा शोध घेणारे जर्मन खगोलशास्त्रज्ञ मॅक्झिमिलन फॅन्स जोसेफ कार्नेलियस वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च) 

★१८७४ : स्वीडिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अँडर्स यान्स अँगस्ट्रॉम यांचे निधन. सौर वातावरणात हायड्रोजन असल्याचे सर्वप्रथम यांनीच सांगितले. तसेच सूर्यवर्णपटासंबंधी संशोधन केले. (वर्णपटातील तरंगविस्तार मोजण्याकरिता जे एकक वापरले जाते, त्यास यांचेच नाव देण्यात आले.) 

★१८८० : अमेरिकन शरीरशास्त्रज्ञ आर्नोल्ड ल्युसिअस गेझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे)

★१९५७ : सुप्रसिद्ध जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ योहान्स स्टार्क यांचे निधन. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ द डाप्लर इफेक्ट इन कॅनल रेज अॅण्ड स्पिलिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन इलेक्ट्रिक फिल्ड' या संशोधन कार्याबद्दल १९१९ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 'स्टार्कइफेक्ट' म्हणून यांचा एक सिद्धान्त प्रसिद्ध आहे. (जन्म: १५ एप्रिल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा