epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

मी आझाद आहे आणि आझादच राहीन

 मी आझाद आहे आणि आझादच राहीन 



     महात्मा गांधींनी सन १९२१ साली असहकाराची चळवळ सुरू केली. गावोगावी विदेशी मालावर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या अशांसारख्या कार्यक्रमांना ऊत आला चौदा वर्षाचा चंद्रशेखर त्या वेळी बनारस सरकारी संस्कृत विद्यालयावर निरोधन करायला गेला व तो पकडला जाऊन त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. खटल्याच्या वेळी न्या. मू. खारेघाट यांनी त्याला विचारले, "तुझे नाव काय?" "माझ नाव आझाद" "तुझ्या वडिलांचे नाव काय?" "माझ्या वडिलांचे नाव स्वातंत्र्य 'तुझ राहण्याचं ठिकाण? माझ राहण्याच ठिकाण इंग्रजांनी इथल्या देशभक्तांसाठी बांधलेला एखादा तुरुंग" चंद्रशेखरने सुनावणीच्या | दिलेल्या या उत्तरांनी चिडलेल्या न्यायमूर्तींनी तो वयाने लहान असल्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा न फर्मावता १५ फटक्यांची शिक्षा ठोठावली. लोकांना दहशत बसावी म्हणून पोलिसाने चंद्रशेखरला भर चौकात नग्न करून त्याच्या अंगावर चामडी वादीच्या चाबकाने फटक्यांमागून फटके द्यायला सुरुवात केली. पण जराही हायहूय वा अयाईग न करता तो बालवीर चाबकाच्या प्रत्येक फटकायासरशी 'भारतमाता की 'जय' व 'महात्मा गांधी की जय' असा उद्घोष करू लागला अखेर उघड्या अंगावर उठलेल्या रसरशीत वळांतून रक्त भळभळू मूर्च्छा येऊन रस्त्यावर कोसळला, पण कोसळता कोसळतानाही त्याच्या तोंडून अस्फुट घोष बाहेर पडला. 'भारत माता की जय" तेव्हापासून लोक त्याचे 'तिवारी' हे आडनाव विसरले व त्याला 'चंद्रशेखर आझाद या नावाने संबोधू लागले. पुढे असामान्य धाडस व कल्पकता यांच्या जोरावर तो लवकरच क्रांतिकारकांचा 'सेनापती' बनला. लागून चंद्रशेखर भारतीय लोक स्वातंत्र्याला कितपत लायक झाले आहेत हे पाहण्यासाठी सायमन ह्या इंग्रज अधिकान्याच्या आधिपत्याखाली केवळ काही इंग्रजांचेच एक शिष्टमंडळ हिंदुस्थानात आले होते. भारतीय काँग्रेसने त्यांच्यावर बहिष्कार घातला हे 'सायमन कमिशन' त्यावेळी अखंड भारतात असलेल्या लाहोरला गेले लाला लजपतराय यांनी त्या 'सायमन कमिशन'च्या निषेधार्थ दि. ३०-१०-१९२८ रोजी हजारो भारतीयांची एक मिरवणूक काढली. त्यावेळी स्कॉट व सँडर्स या इंग्लिश पोलिस अधिकाऱ्यांनी त्या मिरवणुकीतील निदर्शकावर असा बेछूट लाठीमार केला की, लाला लजपतराय तर रक्तबंबाळ झाले व त्यातच थोड्या दिवसांत वारले लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धदिनी सँडर्सला पिस्तुलाने ठार केले. त्या कटात चंद्रशेखर यांचा हात होता. सन १९२९ मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन याच्या मोटारीखाली बॉम्बस्फोट करून त्याला मारण्याचा जो प्रयत्न झाला त्याचेही सूत्रधार चंद्रशेखर होते सरकारला हे समजत होते; पण अटीतटीचे प्रयत्न करूनही सरकारला ते सापडत नव्हते. अखेर आपण क्रांतिकार्यात गुतल्यामुळे घराकडे दुर्लक्ष होऊन, आईची व पाठच्या भावंडाची होऊ लागलेली उपासमार आणि भरीस अनेक महिन्यांचे भाडे थकल्यामुळे घरमालकाने घरातले सामान बाहेर फेकून देण्याची दिलेली धमकी, या मुळे डळमळीत झालेल्या वीरभद्र या आझादांच्या सहकाऱ्याने ५००० रूपये बक्षीस मिळविण्याच्या मोहाने, ते अलाहबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये असल्याची खबर पोलिसांना दिली. लगेच इंग्रज पोलिस सुपरिटेंडंट नाट बॉबर हा ४० सशस्त्र पोलिसांनिशी मोटारगाड्यातून पार्कपाशी आला आणि त्याने व त्याच्या पोलिसांनी आझादांवर बंदुकांतून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला आझादांनीही पिस्तुलाने नाट बाँबर व विश्वेश्वरसिंह यांना जायबंदी केले; पण त्याच्यावर होणाऱ्या वर्षावाने त्यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊ लागले. स्वत जवळ एकच गोळी शिल्लक राहिल्याचे लक्षात येताच आझाद पोलिसाना म्हणाले, 'मला तुम्ही जिवंत पकडू शकणार नाही मी नावाने आझाद आहे आणि जिवात जीव असेपर्यंत मी आझाद म्हणजे स्वतंत्रच राहीन' आझाद असे म्हणाले आणि पिस्तुलातली एकमेव गोळी स्वतःच्या मस्तकात मारून घेऊन भूमीवर कायमचे कोसळले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा