epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

उजवा श्रेष्ठ की डावा?

             उजवा श्रेष्ठ की डावा? 



            भोज राजाच्या दरबारात विद्वान व गुणी लोकांचा खूप आदरसत्कार होत असे. राजाची गुणवत्ता व दानशूर प्रवृत्ती ऐकून दूरदूरचे विद्वान त्याच्या दरबारात येत असत. राजा भोज त्याची विद्वत्ता व गुण पाहून खूप मोठे पुरस्कार देत. त्यांच्या दरबारात एक खूप विद्वत्ता असलेले भद्रमणी नावाचे ब्राह्मण होते. ते नेहमीच कालीदासाचा सन्मान करीत व त्यांच्यावर खूप प्रेमही करीत. कधी कधी कवी कालीदास व भ्रजमणी यांच्यात वाद विवाद इतका मनोरंक व्हायचा की सर्व दरबारी व मंत्री त्यांची वाहवा करीत या वादविवादात बहुतेक कवी कालीदास हेच विजयी होत. त्या वेळी राजा भोज त्यांना खूप धनद्रव्य देत. एके दिवशी संध्याकाळी भोज आपल्या बागेत फिरायला निघाले. त्यांच्या डाव्या बाजूला भद्रमणी व उजव्या बाजूला कवी कालीदास चालत होते. राज्यकारभाराच्या गोष्टीमध्ये मधून मधून कवी कालीदास साहित्यिक गंमती-जमतीच्या संगत कविता म्हणून दाखवीत तेव्हा राज भोज ती ऐकून खूप आनंदित व्हायचा. ते पाहून भद्रमणीला खूप वाईट वाटायचे. भद्रमणीला असे वाटायचे की राजाला कविता ऐकवून कालीदास माझे महत्त्व राजासमोर कमी करीत आहे. जेव्हा त्याच्याकडून राहवले गेले नाही. तेव्हा तो राजा म्हणाला, 'महाराज, डावा हात नेहमीच शूरतेमध्ये पुढे असतो.' तेव्हा राजा भोज म्हणाला, 'ते कसे काय?" 'राजन, सर्वांत प्रथम डावा हात पुढे करून लढाईत शत्रूचे डोके धरले जाते. मग उजव्या हाताने तलवारीच्या साह्याने वार केला जातो.' भद्रमणी म्हणाला, 'ठीक आहे.', राजा म्हणाला, 'लढाईत ढालपण डाव्या हातात पकडली जाते, अशा प्रकारे शत्रूपासून आपले संरक्षण करण्यासाठी सर्वांत प्रथम डावा हातच पुढे होतो.' भद्रमणी म्हणाला. 'हेही ठीक आहे' राजा भोज म्हणाला. "आणि राजन धनुष्य बाणाचा उपयोग करण्यासाठीही डावा हातच कामी येतो,' भद्रमणी म्हणाला 'तुम्ही अगदी खरे सांगत आहात.' तेव्हा राजा भोजने भद्रणीकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले की 'हे सारे सांगण्याची गरज का भासली?" परंतु कवी कालीदास हे सरस्वतीचे कृपापात्र पुत्र होते. त्या वेळी भद्रमणी हे आपणास हलकट सिद्ध करू पाहत आहेत. ते राजाच्या उजव्या बाजूने चालत होते. ते लगेच म्हणाले, 'पंडित भद्रमणी हे योग्यच सांगत आहेत की, 'डावा हात लढाईत नेहमीच पुढे असतो, परंतु तो असतो तुच्छ!" "असे का?" राजाने विचारले तेव्हा कवी कालीदासने उत्सुकतेने सांगितले, 'महाराज, मात्र दान देतेवेळी तो नेहमीच मागे असतो. दान हे नेहमीच उजव्या हातानेच दिले जाते. ' राजा भोज कवी कालीदासाच्या या उत्तराने त्यांची वाहवा करू लागले कारण डाव्या हाताला शौर्यादी कार्यासाठीच बनविले आहे. म्हणून सत्कर्म किंवा दान देण्याचा अधिकार नाही. हे कवी कालीदासाचे उत्तर ऐकून पंडित भद्रमणी यांचे मस्तक लाजेने खाली झुकले. अशाप्रकारे कालीदासाने भद्रमणीला पुन्हा एकदा हरविले होते. तेव्हा राजा भोजाने खूप प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातील मुक्तामणी जडित किमती पुरस्कार म्हणून कवी कालीदासाला दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा