epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

शाल आणि श्रीफळ

        शाल आणि श्रीफळ 



         :' पुण्यात पेशव्यांच्या दरबारात एक मनुष्य गेला. तो हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तामीळ, तेलगू, बंगाली, उर्दू, सिंधी व मल्याळी अशा एकूण दहा भाषा सारख्याच सहजतेने व अस्खलित बोलू शके, तो पेशव्यांना म्हणाला, 'महाराज, आपल्या दरबारी असलेले नाना फडणीस यांची चातुर्याबद्दल ख्याती आहे, तेव्हा माझी मातृभाषा कोणती आहे, हे त्यांनी सांगावें' पेशव्यांनी नानाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहातच, नाना त्या बहुभाष्याला मुद्दाम म्हणाले, 'हे पाहा, सध्या माझ्यापुढं एवढी कामे आहेत की, तुमच्याकडे लक्ष द्यायला मला | वेळ नाही. तुम्ही दोन-तीन दिवस पेशव्यांचे पाहुणे म्हणून राहायला तयार असाल, तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन' त्या बहुभाषी पाहुण्यानं ती गोष्ट | मान्य करताच, नानांनी त्याची राहाण्या-जेवणाची व्यवस्था अतिशय चांगल्या ठेवण्याच्या सूचना सेवकांना दिल्या. पाहुणा आला, त्याच दिवशी रात्री नानाच्या सूचनेनुसार त्याला असं जड व चमचमीत जेवण वाढलं गेल, की जेवण होताच आणि मऊशार गाद्या गिरद्यात आडवे होताच, त्याला गाढ झोप लागली. ते पाहून त्याला येणाऱ्या भाषा जाणणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन, नाना त्याच्या खोलीत गेले आणि त्यांनी एका सेवकाला त्याच्या तोंडावर पाणी शिंपडायला सांगितले. पाण्याचा हाबकारा तोंडावर बसताच, गाढ झोपी गेलेल्या त्या पाहुण्याची झोप चाळवली जाऊन अर्धवट गुंगीत 'हे काय? हे काय? अशा अर्थी 'आ शृं! आशृं।' असं म्हणू लागला. त्या बरोबर त्याला चांगला जागा करून नाना म्हणाले, 'पाहुणे, तुमची मातृभाषा गुजराथी आहे. खरं की नाही नानांनी योजलेल्या युक्तीमुळे चकित झालेल्या त्या पाहुण्याने त्यांचे म्हणणे | दिलखुलासपणे मान्य केले आणि बरोबर आणलेली शाल व श्रीफळ त्यांना अर्पण करून, दुसऱ्या दिवशी तिथून प्रयाण केले. '

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा