epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

वि. दा. सावरकर

             वि. दा. सावरकर



        (जन्म २८ मे १८८३ मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६) आघाडीचे क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक - वि दा सावरकर | आणि भाषाशुध्दी व लिपी शुद्धीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर हे नाशिकजवळील भगूर गावी जन्मले येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर श्वसूर रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांच्या साहाय्याने ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात गेले आणि १९०५ साली बी. ए. झाल्यावर १९०६ साली ते श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. तिथे 'इंडिया हाऊस मध्ये राहून अभ्यास करीत असता ते १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयती वगैरसारखे राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने लंडनमध्ये पिस्तुलाने कर्झन वायलीचा खून केला. त्याबद्दलचा निषेध करणाच्या तिथल्या भारतीयांना त्यांनी उघड विरोध केला. त्यामुळे त्याच्या नावाचा इंग्लंडमध्ये गवगवा होऊन त्याचीही गणना क्रांतिकारकामध्ये केली जाऊ लागली व त्यांना बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली. इकडे नाशिकला त्याचे वडिलबंधू गणेशपत ऊर्फ बाबा यांना अभिनव भारताच्या मित्रमेळ्या'तील देशभक्तिपर गीताबद्दल १९०९ साली जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकला जॅक्सनचा खून झाला. या खून करणाऱ्या क्रांतिकारांना लडनवासी सावरकरांनीच पिस्तुल पुरविल्याचा छडा पोलिसाना लागला. त्यामुळे पॅरिसला गेलेले सावरकर लेडनला येताच त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक करण्यात आली व आगबोटीतून हिंदुस्थानात आणले जाऊ लागले. पण ती बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदरात धक्क्यापासून दूर उभी राहिली असता सावकरानी शौचकूपाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली व किनारा गाठला. पण, फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडून भारतीय पोलिसांच्या हवाली केले. हिंदुस्थानात आणल्यावर त्यांच्यावर खटले भरून त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांची अंदमानच्या कोठडीत रवानगी करण्यात येऊन त्याची व त्यांच्या सासऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अंदमानात चौदा वर्षे यमयातना भोगून झाल्यावर त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले आणि अलिपूर व येरवडा येथील तुरूंगात ठेवण्यात आले. दि. ६ जानेवारी १९२४ पासून त्यांना रत्नागिरीस स्थानबद्ध करण्यात आले. तिथे असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी सहभोजने सुरू केली आणि भागोजी कीर यांच्याकडून पतितपावनाचे मंदिर बांधून घेऊन ते अस्पृश्यांसाठी खुले ठेवले पुढे ते हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाले. त्याचे वाङ्मय मराठी साहित्याला भूषणभूत असून, त्यात वैचारिक निबंध, खडकाव्ये, आत्मचरित्र, कविता, नाटके आदींचा समावेश आहे. शेवटच्या आजारात अन्नत्याग करून त्यांनी जीवन संपविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा