20 जून-विज्ञान दिनविशेष
२० जून (हा दिवस जागतिक स्वच्छता दिन म्हणून पाळल्या जातो.)
१८६१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर फ्रेडरिक जी हॉपकिन्स यांचा जन्म. यांनी अॅमिनोअॅसिड जीवनासत्त्वाविषयी महत्त्वाचे संशोधन केले. (मृत्यू १६ मे)
१८९७ : डॅनिश गणिती योहान जॅपेटस स्टीन्सट्रॅप यांचे निधन. यांनी अनुवंश शास्त्रात मोलाची 'कामगिरी केली. (जन्म: ८ मार्च)
१९१७ : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्स मॅसॉन क्रॅफ्टस यांचे निधन. यांनी अॅल्यूमिनिअम धातूसंबंधी संशोधन केले. रसायनशास्त्रात यांच्या नावाने 'फ्रिडेल क्रॅफ्टस रिअॅक्शन' प्रसिद्ध आहे. (जन्म: ८ मार्च)
१९६६ : विश्वनिर्मितीचा महास्फोट सिद्धान्तपट (बिग बँग थिअरी) चा प्रस्ताव तयार करणारे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉर्ज लेमायट्रे यांचे निधन. बिंदूवत जागेत अफाट उर्जा आणि वस्तू एकत्र आल्यामुळेच महास्फोट होऊन विश्व जन्मास आले. असे त्यांचे म्हणणे होते. हीच कल्पना आज सर्वमान्य होते आहे.
१९८७ : प्रसिद्ध भारतीय पक्षितज्ञ डॉ. सलीम अली यांचे निधन. त्यांनी पक्षिजीवनाचे अत्यंत जवळून आणि बारकाईने निरीक्षण केले. पक्षिजीवनाचा आणि दिनक्रमाचा सखोल अभ्यास केला. विख्यात पक्षितज्ञ म्हणून अजरामर झाले. (जन्म: १२ नोव्हेंबर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा