epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, ६ जून, २०२४

जून ०६, २०२४

6 जून -विज्ञान दिनविशेष

 


६ जून १४३६: हॅलेच्या धूमकेतूचे सशोधक जर्मन खगोलशास्त्रज्ञ रिजीऑ मॉन्टनस याचा जन्म (मृत्यू ६ जुलै)

 १८२६ जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जोसेफ फॉन फ्राऊनहॉपर याचे निधन सूर्याच्या वर्णपटातील (स्पेक्ट्रम) मधील काळसर रेषाचा शोध लावला यानी सूर्यबिबमापक (हॅलीओमिटर) तयार केले (जन्म ६ मार्च)

१८५० नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ कार्ल फर्डिनड ब्राऊन याचा जन्म

 १९१८: (मृत्यू २० एप्रिल) नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ एडविंग जी फ्रेब्ज याचा जन्म यानी स्नायूतील पेशींबद्दल विशेष संशोधन केले यांना द डिस्कव्हरी कन्सर्निंग रिव्हर्सीबल प्रोटिन फॉस्फोरिलेशन अॅज अ बायोलॉजीकल रेग्यूलेटरी मेकॅनिझम' या संशोधन कार्याबद्दल १९९२ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

 १९३३ नोबेल पारितोषिक विजेते स्विस पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ हेन्रीच रॉर्हर यांचा जन्म यांना 'डिझाईन ऑफ द स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप' या संशोधन कार्याबद्दल १९८६ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

१९४३ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड इ. स्मॅले यांचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ फ्यूलेरिन्स' या संशोधन कार्याबद्दल १९९६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल परितोषिक विभागून मिळाले.

 १९४४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ फिलिप ए शार्प याचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ स्ल्पिट जीन्स' या संशोधन कार्याबद्दल १९९३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबल पारितोषिक विभागून मिळाले .

१९४९ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फिलिप हर्बर्ट कॉवेल यांचे निधन यानी पृथ्वीच्या गतीसंबंधीं मौलिक सशोधन करून दर हजार वर्षांनी दिवस एक मिनिटाने मोठा होत असल्याचे सिद्ध केले. (जन्म: ७ ऑगस्ट)

 १९६१ : स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल गस्तॉफ युंग यांचे निधन. यांनी मनोगंड या विषयी मोलाचे संशोधन करून मानवी व्यक्तिमत्त्वाचे बहिर्मुख आणि

 १७६१ अंतर्मुख असे भेद केले. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर दुसऱ्यांदा शुक्राचे अधिक्रमण या घटनेचे शास्त्रज्ञांनी निरीक्षण केले. (जन्म: २६ जूलै) 

१९७१ रशियाने सोयुझ ११ हे अंतराळयान अवकाशात सोडले. यामधील तीन अंतराळविरांनी साल्यूट-१ या स्पेस स्टेशनमध्ये यशस्वी प्रवेश केला. पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या स्पेस स्टेशन मध्ये प्रवेश करणारे पहिले तीन अंतराळवीर.

१९७९ भारताने भास्कर-१ या उपग्रहाचे रशियातील अवकाश प्रक्षेपण तळावरुन यशस्वीरित्या प्रक्षेपण केले



जून ०६, २०२४

5 जून-विज्ञान दिनविशेष

 5 जून




(परिसर स्वच्छता दिन) ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) 

★१८१९ नेपच्यून ग्रहाचा शोध घेणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ जॉन कौश अॅडम्स (मृत्यू: २१ जानेवारी)

★१८६२ नोबेल पारितोषिक विजेते स्वीडिश नेत्रतज्ञ अल्वार गल्स्ट्रेंड याचा जन्म (मृत्यू २८ जूलै) याचा जन्म

 ★१८९० 'चित्रीकरणातील होलोग्राफी पद्धतीचे जनक' नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश संशोधक डेनिस गॅबोर यांचा जन्म (मृत्यू ८ फेब्रुवारी) 

★१९८९ भूमीवरून भूमीवर मारा करणाऱ्या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या 'त्रिशूल' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 ★१९५५ नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्टन्डर्डस अॅण्ड टेक्नॉलॉजी व कोलोरोडो विद्यापीठाच्या संयुक्त प्रकल्पातंर्गत एरिक कॉर्नेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'बोस आईन्स्टाईन कंडन्स्टेट' ही पदार्थाची पाचवी अवस्था प्रत्यक्षात निर्माण केली 

★ १९७२ स्टॉक होम येथे मानवी पर्यावरणासंबंधी जागतिक परिषद झाली. मानवी प्रगतीसाठी पर्यावरणाचा बळी दिला जातो अशी चिता परिषदेत व्यक्त करण्यात आली या दिवसापासून "जागतिक पर्यावरण दिन' साजरा केल्या जातो

जून ०६, २०२४

4 जून-विज्ञान दिनविशेष

 4 जून-विज्ञान दिनविशेष


★१७५६  दशांश पद्धतीचे पुरस्कर्ते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जॉ अन्तान क्लॉड चैंपटें (मृत्यू ३० जुलै)

 ★१८७७ याचा जन्म नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेन्रीच ऑटो विलैंड याचा जन्म

 ★१९१६ (मृत्यू ५ ऑगस्ट) नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ रॉबर्ट एफ फर्चगॉर यांचा जन्म यांना 'द नायट्रिक ऑक्साईड अॅज ए सिग्नलिंग मॉलेक्यूल इन द कॉर्डिओव्हस्कूलर सिस्टिम' या संशोधन कार्याबद्दल १९९८ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले .

★१९२५ फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ निकोलस फ्लॅमिरिऑन याचे निधन खूप दूर अंतरावरील तारे आणि ग्रहांचे निरीक्षण करून खगोलशास्त्रात मोलाची भर घातली. (जन्म २५ फेब्रुवारी) 

★१९६१: सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ एर्विन श्रोडिजर यांचे निधन यांनी भौतिकशास्त्रात वेव्ह मेकॅनिक्स नावाचा एका नव्या शाखेची मुहूर्तमेढ केली. याना 'द डिस्कव्हरी ऑफ न्यू प्रॉडक्टीव्ह फॉर्म्स ऑफ अॅटोमिक थिअरी' या संशोधन कार्याबद्दल १९३६ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

★१९६२ (जन्म १२ ऑगस्ट) अमेरिकन निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स विल्यम् बीब यांचे निधन यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील सृष्टीविषयी संशोधन केले (जन्म २९ जानेवारी)


★१७८४ मॉदी एलिझाबेथ थिबल यांनी फ्रान्समधील लिऑन येथे बलूनमधून उड्डाण केले. बलूनमधील उड्डाण करणारी ही पहिली महिला होती. 

★१९९७ इन्सेंट मालिकेतील तिसरा उपग्रह इन्सॅट-२डी चे फ्रेंच गियानामधील कोअर या अवकाश तळावरून यशस्वी प्रक्षेपण .

★२००२ खगोलशास्त्रज्ञ मायकेल ब्राऊन व चॅडविक युजिलो यांनी नव्या ग्रहाचा शोध लावला. याला 'क्वाओआर' असे नाव दिले आहे.


जून ०६, २०२४

3 जून विज्ञान दिनविशेष




 १६५७ : ३ जून ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर विल्यम हार्वे यांचे निधन रुधिराभिसरण (ब्लड सर्क्यूलेशेन) च्या शोधामूळे याचे नाव विज्ञान इतिहासात अजरामर झाले (जन्म १ एप्रिल)

 १७२६: ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ जेम्स हटन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च) यानी स्फटिकशास्त्रात 

१८२२: फ्रेंच खनिजशास्त्रज्ञ रेने जस्ट हाय यांचे निधन मौलिक संशोधन केले. (जन्म २६ फेब्रुवारी)

 १८७३ जर्मन ऑषधीशास्त्रज्ञ ऑटो लोवी यांचा जन्म (मृत्यू: २५ डिसेंबर)

 १८९९ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जॉर्ज फॉन बेकसे यांचा जन्म हे पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ असून वैद्यकशास्त्राचे नोबेल : पारितोषिक मिळविणारे पहिलेच शास्त्रज्ञ होय. (मृत्यू: १३ जून) 

१९७७ सुप्रसिद्ध ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ आर्किबाल्ड व्हिविअन हिल याचे निधन यांना 'द डिस्कव्हरी रिलेटिंग टु द प्रॉडक्शन ऑफ हिट वन मसल्स' या संशोधन कार्याबद्दल १९२२ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म २६ सप्टेंबर)

★१७६९ दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर तिसऱ्यांदा शुक्राचे अधिक्रमण या घटनेचे शास्त्रज्ञानी निरीक्षण केले.

★ १८७६ अलेक्झाडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोन या उपकरणाचा शोध लावला जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी होय 

★१९६५ अमेरिकेचे जेमिनी-४ हे अवकाश यान पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतांना एडवर्ड व्हाईट या अतराळवीराने यानाच्या बाहेर येऊन यशस्वी रितीने अंतराळ संचार (स्पेस वॉक) केला ते २२ मिनिटे यानाबाहेर वजनरहित अवस्थेत तरंगत होते 

★१९७२ भारताची पहिली आधुनिक युद्धनौका निलगिरी कार्यरत 

★१९९२ रिओडिजानिरो येथे पृथ्वी समेलन संपन्न झाले.


शनिवार, १ जून, २०२४

जून ०१, २०२४

2 जून विज्ञान दिनविशेष

            2 जून-विज्ञान दिनविशेष

Science Day Special

Science Day Special


१७८० : २ जून स्वीडिश वैद्यक व रसायनशास्त्रज्ञ नील्स ग्रॅब्रिअल सेव्हस्ट्रॉम यांचा जन्म (मृत्यू ३० नोव्हेंबर) 

१८५४ : जर्मन शरीरविज्ञानशास्त्रज्ञ मॅक्स बनर शक्तिनिर्मितीला संख्यात्मक आधार दिला. यांचा जन्म यांनी (मृत्यू २७ एप्रिल)

 १९२६ स्कॉटिश सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ सर विल्यम बूग लाईश्मन यांचे निधन. यांनी विषमज्वर (टायफाईड) रोगाविरूद्ध लस तयार केली.2 जून

१७८० : २ जून स्वीडिश वैद्यक व रसायनशास्त्रज्ञ नील्स ग्रॅब्रिअल सेव्हस्ट्रॉम यांचा जन्म (मृत्यू ३० नोव्हेंबर) 

१८५४ : जर्मन शरीरविज्ञानशास्त्रज्ञ मॅक्स बनर शक्तिनिर्मितीला संख्यात्मक आधार दिला. यांचा जन्म यांनी (मृत्यू २७ एप्रिल)

 १९२६ स्कॉटिश सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ सर विल्यम बूग लाईश्मन यांचे निधन. यांनी विषमज्वर (टायफाईड) रोगाविरूद्ध लस तयार केली.

 १९५८ : (जन्म ६ नोव्हेंबर) सुप्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ कूर्ट आल्डर यांचे निधन यांनी सिंथेटिक रबरासंबंधी संशोधन केले. यांना 'डिस्कव्हरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ द् डाईन सिंथेसिस' या संशोधन कार्याबद्दल १९५० सालाचे रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म १० जूलै) 

*१९८३ सोवियत रशियाने शुक्र ग्रहाचे रहस्य शोधून काढण्यासाठी अंतराळ यान प्रक्षेपित केले.

 १९५८ : (जन्म ६ नोव्हेंबर) सुप्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ कूर्ट आल्डर यांचे निधन यांनी सिंथेटिक रबरासंबंधी संशोधन केले. यांना 'डिस्कव्हरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ द् डाईन सिंथेसिस' या संशोधन कार्याबद्दल १९५० सालाचे रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म १० जूलै) 

*१९८३ सोवियत रशियाने शुक्र ग्रहाचे रहस्य शोधून काढण्यासाठी अंतराळ यान प्रक्षेपित केले.

जून ०१, २०२४

1 जून विज्ञान दिनविशेष

     1 जून विज्ञान दिनविशेष

Science Day Special

Science Day Special



★१७९६ : प्रसिद्ध फ्रेंच पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ निकोलस लिओनार्ड सेंडी कॅरनो याचा जन्म (मृत्यू २४ ऑगस्ट )

★१८१२: आयरीश रसायनशास्त्रज्ञ रिचर्ड किरवान यांचे निधन यांनी आम्ले आणि अम्लादी संबंधी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

 ★१९०७ ब्रिटिश संशोधक सर फ्रैंक व्हिटल यांचा जन्म जेट विमानाच्या निर्मित मार्गदर्शन करून स्वतः अशा विमानांना लागणारे एक इंजिन तयार केले.

 ★१९७९ सुप्रसिद्ध जर्मन वैद्यकशास्त्रज्ञ वेर्नर फोर्समन यांचे निधन यांनी सर्जरी अॅण्ड युरोलॉजी या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केले. यांना 'द हार्ट कॅथरायझेशन अॅण्ड पॅथालॉजीकल चेंजेस इन द सर्क्युलेटरी सिस्टिम' या संशोधन कार्याबद्दल १९५६ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले (जन्म: २९ ऑगष्ट) 

★१८२३ जगातील पहिला वॉटरप्रुफ रेनकोट चार्ल्स मॅकीनटॉश यांनी बना या रेनकोटला 'मॅक्स' असे संबोधले जाते. 

★१८३१ सर जेम्स क्लार्क रास यांनी पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव शोधल 

★१९४५ टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा प्रारंभ झाला.

 ★ १९७२ भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ची स्थापना.

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

मार्च १५, २०२४

शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत..

 शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत..


:- विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्ग व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय :- खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यारा शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शारान निर्णय दिनांक ०१ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील:-

 १. जन्म दाखला 

२. शाळा प्रवेश आवेदनपत्र 

३. सर्व शैक्षणिक कागदपत्रे

 ४. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे 

५. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक 

६. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी) 

७. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड) 

८. मृत्यु दाखला तथापि, सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात यावी. २. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पध्दतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात्त नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे. अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म/मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सुट देण्यात येत आहे. ३. याबाबत नमूद करण्यात येते की, खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ) शासन निर्णय, महिला व बाल कल्याण विभाग, दि.३०.११.१९९९ अन्वये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जन्म-मृत्यु नोंदणी, शिधा वाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या

परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय/निमशासकीय कागदपत्रांवर/अभिलेखावर वडीलांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधितांच्या वडीलांच्या नावाच्या स्तंभाबरोबरच संबंधितांच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबंधितांच्या वडीलांच्या नावाबरोबरच त्याच्या आईचेही नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे. आ शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दि.०५.०२.२००० अन्वये, प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करताना दाखलखारीज नोंदवहीमध्ये/जनरल रजिस्टरमध्ये/तक्ता-ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रकान्यात विद्यार्थ्यांच्या आईच्या नावाची नोंद करण्या यावी, त्याच प्रमाणे विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्यांच्या आईचे नाव लिहिण्यात यावे. इ) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दि.२४.०२.२०१० अन्वये, घटस्फोटीत पती, पत्नी वा आई वडीलांचा घटस्फोट झाला असेल, अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल, अशा घटस्फोटीत आईने/महिलेने अपत्यांच्या नावापुढे त्यांच्या वडीलांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे, अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटींच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी. शासन निर्णय क्रमांका संकीर्ण २०२३/प्र-कार्या/२५८.क्र.२ वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, आता सदर शासन निर्णयात सुधारणा करुन मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव तद्नंतर आडनाव अशा स्वरुपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. ४. मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्रांच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम/नियम इत्यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा व तद्नंतर आवश्यक ती प्रक्रीया करण्यात यावी. 4 सदर शासन निर्णय मा.मंत्रिमंडळाने दि.११.०३.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. ६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०३१४१९४२५३७२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.  

शासननिर्णय


रविवार, १० मार्च, २०२४

मार्च १०, २०२४

स्वरविरहित वाक्य वाचन सराव

 स्वरविरहित वाक्य वाचन सराव 


*📚पहिली ते पाचवी 💯टक्के मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम*
वाचन सरावासाठी २२० वाक्यांचा निश्चितच उपयोग होईल.
➡ *स्वरविरहित शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/2-ufhQUB-6g
➡ *काना शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/iS6iRAbfvPo
➡ *ऱ्हस्व वेलांटि शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/sVpbWFDJzjA
➡ *दिर्घ वेलांटि शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/x7Xl8D6NIsY
➡ *ऱ्हस्व उकार शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/9WjmgXMTuFU
➡ *दिर्घ उकार शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/Z4zPwG_auzs
➡ *एक मात्रा शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/48k3Iyu3mBU
➡ *दोन मात्रा शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/muQue0HI1B0
➡ *एक काना व एक मात्रा* *शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/uJi79BNLOfQ
➡ *एक काना व दोन मात्रा* *शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/GXIt30uovkI
➡ *अनुस्वार शब्दांचे वाक्य*
https://youtu.be/3HxOdd7ZF2I
*LIKE SHARE AND SUBSCRIBE MY YOUTUBE CHANNAL*
http://youtube.com/c/GodavariTambekar
*
📲🖥💻🎞💽🎥💻

बुधवार, ६ मार्च, २०२४

मार्च ०६, २०२४

१८ वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर कर्मचारी-शिक्षकांना मिळाला दिलासा !

 जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होणार
१८ वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर कर्मचारी-शिक्षकांना मिळाला दिलासा !



गत वर्षी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप करुन, १७ लाख कर्मचारी शिक्षकांनी सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षितेकडे शासनाचा लक्षवेध करुन घेतला होता. शासनाने देखील भविष्यातील गंभीर समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचे धोरण स्विकारुन संघटनेशी वाटाघाटी केल्या. त्यामुळे सौहार्दाचे वातावरणात शासनाने या १७ वर्षे प्रलंचित प्रश्नाचा गांभिर्याने विचार करुन, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशा शिफारशी प्राप्त होतील या उद्देशाने "सुबोधकुमार अभ्यास समितीची स्थापना केली. सदर अभ्यास समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. याबाबत संघटना प्रतिनिधींशी, अपर मुख्य सचिव स्तरावर, दोन वेळा सखोल चर्चा करण्यात आली. या चचेत सुधारित पेन्शन योजनेचा विचार करताना कर्मचारी शिक्षकांवर १० टक्क्यांच्या अंशदानाची सक्ती असू नये अशी भूमिका सादर करण्यात आली. कमी सेवा असणा-या मूल कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कमीत कमी रु. १०,०००/- पेन्शन मिळालीच पाहिजे असा आग्रह धरण्यात आला. मृत कर्मचा-याच्या कुटुंबियांस पुरेशी पेन्शन, उपदान, गट बिमा, रजा रोखीकरण या सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा रास्त आग्रह धरण्यात आला. या सुचीत मुद्यांवर विचार केला जाईल असे यावेळी शासनाच्यावतीने आश्वस्त करण्यात आले. आज विधीमंडळात शासनाने जुन्या पेन्शन प्रमाणे, जुन्या पेन्शन इतक्या रक्कमेची, म्हणजेच कर्मचारी- शिक्षकांच्या निवृत्ती दिनांकी असलेल्या मूळ वेतनाच्या ५० टक्के अधिक तत्कालीन महागाई भत्ता, देण्याविषयक धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस सुध्दा ६० टक्के पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेताना अंशदानाचा (Contribution) शासनाचा वाटा १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के ही बाब कायम ठेवण्यात आली आहे. सिकींग फंड, शासनाचे अंशदान १४ टक्के व कर्मचाऱ्याचा वाटा १० टक्के यामुळे जो निधी संचित होईल त्यातून कर्मचारी-शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे दरमहा रक्कम अदा करणे सुलभ होणार आहे. अंशदान संचयाच्या या योजनेतूनच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या वाढीव खर्चामुळे शासन डबघाईस येईल या अंदाजाला सपशेल मुठमाती देणे होय. शासनाच्या १४ टक्के कर्तव्य वाटयात व आमच्यासाठी आम्ही दिलेल्या १० टक्के वाटयातून जी रक्कम उभी राहणार आहे त्यातूनच "जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन" हा जटील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे हे शासन व संघटना या दोनही बाजूंसाठी हितकारक आहे. आर्थिक संकटाचा बाऊ करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे.

आज जनमानसात लोकप्रिय स्थान प्राप्त केलेल्या "मा. एकनाथराव शिंदे" सरकारने विधीमंडळात जो निर्णय घोषित केला आहे त्यामुळे कर्मचारी-शिक्षकांना १८ वर्षानंतर सुधारित निवृत्ती वेतन प्रणालीत खालील लाभ प्राप्त होणार आहेत.

 १ सद्या कार्यरत असणा-या कर्मचा-यांपैकी ज्यांना NPS प्रणाली मध्ये निवृत्तीवेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरु होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल. 

2. राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह अनुज्ञेय राहील.

 ३. २० वर्षांपेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्ती होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन तत्कालीन महागाई भत्त्यासह दिले जाईल.

 ४ सेवेत असताना निधन पावल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल. (महागाई भत्त्यासह) ५.सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्युनंतर त्याला निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता.

६. या योजनेसाठी संचालक, लेखा व कोषागारे यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल.

७. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील.

 ८. असेल. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पेन्शनचा नवा पर्याय खुला 

९.ज्याना पेन्शन नको असेल, अशा कर्मचाऱ्यांना एकरकमी देण्याचाही पर्याय सरकारने खुला ठेवला आहे. 

१०. निवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर. 

११. अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय. 

१२. गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय. 

     सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक श्री. विश्वास काटकर यांनी शासनाने सुधारित पेन्शन योजनेबाबत घोषित केलेल्या निर्णयाचे सावधतेने स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने कर्मचाऱ्याच्या संचित १० टक्के अंशदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. निवृत्त होणा-या संबंधित कर्मचान्यास या १० टक्के संचित रक्कमेतून जीवन वेतन म्हणून किमान ६० टक्के परतावा मंजूर करणे न्यायाचे ठरेल. सदर परताव्याची रक्कम मिळविणे ही मागणी पुढील संघर्षास कारणीभूत ठरु शकते. जय संघटना.

मार्च ०६, २०२४

राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना काय आहे?

 

राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना काय आहे?
जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना यांमधील कोणती योजना लाभाची जाणून घेवू.




Old Pension , NPS & New NPS Scheme Diffirence : 


01.निवृत्तीवेतन ( पेन्शन ) : जुनी पेन्शन येाजनांमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50 % रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार पेन्शन दिली जाते , तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांनुसार शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 % रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे , परंतु यांमध्ये कर्मचाऱ्यांचे 10 % योगदान पुर्वीप्रमाणे सुरु असणार आहेत .

02.महागाई भत्ता : जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार DA दिला जातो . तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचे DA लाभ मिळत नाहीत .

03.निवृत्तीवेतनाचे पेन्शन ) नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारे प्रमाण : जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येते , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये पेन्शन ही बाजार मुल्यावर आधारीत असल्याने यांमध्ये पेन्शनची अनिश्चितता असते .

04.वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती : वेतन आयोगानुसार जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांनुसार पेन्शनमध्ये सुधारणा निश्चित आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती लागु नाही .

05.कुटुंब निवृत्ती वेतन / रुग्णता निवृत्ती वेतन : जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये सदर प्रकरणी निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल , तर नविन पेन्शन योजनांमध्ये गुंवणुकीवरील परताव्या नुसार पेन्शन मिळेल , ज्यांमध्ये 0 % हमी असेल .

06.सेवा , मृत्यु व रुग्णता उपदान : जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये हे सर्व लाभ म.ना.सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 मधील तरतुदीनुसार लाभ लागु होतात , परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये हे कोणतेही लाभ लागु होत नाहीत .

07.रजा रोखीकरण : जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये 300 दिवसाच्या रजा रोखीकरण करीता  ( बेसिक + डी.ए ) लाभ अनुज्ञेय राहणार आहे .तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखिल 300 दिवस करीता रजा रोखीकरण ( मुळ वेतन + डी.ए ) लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

08.विमा ( GIS ) : जुनी पेन्शन , राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास 360,000/- रुपये तर विनाअपघात प्रकरणी जमा हप्ता रक्कम + व्याजाची रक्कम मिळते .

जुन्या पेन्शन प्रमाणे अद्याप सुधारित पेन्शन योजनांमध्ये न मिळालेले लाभ

1.भविष्य निर्वाह निधी ( GPF ) : जुन्या पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना जमा रक्कम व त्यावर 8 % व्याज तसेच गरजेनुसार परतावा व विनापरताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये रक्कम वापरणेस मुभा आहे , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये ही सुविधा नाही , तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखिल ही सुविधा नाही .
पण कर्मचारी अंशदान + त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम सेवा निवृत्तीवेळी कर्मचाऱ्याला परत द्यावी अशी मागणी केली जात आहे .

02.निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण : जुन्या पेन्शन योजनांमध्ये 40 टक्के पेन्शन रक्कमेचे नोकरीतील एकुण महिन्यांच्या / कमाल 66 महिन्यांच्या 2 पट अंशराशी करण अनुज्ञेय आहे , तर राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये हा लाभ लागु राहणार नाही

मार्च ०६, २०२४

शाळेत मराठी भाषा सक्ती बाबत

शाळेत मराठी भाषा सक्ती बाबत..👍



महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित भाषा सुत्रानुसार व महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम, सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३ दिनांक ०९ मार्च, २०२० आणि मराठी भाषा विभाग राज्यातील शाळांमध्ये मराठी माषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२० ची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना दिनांक १६ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि  अध्यापन सक्तीचे करण्यात आलेले  असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल २०२० पासून करण्यात येत आहे. वरील अधिनियमाची सन २०२० २१ पासून टप्या टप्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तथापि, कोचिड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२२-२३ च्या आठवीची बॅच २०२३- २४ ला नववी मध्ये व २०२४-२५ ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाच म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतचा निर्णय दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे. सदर सवलत ही फक्त एका बेंचपुरतीच मर्यादित होती, मराठी भाषा विषयाचे मूल्यांकन करताना श्रेणी स्वरुपात करण्याबाबत सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. तथापि, वरील सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

शासन परिपत्रक:- 

1) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्वं व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी खालील निर्देश देण्यात येत आहेत:- 

१. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी,

 2.कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २० २३ च्या आठवीची बॅच २०२३-२४ ला नववी मध्ये व २०२४-२५ ला दहावीला जाइ त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे सवलत दिली आहे. ही सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि  खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि  अध्ययन सक्तीचे आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे श्रेणी स्वरूपात करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या नोंदी संबंधित शाळांनी ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल विभागीय

शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. दिनांक १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतचा सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. सदर सवलतीचा गैरवापर होत असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा लागतो . ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम ४ मध्ये करण्यात आलेली आहे.

2. ज्या शाळेत मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर करावा लागतो . शासनास अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावरुन संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले  असून, त्याचा संकेतांक २०२४०२२८१६२५३१७८२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासननिर्णय

मार्च ०६, २०२४

भारतात वर्ग १ ली प्रवेशाची वयोमर्यादा निश्चिती केंद्र सरकारने ठरवली वयोमर्यादा

भारतात वर्ग १ ली प्रवेशाची वयोमर्यादा निश्चिती केंद्र सरकारने ठरवली वयोमर्यादा  school entry age


         नवीन शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देखील इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निश्चित करण्यात आलेले असून देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये 2024-25 पासून प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्या अनुषंगाने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलाचे वय किमान सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेले आहे.



NEP 2020 अंतर्गत ही वयोमर्यादा प्रस्तावित होती. यावर मागच्या वर्षी देखील चर्चा झाली होती गेल्या वर्षी असेच पत्र पाठवण्यात आले होते आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करून दिलेली आहे की या पत्राची प्रत्येक सरकारने दखल घ्यायला पाहिजे सरकारने शाळांना पत्र लिहून याची माहिती द्यावी तसेच याबाबत सूचना तयार करून त्या लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.




केंद्राने असे म्हटले होते की यांनी एन ई पी अटीनुसार किमान वय सारखे  न केल्याने विविध राज्यातील निव्वळ गुणोत्तराच्या परिणाम होतो

.

NEP 2020 च्या 5+3+3+4 शाळा प्रणालीनुसार पहिल्या पाच वर्षांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटाशी संबंधित प्री स्कूल ची तीन वर्षे आणि सहा ते आठ वर्षापर्यंत वयोगटाशी संबंधित इयत्ता पहिली आणि दुसरी ची दोन वर्षे समाविष्ट आहेत केंद्राने जारी केलेल्या सूचनांमध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्ष वयोमर्यादा स्वीकारण्यात आली आहे.



केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही या आधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडायचा परिणामी अनेकांचे बालपण हरवत असे तसेच विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावर देखील परिणाम होत असे.


याआधी पहिली प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा होती काही राज्यांमध्ये पाच वर्षाच्या मुलाला पहिली प्रवेश दिला जायचा त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण होत असे. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकरी भरतीमध्ये इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरत असत. याचा अर्थ या मुलांना सरकारी भरतीसाठी एक attempt जास्त मिळत असे त्यामुळे गेल्या  वर्षापासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एक सारखी असावी अशी मागणी अनेकांनी केली होती




सोमवार, ४ मार्च, २०२४

मार्च ०४, २०२४

8 मार्च 2024:जागतिक महिला दिनानिमित्तशासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी आदेश जारी

 शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी आदेश जारी

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई यांच्यातर्फे बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी आरोग्य भवन सभागृह, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, मुंबई येथे दुपारी २.०० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 



२. त्यानुसार बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांना वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे. सर्व मंत्रालयीन विभागांनी बृहन्मुंबईतील आपल्या आधिपत्याखालील कार्यालयांना त्याप्रमाणे कळविण्याची व्यवस्था करावी. तथापि या महिला कर्मचा-यांनी सवलतीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येणारी ४.४५ तासांची तूट पुढील आठवड्यात भरून काढावी. 

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३०१११४९३७१३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

शनिवार, २ मार्च, २०२४

मार्च ०२, २०२४

महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये ११ हजार नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली

 Teacher Recruitment महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये ११ हजार नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली


राज्यात गेल्या २० वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा संपूर्ण करण्यात आला आहे.

  गेल्या २० वर्षातील महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा संपूर्ण करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये  मुलाखती वीणा जवळपास ११ हजार नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती झालेली नाही. 

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखती शिवाय व मुलाखती सह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते.


यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखती वीणा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांकरीता उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. मुलाखती सोबत या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘पूर्णपणे पारदर्शक व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया चालू असताना समाज माध्यमांवर उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आली.


या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. 

या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाल्याचे मांढरे यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेमधून निवड झालेले नवीन शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

फेब्रुवारी २७, २०२४

अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासाठी सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला.

अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासाठी सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला.



Employees Earned Leave Government Decision : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जित रजेचे रोखीकरण देय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबतचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित केला आहे, त्यानुसार आता सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेनुसार शिल्लक अर्जित रजेचे रोखीकरण मिळणार आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. 18 (अ) आणि 29 येथे नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांनाच रजेचे रोखीकरण लागू होईल. 18 (अ) माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक (परंतु उपमुख्याध्यापकासह) व्यतिरिक्त कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला संपूर्ण किंवा कोणत्याही रजेचा लाभ घेण्यापासून वंचित केले असल्यास  एका वर्षात संपूर्ण किंवा संपूर्ण भागाचा काही भाग संपूर्ण किंवा संपूर्ण भागाचा भाग एका वर्षात, जरी कायमस्वरूपी कर्मचा-याला मुख्याध्यापकाच्या संपूर्ण अधिकाराचा अधिकार आहे तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढीच अर्जित रजा अनुज्ञेय राहील.
(२९) ज्याला पोट-नियम (१८) च्या तरतूदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती ३०० दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जर असेल तर अशा रजेच्या संदर्भात रजेच्या वेतनाच्या समतुल्य रोख रकमेचा हक्क असेल.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ५ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ वगळण्यात येत आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले होते.

1)अर्जित रजेचे रोखीकरण म्हणजे काय?

"लीव्ह एनकॅशमेंट" म्हणजे न वापरलेल्या पानांच्या बदल्यात दिलेली भरपाई किंवा पेमेंट . कर्मचारी त्यांच्या नोकरीदरम्यान, किंवा सेवानिवृत्त असताना किंवा काम करत असताना, संस्था सोडताना किंवा संस्थेच्या धोरणानुसार कोणत्याही क्षणी त्यांची संचित रजा रोखू शकतात.

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

फेब्रुवारी २६, २०२४

गुड न्यूज! राज्य वेतनस्तरामध्ये सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी; बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय ।

गुड न्यूज! राज्य वेतनस्तरामध्ये सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी; बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय । 7th Pay Commission Pay Matrix

.    

7th Pay Commission Pay Matrix : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत यापूर्वी सुधारणा करण्यात आली होती, मात्र पूर्वीच्या वेतनस्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतनस्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे वित्तविभागाने दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

राज्य वेतन सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी झाले.

राज्य सरकारने राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा  करण्यासाठी शासन निर्णय, वित्त् विभाग, १७ जानेवारी, २०१७ रोजी राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) स्थापन केली होती. सदरहू बक्षी समितीने आपला अहवाल खंड 2 शासनास सादर केला आहे. सदर अहवालातील वेतनश्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्यानिर्णयाबाबतचे आदेश यापूर्वीच शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक १, विवरणपत्रामध्ये - अ मध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशींना शासनाने मान्य करुन ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत. त्या १०४ संवर्गाची एकूण यादी जोडलेली आहे. सदर यादीमध्ये नमूद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात आला आहे व प्रत्यक्ष आर्थिक लाभ १ फेब्रुवारी २०२३ पासून अनुज्ञेय करण्यात आला आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०१६ ते ३१ जानेवारी, २०२३ पर्यंतची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय करण्यात आली नाही. 

बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत

संबंधित १०४ संवर्गातील ज्या Rorige storh e1.99 Lakh अधिकारी/कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार दिनांक १.१.२०१६ रोजी वेतननिश्चिती केल्यानंतर,

 • तसेच ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिनांक १.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर,

 • त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) बक्षी समिती, खंड-२ नुसार शासन निर्णय, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३ अन्वये 

• सुधारित केलेल्या वेतनस्तरात दिनांक १.१.२०१६ रोजी वेतननिश्चिती केल्यामुळे वेतन कमी होत असेल, अशा कर्मचाऱ्यांना म.ना.से. (वेतन) नियम १९८१ मधील नियम १५ नुसार,

जुन्या वेतनस्तरातील त्याची लगतनंतरची किंवा त्यानंतरची कोणतीही वेतनवाढ देय होईल त्या तारखेपर्यन्त किंवा तो ते पद सोडील तोपर्यंत किंवा त्याला त्या समश्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईपर्यंत तो आपले शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ नुसार लागू झालेल्या जुन्या वेतनस्तरातील वेतन घेणे चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सोय त्याला देण्यात येत आहे. (सदर विकल्पाचा नमुना सोबत जोडला आहे.) 


• ज्या अधिकारी/कर्मचारी यांना वरीलप्रमाणे विकल्प देण्याची सोया लागू असेल, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सदर विकल्प दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ आदेशान्वये ३ महिन्यांच्या कालावधीत देण्यात यावा. यानुसार दिलेला विकल्प अंतिम असणार आहे. • मात्र संबंधित १०४ संवर्गापैकी ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बक्षी समितीच्या

खंड-२ नुसार लागू केलेल्या वेतनस्तरात वेतननिश्चिती केल्यामुळे पूर्वीच्या वेतनस्तरात निश्चित झालेल्या वेतनापेक्षा वाढ होत आहे अशा कर्मचाऱ्यांना वरील प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (बक्षी समिती अहवाल खंड 2 अहवाल स्वीकृत शासन निर्णय)

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

फेब्रुवारी २५, २०२४

शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे, काय आहे नवा नियम?

RTE प्रवेश : शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे, काय आहे नवा नियम?



  RTE प्रवेश 2024-25 : आरटीई अंतर्गत कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.  नवीन नियमांनुसार एक किलोमीटर परिसरातील कोणत्याही सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही.

  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते.  हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणून ओळखला जातो. 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा संसदेने मंजूर केला.  या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.  आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने RTE कायद्यात बदल केला आहे.  नवीन नियमानुसार एक किलोमीटर परिसरातील कोणत्याही सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही.

शिक्षणासाठी आरटीई कायद्या मधील बदलांचे लष्करी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.  आरटीई प्रवेश कार्यक्रमात शिक्षण केलेले बदल स्वागतार्ह आहे.  या निर्मीती नंतर राज्य शासन शुल्क प्रतिपूर्ती राज्य शासन घेतात.  आर्थिक क्षमता असून ती अंतर्गत स्वराज्य संस्थांच्या प्रवेशाच्या प्रकारांना आ असे सांगितले जात आहे

शिक्षण हक्क अधिकार महिला आर्थिक व सामाजिक मागास प्रवर्ग राज्य शालेय आरक्षिक राजकीय राजकीय आरक्षित जागांवरील प्रवेश लाभार्थी.  इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते.  एकूण सुमारे एक लाखही जास्त जागृत विद्यार्थी आरटी ऑनलाइन प्रवेश घेतात.  या चौकीच्या शुल्कपूरची राज्य शासन राज्य शासनाला संबंधितांना दिली जाते.  मात्र या शुल्काला सरकारकडून विलंब होत आहे.  तसेच सरकारकडे कोट्यवधींची शुल्कपूर्ती थकलेली आहे.  या निवडी रीतीमध्ये बदल करून राज्य आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
शिक्षणासाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार वंचित आणि दुर्बल घटक ज्यांना विनाअनुदानित राज्यामध्ये प्रवेश केला आहे त्या व्यक्तीच्या विनाअनुदानित राज्याच्या एका लोकसमुदायासाठी शाळा व अनुदान शाळा आहेत, अशी शाळा स्थानिक अधिकार निवडण्यात नाही.  त्याचप्रमाणे आरटीई लायत नियम चारच्या नियमांतर्गत निवडण्यात आलेली पाच सदस्य विनाअनुदानित शाळा कलमे दोन कलमानुसार प्रतिपूर्ती, असे पात्र ठरविण्यात आले आहे.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रपत्रिकांनुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची सूचना राज्याचे उपायुक्त तुषार महाजन यांनी शिक्षण, प्राथमिक शिक्षण संचालक आहेत.

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

फेब्रुवारी २२, २०२४

१२ वर्षानंतर राज्यातील शिक्षकेतर पदांची होणार संचमान्यता

 १२ वर्षानंतर राज्यातील शिक्षकेतर पदांची होणार संचमान्यता


- महाराष्ट्रातिल सर्व अनुदानित व अंशत: अनुदानित तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळजवळ १२ वर्षानंतर संचमान्यता केली जाणार आहे.


शालेय शिक्षणविभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या अनुदानित शाळांमध्ये असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किती रिक्त जागा आणि त्याची वास्तविकता समोर येणार आहे. त्यामुळे या पदांचा आकृतीबंधही तयार होण्याचा रस्ता खुला झाला आहे. तर या निर्णयाचे शिक्षक आमदारांसह सर्व शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे


शिक्षक आमदार श्री. विक्रम काळे, माजी शिक्षक आमदार श्री रामनाथ मोते, शिक्षक आमदार श्री. नागो गाणार यांनी आपल्या काळात राज्यातील अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम यावर वेळोवेळी तत्कालिन सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होतेच.



तसेच शिक्षक परिषद आणि मागील काही वर्षांत महाराष्ट्र राज्य शिक्षकक्रांती संघटनेने पण यासाठीचे वास्तविकता सरकारपुढे मांडले होती. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती.



त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने यासंदर्भात आलेल्या अनेक रिट याचिका व त्यासंदर्भात अर्ज निकाली काढल्याने शिक्षण विभागाकडून आता अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता करण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहेत.



दरम्यान, मागील सरकारच्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी शिपायांची पदेही रद्द करून ती खाजगी कंत्राटदारांच्या मार्फत भरण्याची भूमिका घेतली होती. त्याला तर शिक्षकआमदार विक्रम काळे यांच्यासह अनेकांनी विरोधही दर्शवला होता. मुलींच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी कोणत्याही शाळांमध्ये कंत्राटी‍ आणि बाह्य संस्थेकडून शिपाई भरला जावू नये अशी मागणी त्यांनी लावून धरली हेाती.

मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्यातील सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर पदांची संचमान्यता होणार असल्याने यात शिपाई हे पदही पुन्हा यात सामील करून राज्यातील अनुदानित शाळांना सुरक्षित असे शिपाई हे पदे दिली जावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली.



फेब्रुवारी २२, २०२४

राज्यामधील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय ! |

राज्यामधील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय ! 
Contractual Employees Latest News


Contractual Employees Latest News : राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी सह सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरुन करावयाच्या कार्यवाही बाबत राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय !

राज्यातील कोतवाल, पोलिस पाटील, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका तसेच अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करुन त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी 'एकछत्र योजना' तयार करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एक सचिव समिती गठीत केली होती. सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त समितीने त्यांचा अहवाल एक महिन्यात सादर करावयाचा होता. त्यास अनुसरुन उपरोक्त समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्या मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबधित विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय दि.१८.०३.२०१७ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समितीव्दारे

'एकछत्र योजना' तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे आदेश असल्याने ही समिती  फक्त वरील कारणास्तव स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरही वेळोवेळी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून तसेच लोकप्रतिनिधीं कडून सदर मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या से बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबतची निवेदने संबंधित विभागांकडे प्राप्त होत आहेत. सदर निवेदनांमधील मागण्यांवर निर्णय घेणे, निराकरण करण्याच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय दि.१८.०३.२०१७ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीची कार्याची कक्षा वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या व अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचा सेवा विषयक बाबींवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे राज्यस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे.

 १) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग

 २) अपर मुख्य सचिव, गृह विभाग 

३) अपर मुख्य (महसूल), महसूल व वन विभाग

 ४) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग 

५) प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, 

६) सह/उप सचिव, संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अध्यक्ष सदस्य सदस्य सदस्य सदस्य सदस्य सचिव सदर समितीने मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरुन करावयाच्या कार्यवाही बाबत निर्णय घ्यावा व आवश्यकता भासल्यास उच्चस्तरावर निर्णय घेण्यासाठी आपल्या शिफारशी कराव्यात. असे शासन निर्णय विभागांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरुन करावयाच्या कार्यवाही बाबत निर्णय घ्यावा व आवश्यकता भासल्यास उच्चस्तरावर निर्णय घेण्यासाठी आपल्या शिफारशी कराव्यात. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


शासन निर्णय डाउनलोड करा

फेब्रुवारी २२, २०२४

Mulakshare in marathi।।सुधारित मुळाक्षरे

Mulakshare in marathi।। मुळाक्षरे





अ चे शब्द*
https://youtu.be/KtgyD7dlxwY
आ चे शब्द*
https://youtu.be/xGNp-v68PaM
इ चे शब्द*
https://youtu.be/cuQFZ4IXtJQ
ई चे शब्द*
https://youtu.be/-xUhcTehWAM
उ चे शब्द*
https://youtu.be/ibuAOh-G0P0
ऊ चे शब्द*
https://youtu.be/hS51WGDb2uo
ए चे शब्द*
https://youtu.be/EmSyKG-4_S4
 अॅ चे शब्द*
https://youtu.be/lu42cTwNAJI
*ऐ चे शब्द*
https://youtu.be/0HZ5XdOyWy4
*ओ चे शब्द*
https://youtu.be/CwK_yxbDo2c
 *ऑ चे शब्द*
https://youtu.be/Riehkj-OUqQ
 *औ चे शब्द*
https://youtu.be/W5OlaWVvIcI
*अं चे शब्द*
https://youtu.be/AVdd7Y8xJbE
 *क चे शब्द*
https://youtu.be/XN8o_Sbi8ys
 *ख चे शब्द*
https://youtu.be/qIUfuxB5Iv4
 *ग चे शब्द*
https://youtu.be/ppstFPkw9EY
 *घ चे शब्द*
https://youtu.be/1Nc18JPdKLw
 *च चे शब्द*
https://youtu.be/7t9LKsORgiw
 *छ चे शब्द*
https://youtu.be/M7-_J7SQJo0
 *ज चे शब्द*
https://youtu.be/G_WOb_VbPJ0
 *झ चे शब्द*
https://youtu.be/ioqUxR4e58M
 *ट चे शब्द*
https://youtu.be/oQGAee2BpCM
 *ठ चे शब्द*
https://youtu.be/PkFk2fr_UnY
*ड चे शब्द*
https://youtu.be/ANgPYUcJc44
 *ढ चे शब्द*
https://youtu.be/whtb2Veqzvo
 *ण चे शब्द*
https://youtu.be/lA23bWS_Kiw
 *त चे शब्द*
https://youtu.be/dFgzhuaWf2Q
 *थ चे शब्द*
https://youtu.be/SwzUU2y_alY
 *द चे शब्द*
https://youtu.be/3aP9VVUucx0
*ध चे शब्द*
https://youtu.be/koysyr3QiwM
 *न चे शब्द*
https://youtu.be/wF9kgOSJaa4
 *प चे शब्द*
https://youtu.be/zRilILlOBVU
 *फ चे शब्द*
https://youtu.be/dRJpjphqB_A
*ब चे शब्द*
https://youtu.be/yNysGYvyqtw
 *भ चे शब्द*
https://youtu.be/FdLZ4RDhK4A
*म चे शब्द*
https://youtu.be/SJUQ0Ryia_A
 *य चे शब्द*
https://youtu.be/dk1FYKtTE28
*र चे शब्द*
https://youtu.be/ZdlOOZOR2uQ
 *ल चे शब्द*
https://youtu.be/b4wTTNfMoPw
 *व चे शब्द*
https://youtu.be/X4hxj4tK5ks
 *श चे शब्द*
https://youtu.be/0Ecc6LP1z7Y
 *ष चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *स चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
 *ह चे शब्द*
https://youtu.be/djKs5fVt9FQ
 *ळ चे शब्द*
https://youtu.be/AIqN_erbpDQ
*क्ष चे शब्द*
https://youtu.be/__hHZ53n0_
 *ज्ञ चे शब्द*
https://youtu.be/pz76cHRcfyo

Like, Share and Subscribe my youtube channal
http://youtube.com/c/GodavariTambekar