Teacher Recruitment महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये ११ हजार नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली
राज्यात गेल्या २० वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा संपूर्ण करण्यात आला आहे.
गेल्या २० वर्षातील महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी रात्री उशिरा संपूर्ण करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मुलाखती वीणा जवळपास ११ हजार नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती झालेली नाही.
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार मुलाखती शिवाय व मुलाखती सह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते.
यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखती वीणा पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांकरीता उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. मुलाखती सोबत या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘पूर्णपणे पारदर्शक व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया चालू असताना समाज माध्यमांवर उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे प्रशासनाने उत्तर दिले. तसेच अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते.
या प्रक्रियेदरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीने आणि प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाल्याचे मांढरे यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेमधून निवड झालेले नवीन शिक्षक हे विद्यार्थी घडविण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा