epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ६ मार्च, २०२४

राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना काय आहे?

 

राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना काय आहे?
जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना यांमधील कोणती योजना लाभाची जाणून घेवू.




Old Pension , NPS & New NPS Scheme Diffirence : 


01.निवृत्तीवेतन ( पेन्शन ) : जुनी पेन्शन येाजनांमध्ये शेवटच्या वेतनाच्या 50 % रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार पेन्शन दिली जाते , तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांनुसार शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 % रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे , परंतु यांमध्ये कर्मचाऱ्यांचे 10 % योगदान पुर्वीप्रमाणे सुरु असणार आहेत .

02.महागाई भत्ता : जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार DA दिला जातो . तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचे DA लाभ मिळत नाहीत .

03.निवृत्तीवेतनाचे पेन्शन ) नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारे प्रमाण : जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येते , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये पेन्शन ही बाजार मुल्यावर आधारीत असल्याने यांमध्ये पेन्शनची अनिश्चितता असते .

04.वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती : वेतन आयोगानुसार जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांनुसार पेन्शनमध्ये सुधारणा निश्चित आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती लागु नाही .

05.कुटुंब निवृत्ती वेतन / रुग्णता निवृत्ती वेतन : जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये सदर प्रकरणी निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल , तर नविन पेन्शन योजनांमध्ये गुंवणुकीवरील परताव्या नुसार पेन्शन मिळेल , ज्यांमध्ये 0 % हमी असेल .

06.सेवा , मृत्यु व रुग्णता उपदान : जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये हे सर्व लाभ म.ना.सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 मधील तरतुदीनुसार लाभ लागु होतात , परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये हे कोणतेही लाभ लागु होत नाहीत .

07.रजा रोखीकरण : जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये 300 दिवसाच्या रजा रोखीकरण करीता  ( बेसिक + डी.ए ) लाभ अनुज्ञेय राहणार आहे .तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये देखिल 300 दिवस करीता रजा रोखीकरण ( मुळ वेतन + डी.ए ) लाभ अनुज्ञेय राहणार आहे.

08.विमा ( GIS ) : जुनी पेन्शन , राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास 360,000/- रुपये तर विनाअपघात प्रकरणी जमा हप्ता रक्कम + व्याजाची रक्कम मिळते .

जुन्या पेन्शन प्रमाणे अद्याप सुधारित पेन्शन योजनांमध्ये न मिळालेले लाभ

1.भविष्य निर्वाह निधी ( GPF ) : जुन्या पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना जमा रक्कम व त्यावर 8 % व्याज तसेच गरजेनुसार परतावा व विनापरताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये रक्कम वापरणेस मुभा आहे , तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये ही सुविधा नाही , तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखिल ही सुविधा नाही .
पण कर्मचारी अंशदान + त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम सेवा निवृत्तीवेळी कर्मचाऱ्याला परत द्यावी अशी मागणी केली जात आहे .

02.निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण : जुन्या पेन्शन योजनांमध्ये 40 टक्के पेन्शन रक्कमेचे नोकरीतील एकुण महिन्यांच्या / कमाल 66 महिन्यांच्या 2 पट अंशराशी करण अनुज्ञेय आहे , तर राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनांमध्ये हा लाभ लागु राहणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा