epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, ६ मार्च, २०२४

भारतात वर्ग १ ली प्रवेशाची वयोमर्यादा निश्चिती केंद्र सरकारने ठरवली वयोमर्यादा

भारतात वर्ग १ ली प्रवेशाची वयोमर्यादा निश्चिती केंद्र सरकारने ठरवली वयोमर्यादा  school entry age


         नवीन शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देखील इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय निश्चित करण्यात आलेले असून देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये 2024-25 पासून प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्या अनुषंगाने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलाचे वय किमान सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेले आहे.NEP 2020 अंतर्गत ही वयोमर्यादा प्रस्तावित होती. यावर मागच्या वर्षी देखील चर्चा झाली होती गेल्या वर्षी असेच पत्र पाठवण्यात आले होते आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करून दिलेली आहे की या पत्राची प्रत्येक सरकारने दखल घ्यायला पाहिजे सरकारने शाळांना पत्र लिहून याची माहिती द्यावी तसेच याबाबत सूचना तयार करून त्या लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
केंद्राने असे म्हटले होते की यांनी एन ई पी अटीनुसार किमान वय सारखे  न केल्याने विविध राज्यातील निव्वळ गुणोत्तराच्या परिणाम होतो

.

NEP 2020 च्या 5+3+3+4 शाळा प्रणालीनुसार पहिल्या पाच वर्षांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटाशी संबंधित प्री स्कूल ची तीन वर्षे आणि सहा ते आठ वर्षापर्यंत वयोगटाशी संबंधित इयत्ता पहिली आणि दुसरी ची दोन वर्षे समाविष्ट आहेत केंद्राने जारी केलेल्या सूचनांमध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्ष वयोमर्यादा स्वीकारण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही या आधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडायचा परिणामी अनेकांचे बालपण हरवत असे तसेच विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावर देखील परिणाम होत असे.


याआधी पहिली प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा होती काही राज्यांमध्ये पाच वर्षाच्या मुलाला पहिली प्रवेश दिला जायचा त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण होत असे. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकरी भरतीमध्ये इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरत असत. याचा अर्थ या मुलांना सरकारी भरतीसाठी एक attempt जास्त मिळत असे त्यामुळे गेल्या  वर्षापासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एक सारखी असावी अशी मागणी अनेकांनी केली होती
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा