epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, ४ मार्च, २०२४

8 मार्च 2024:जागतिक महिला दिनानिमित्तशासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी आदेश जारी

 शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी आदेश जारी

जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई यांच्यातर्फे बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी आरोग्य भवन सभागृह, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, मुंबई येथे दुपारी २.०० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २. त्यानुसार बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांना वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे. सर्व मंत्रालयीन विभागांनी बृहन्मुंबईतील आपल्या आधिपत्याखालील कार्यालयांना त्याप्रमाणे कळविण्याची व्यवस्था करावी. तथापि या महिला कर्मचा-यांनी सवलतीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येणारी ४.४५ तासांची तूट पुढील आठवड्यात भरून काढावी. 

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३०१११४९३७१३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा