30 जून-विज्ञान दिनविशेष
★१६६० : ३० जून प्रसिद्ध ब्रिटिश गणिती विल्यम ऑट्रेड यांचे निधन. गुणाकाराचे चिन्ह यांनीच प्रचारात आणले. तसेच टिंग्नामेंट्री मधील साईन, कोसाइन, टॅजेट या संज्ञा सर्वप्रथम यांनीच वापरल्या. (जन्म : ५ मार्च)
★१९१९ : सुप्रसिद्ध ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जॉन विल्यम स्ट्रट रॅले यांचे निधन. यांनी सन १९०८ मधे अॅरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावला. यांना 'द इन्व्हेस्टीगेशन ऑफ द डेंसिटीजऑफ द मोस्ट इंम्पॉर्टटन्ट गॅसेस अॅण्ड डिस्कव्हरी ऑफ ऑरगान' या संशोधन कार्याबद्दल १९०४ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
★१९२६ : (जन्म: १२ नोव्हेंबर) नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ पौल बर्ग यांचा जन्म. यांना 'द फंडामेंटल स्टडीज ऑफ द बायोकेमेस्ट्री ऑफ न्यूक्लिड अॅसिड विथ पर्टिक्यूलर रिगार्ड टू कांबिनंट डीएनए' या संशोधन कार्याबद्दल १९८० सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. ★१९०८: पहाटे आकाशातून एक वस्तू सरसरत आली आणि रशियातील सैबेरिया प्रदेशात असलेल्या तुगंस्का नदीकाठाच्या जंगलात कोसळली. त्या अज्ञात वस्तूचा अवकाशात असतानाच स्फोट झाला. या स्पोटाचे सामर्थ्य हिरोशिम्गवर टाकलेल्या अणुबाँबच्या २००० पट पेक्षाही जास्त होते. या कि.मी. त्रिज्येतील सर्व वृक्ष भूईसपाट झाले.
★१९७१ सोयुझ-११ मधील अंतराळ वीर पृथ्वीवर परत येत असतांना ऑक्सिजन अभावी तिघांचाही हृदयद्रावक अंत झाला.
★२००४ 'नासा' युएसए आणि सतरा देशाच्या मदतीने शनी ग्रहाचा आणि त्याच्या उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी १५ ऑक्टोबर १९९७ रोजी 'कॅसिनी- ह्युजेन्स' हे अवकाशयान पाठविण्यात आले होते. सात वर्षे आणि ३.५ अब्ज कि.मी. चा प्रवास करून हे अवकाशयान ३० जून २००४ रोजी शनीच्या कक्षेत पोहचले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा