29 जून-विज्ञान दिनविशेष
१८१८ इटालियन खगोलशास्त्रज्ञ अँजीलो सेकी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रु.)
१८३३ 'द लॉ ऑफ मास ऑफ अॅक्शन' या सिद्धान्ताचे जनक नार्वेजियन रसायनशास्त्रज्ञ पीटर वॉग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी)
१८६० ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ थॉमस अॅडिसन यांचे निधन. अॅनिमिया रोगावरील यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे असून दुसऱ्या प्रकारचा अॅनिमिया याचे नावानेच प्रसिद्ध आहे. उदरपिंडाच्या रोगासंबंधी संशोधन केले. या रोगासही यांचेच नाव मिळाले आहे.
१८६१ : अमेरिकन शल्यकर्मज्ञ विल्यम् जेम्स मेयो यांचा जन्म (मृत्यू: २८ जून)
१८९० ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांडर पार्किंग यांचे निधन. यांनी (झायलोनाईट) चा शोध लावला. तसेच विद्युतलेपण (इलेक्ट्रोप्लेटींग) संबंधी मौलिक संशोधन केले. (जन्म: २९ डिसेंबर)
१८९३ प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून)
१८९५ : ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ थॉमस हेन्री हक्स्ले यांचे निधन. डार्विन प्रमाणणे यांनीही रॅटलस्नेक या जहाजावरून जगाचा प्रवास केला. (जन्म : ४ मे)
१९९२ : सुप्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ पिटर डेनिस मिटचेल यांचे निधन. यांना 'द बायोलॉजीकल एनर्जी ट्रान्सफर थु द फॉर्म्यूलेशन ऑफ द केमि-ऑस्मिटिक थिअरी' या संशोधन कार्याबद्दल १९७८ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. यांनी 'अॅडेनोसाईन ट्रायफॉस्फीर' नावाचे संयूग शोधून काढले. त्यामुळे प्राणी जीवनातील अनेक समस्यांचा उलगडा झाला. (जन्म: २९ सप्टेंबर)
*१९९५ अमेरिकेच्या शंभराव्या मानवासहित अवकाश उड्डाणाचे निमित्य साधून अॅटलान्टिस स्पेस शटल रशियाच्या मीर अवकाश स्थानकाशी जोडण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा