१५ जून
★१६७१ : इटालियन खगोलशास्त्रज्ञ गायव्हॅनी बेंटिस्टा रीटकॉहली यांचे निधन. यांनी चंद्रासंबंधी संशोधन केले. तसेच सन १६५७ मध्ये मिझर या ताऱ्याच्या संशोधनासाठी दुर्बिणीचा उपयोग केला. (जन्म १७ एप्रिल)
★१८७९ अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ सॅम्यूअल कॉलव्हिल लिंड यांचा जन्म. यांनी इलेक्ट्रोस्कोप तयार केला. तसेच रेडीओ अॅक्टीव्हिटी आणि फोटो केमिस्ट्री या विषयात मौलिक संशोधन केले.
★१९१५ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ थॉमस हकल वेलर यांचा जन्म. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ अॅबिलिटी ऑफ पॉलीमिलेटिस व्हायरसेस टू ग्रो इन कल्चर्स ऑफ व्हेरिएस टाईप्स ऑफ टिश्यू' या संशोधन कार्याबद्दल १९५४ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
★१९७१ सुप्रसिद्ध अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ विंडेल मेरेडिथ स्टॅनले यांचे निधन यांनी संक्रामक सूक्ष्म जीवाणू या विषयी मोलाचे संशोधन केले यांना 'द प्रिपरेशन ऑफ एन्झिम्स अॅण्ड व्हायरस प्रोटिन्स इन प्युअर फॉर्म' या संशोधन कार्याबद्दल १९४६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: १६ ऑगस्ट)
★१७५२ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रैंकलीन यांनी आकाशात चमकणारी वीज आणि इतरत्र आढळणारी वीज या संबंधी फिलाडेल्फिया येथे एक यशस्वी प्रयोग केला.
★१७७४ ब्रिटिश अॅडमिरल सर जॉर्ज एन्सन यांनी आजच्या दिवशी जहाजाने जगाची सफर पूर्ण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा