या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार ।।धृ।।
आईस देव माना वंदा गुरूजनांना
जगी भावनेहुनी त्या कर्तव्या थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मना हा विचार ।।१।।
शिवबांपरी जगात दिलदार शूर व्हावे.
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार ।।२।।
शाळेत रोज जाता ते ज्ञान सिंधू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील मान राखा ठेवू नका विकार ।।३।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा