19 जून-विज्ञान दिनविशेष
१६२३ प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी ब्लासी पास्कल यांचा क्लेरमॉट फेरॉन येथे जन्म (मृत्यू, १९ ऑगस्ट)
१८५१ ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ सिल्व्हॅसन फिलीप्स थॉम्पसन यांचा जन्म.
१८७७ भारतातील नामवंत कृषिशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग चिमणाजी थोरात यांचा (मृत्यू १२ जून) जन्म. यांना १०१ वर्षाचे आयुष्य लाभले शेतीमध्ये डॉक्टरेट मिळविणारे शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राज्याच्या शेती खात्याचे संचालक होणारे पहिले भारतीय होय.
१८९७ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर सिरिल नॉर्मन हिशेलवूड यांचा जन्म (मृत्यू ९ ऑक्टोबर)
१९०१ भारतीय गणिती राजचंद्र बोस यांचा जन्म यांनी प्रसिद्ध स्विस गणिती आईलर यांच्या गणित पद्धतीतील त्रूटी आणि चुका निदर्शनास आणून दिल्या, त्यामुळे गणिती जगात यांचे नांव प्रसिद्ध झाले.
१९०६ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ सर अर्नेस्ट बोरिस चेन यांचा जन्म. (मृत्यू १२ ऑगस्ट)
१९१० नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ पॉल जॉन फ्लोरी यांचा जन्म (मृत्यू ९ सप्टेंबर)
१९२२: नोबेल पारितोषिक विजेते डॅनिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ एजे निल्स बोर यांचा जन्म. यांना 'द डेव्हलपमेंट ऑफ द थिअरी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द अॅटोमिक न्यूक्लिअस' या संशोधन कार्याबद्दल १९७५ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबल पारितोषिक विभागून मिळाले .
*१८४७ स्कॉटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स यंग सिंप्सन यांनी प्रसूतीच्या वेळी गुंगी आणण्यासाठी प्रथमच इथरचा उपयोग केला.
*१९८१ प्रायोगिक भूस्थिर दूरसंचार उपग्रहाच्या निर्मिती कार्यक्रमातील 'अॅपल' हा पहिला भारतीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा