चार पहारेकरी
एक होता राजा. त्याचे खूप मोठे राज्य होते. राज्यातील लोक सुसंस्कृत होते. कोणाचा कोणाला उपद्रव नव्हता, भाडणे होत नव्हती सर्वच भरभराट होती. सर्व प्रजाजन सुखाने च शांततेने नादत होते. त्याच राज्याशेजारी एक छोटेसे राज्य होते. तेथे मात्र प्रजा दुःखी होती, लोकामध्ये नेहमी भांडणे व्हायची; त्यामुळे हा दुसरा राजा त्रस्त झाला होता. दुसरा राजा एकदा पहिल्या राजाकडे आला व म्हणाला, " आपले राज्य एवढे मोठे असूनही सर्वजण कसे गुण्यागोविंदाने राहतात. मला त्याचे रहस्य सांगाल का?" पहिला राजा हसून म्हणाला, "आपले म्हणणे बरोबर आहे. माझ्या राज्यातील सुखसमृद्धीचे व स्वास्थ्याचे कारण माझे ४ पहारेकरी आहेत. ते माझे नेहमी रक्षण करतात" "चारच पहारेकरी | माझ्याकडे तर पहारेकन्याची फौज आहे फक्त चौघामध्ये आपले रक्षणाचे काम कसे काय होते?" दुसन्या राजाने उत्सुकतेने विचारले पहिल्या राजाने त्यावर स्पष्टीकरण केले, “माझा पहिला पहारेकरी आहे सत्य. तो मला असत्य बोलू देत नाही. दुसरा आ प्रेम, तो मला तिरस्कार, व्देष यापासून दूर ठेवतो. तिसन्या पहारेकऱ्याचे नाव आहे न्याय तो माझ्याकडून कुणावर कधी अन्याय घडवून आणत नाही. चौथा पहारेकरी आहे त्याग तो स्वार्थापासून मला वाचवतो. या ४ रखवालदारांमुळे मी व माझी प्रजा आनंदी आहे." दुसरा राजा आनंदाने राज्य कसे करावे, याचे गुपीत ( रहस्य) बरोबर घेऊन स्वराज्यात तसे करण्यासाठी परत निघाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा