epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

मूल्यमापन

                  मूल्यमापन 



एकदा भोजराजाच्या दरबारात एक जण तीन सोन्याच्या मूर्ती विकण्यासाठी आला. विक्रेत्याने राजाला विनंती केली, 'हे राजा, तुझ्या दरबारी खूप गुणवान, विद्वान व चतुर माणसे आहेत असे मी ऐकून आहे. त्यापैकी कोणीही माझ्या या मूर्तीचे योग्य मूल्यमापन करावे. ते ऐकताच दरबारातील एक जवाहीर उठला. त्याने तिन्ही मूर्तीचे वजन केले. ते सारखेच भरले. सोन्याची शुद्धता तपासून पाहिली. सर्व सारख्याच कसाच्या निघाल्या. तेव्हा तो म्हणाला, “तिन्हींची किंमत एकच आहे. कोणीही किंमतीच्या दृष्टीने श्रेष्ठ-कनिष्ठ नाही." विक्रेता हसला. तेव्हा राजाने मूल्यांकनाची कामगिरी कालिदासाकडे सोपवली. कालिदासाने मूर्तीचे सूक्ष्म निरीक्षण करून एक तार घेतली. ती एकीच्या कानात घातली, तर दुसन्या कानातून बाहेर आली. दुसरीच्या कानात घातली तर ती तोंडातून बाहेर आली. तिसन्याच्या बाबतीत ती कानांतून पोटात गेली. बाहेर कुठूनच आली नाही. कालिदासाने आपला निर्णय दिला. “शेवटची मूर्ती सर्वांत मौल्यवान आहे." त्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. काही जण उपदेश एका कानाने ऐकतात; तर दुसऱ्या कानाने तो सोडून देतात, ते कनिष्ठ लोक. काही उपदेश ऐकून फक्त दुसन्याला सांगतात. स्वतः आचरणात आणीत नाहीत ते मध्यम प्रतीचे लोक. जे उपदेश ऐकून तो जीवनात प्रत्यक्ष आणतात म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतात, ते सर्वश्रेष्ठ लोक.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा