epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

आजच्या युवकाचे मनोगत

     आजच्या युवकाचे मनोगत 


   आज आम्हाला दिशाहीन झाल्यासारखं वाटतं! कोणत्याही दिशेला जा, सूर्य उगवतच नाही. कशास भाषा व्यर्थ बोलता एकविसाव्या शतकाची एक विसावा मुळी नसावा व्यथा आजच्या युवकाची 

                     आज भौतिक सुखांची रेलचेल झाली असतानाही आमची उपरोक्त वेदना तीव्रतर होत आहे. श्वसन, भोजन, शयन यापलीकडेही माणसाला काही हवे असते आणि ते म्हणजे समाधान, मनःशांती. पण तीच नेमकी आज हरवली आहे. 'काळजी' हा या काळाचा परवलीचा शब्द बनला आहे. आकाशाला भिडलेल्या महागाईनं आमची झोपच उडवून टाकली आहे. दारिद्रयाची लेऊनी वसने महागाईचा राक्षस करतो कशी पहावी सुंदर स्वप्ने? आयुष्याची उजाड राने...।

                      यात तुम्हा आम्हा सर्वांच्याच वेदना बोलक्या झाल्या आहेत. साऱ्याच वस्तूंचे भाव आपल्या आवाक्याबाहेर जात आहेत. रॉकेल, डालडा गडप होणं हे नित्याचंच झालं आहे, रांगेचं गणित तर रांगता रांगताच शिकायला हवं अशी परिस्थिती आहे. कलियुगान्ती प्रलय होणार म्हणतात त्याचा हा आरंभ तर नव्हे?

                    भ्रष्टाचार हे महागाईचंच भासले तर सर्वात जास्त जंतू भ्रष्टाचाराचे दिसतील. राजकारणी लोक मुरब्बी असोत किंवा आयाराम गयाराम असोत सारखे खुर्चीच्या भोवती फिरताहेत, घंटाखुर्चीच्या खेळासारखे. पण त्यात जीव जातो तो सामान्य माणसांचा. त्यातून निर्माण होते गोवारी हत्याकांड कावेरीचे पाणी, मंडल आयोग, रामजन्मभूमी अशी भुतांची पिलावळ. सीमा तंटे जागवले जातात अस्मितेच्या नावाखाली आणि सहन करावी लागते लोकांना संचारबंदी, झेलाव्या लागतात पोलिसांच्या काठ्या डोक्यावर, पाठीवर, तरीही पकडले जातात आणि अटकेत ठेवले जातात अश्राप जीव, ज्यांचा सीमा तंटयाशी सुतराम संबंध नसतो. काय सीमा वाद, पाणी वाटप वाद, आदिवासी गोवारी वाद या राजकारण्यांना लोकांची डोकी न फोडता सोडवता येत नाहीत?

                          नेते नाकर्ते बनले आहेत, दृष्टिहीन झाले आहेत म्हणून पंजाब, आसाम, काश्मीर हे प्रश्न भिजल्या घोंगड्याप्रमाणे भिजत पडले आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या कळकळी पेक्षा यांची सत्तेची तळमळ अधिक मोठी आहे. सत्तेसाठी लाख लाख रुपये देऊन आमदार, खासदार विकत घेतले जातात आणि ते रुपये मिळवण्यासाठी आमदार खासदार आपले इमान विकून टाकतात.  

                       त्यांची 'स्वीस बँक' जिंदाबाद असते. हिंसाचार, बाँबस्फोट, वासनाकांड ह्या गोष्टी तर भयानकच; पण शेअर घोटाळे, गाळे घोटाळे, हवालाकांड हे त्याहून भीषण आहेत. रोजचे वर्तमानपत्र धडधडत्या हृदयानेच उघडून पाहावे लागते. 'आजचा दिवस बरा' म्हणत 'उद्या काय घडणार' याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून उद्याची वाट पाहावी लागते. 'बळी तो कान पिळी' या न्यायानं गुंडशाही आमच्या छातीवर नाचते आणि दिमाखानं वावरते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक माना खाली घालून बसतात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी बसलेल्या . 

                        जॉर्ज बर्नाड शॉ म्हणाले होते की भारतात मी सर्वोच्च अशा दोन गोष्टी पाहल्या. एक, 'जगातील सर्वात उंच पर्वत हिमालय आणि जगातील सर्वात उंच माणूस गांधीजी ।' कुठं गेली तो माणसांची उंची आजचा जरी रीपेक्षाही खुजा झाला आहे.

                        अशा माणसांनी निसर्गाचा समतोलही बिघडून टाकला आहे. प्रदूषण पसरत आहे निसर्गात आणि माणसातही. कमल पाध्येंच्या 'बंध- अनुबंध' मधील प्रशांत हा नव्या पिढीचा प्रतीक आहे. आईवडिलांचं प्रेम म्हणजे त्यांच्या आकांक्षा मुलांवर लादण्याचा प्रकार असतो असे त्यालावाटते. त्याचे चैतन्य आईवडिलाच्या आकांक्षेत गुदमरते. त्याच्या दृष्टीने आईवडिलांत स्वामित्वाची भावना असते. या वैचारिक संघर्षातून तो जनरेशन गॅप निर्माण करतो. मायेची पाखर व पेटूनायझिंग अटिट्यूड यातील फरकच तो समजूत घेत नाही. जनरेशन गॅपमुळे दोन पिढ्यातील संघर्ष उग्र होत आहे. वृद्धाश्रमाची निर्मिती हा याचाच लाजीरवाणा परिणाम आहे. हुंडाबळी तरुणींचा आक्रोश प्रत्यही कानावर पडत आहे. अत्याचार आणि बलात्कार रोजचेच झाले आहेत. 

                       'मरणात खरोखर जग जगते हे वेगळ्याच अनि खरे ठरू पाहत आहे. पण या भयाण काळोखातही प्रकाशाचा एक लहानसा किरण कुठंतरी दिसतो आहे. बाबा आमटे कुष्ठरोग्यांच्या सेवेत मग्न आहेत. सी. बी. आपने हवालाकांड उजेडात आणून अनेकांना गजाआड केलं आहे. राष्ट्रपतीनं भ्रष्ट राज्यपालाला राजीनामा द्यायला भाग पाडलं आहे. शेषननं निवडणुकीतील भ्रष्टाचार खणून काढला आहे. वाटते यांचे हात मजबूत करावेत, ही परंपरा जोपासावी, यासाठी सर्वस्वाच्या समर्पणाचीही तयारी ठेवावी. हातात मशाल घेऊन पुढे चलावं, पुढे चलावं, आणि गीत गावं - 

 सदैव सैनिका पुढेच जायचे सदा तुझ्यापुढे उभी असे निशा न मागुती तुवा कधी फिरायचे 'सदैव काजळी दिसायच्या दिशा दहा दिशांनी तुफान व्हायचे सदैव सैनिका पुढेच जायचे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा