epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

रामू शेतकरी

              रामू शेतकरी



एक शेतकरी राहत होता. तो भरपूर कष्ट करीत असल्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत असे मळ्यामध्ये हिरवागार भाजीपाला, फळझाडे, फुलझाडेही होती उत्तम प्रकार बीबियाणे वापरून योग्य मशागत केल्यामुळे त्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत होते.उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्याची परिसरात ख्याती होती. त्याच गावातील मंबाजी नावाचा आळशी माणूस रामूवर आणि त्याच्या प्रसिद्धीवर खूपच रामूचे नुकसान यावे. त्याची फजिती करावी अशी काही योजना आखण्यात तो सतत दंग असे. एक दिवस मंबाजीने काही बिया आणल्या आणि रामूला म्हणाला, रामू हे बीज तुझ्या शेतात पेहन त्याचे पीक काढून दाखव, तरच तू खरा शेतकरी आहेस, भी मान्य कौन चाणाक्ष रामूच्या हे सहज लक्षात आले की, मंबाशी आपली खोडी काढण्यासाठी काहीतरी बनवाबनवी करीत आहे. त्याने बियांचे सूक्ष्म निरीक्षण केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की, ह्या कसल्याही बिया नसून बी च्या आकाराचे प्लॅस्टिकचे लहान-लहान तुकडे केलेले आहेत. नंबाजीला चांगली अद्दल घडवावी या हेतूने त्यही समोरच त्या बियाची पेरणी केली. पंधरा-वीस दिवसानंतर मबाजीने चौकशी केली. 'काय रामू काय म्हणतय पीकपाणी? मी दिलेल्या बियांची छान झाडे आले असतीलना? 'हो तर, बत्ता ना? दाखवतो तुम्हाला शेतात शेतात रामूचा इत्साह पाहून माजीला आश्चर्य वाटले. आपण साधे प्लॅस्टिकचे तुकडे रामूला दिले. त्याचे कसले पीक येणार? पण प्रत्यक्षात शेतात गेल्यावर मिरचीसारखी छोटी छोटी झाडे इंगवलेली आणि त्या प्रत्येक झाडावर प्लॅस्टीकचे रंगीबेरंगी चमचे, वाट्या, पेले, छोटया वाटल्या पाहून तोच झाला. आता त्याला रामू हाडाचा शेतकरी आहे हे मान्य करणे भागच पडले विचार करता करता बाजांचा लोभ जागा झाला. रामू सारखेच आठ-पंधरा दिवसात प्लॅस्टोरचे उत्पादन घ्यावे म्हणून त्याने स्वतःच्या शेतात पेरलेला भूईमूग, कापूस, ज्वारी, तूर अशी पिके इपटून टाकली. आणि भरपूर प्लॅस्टीकच्या दिया करून त्या शेतात पेरल्या त्यांना रोज पाणी घालू लागला. आठ-पंधरा दिवसातच काय पण दोन-तीन महिने झाले तरी एकही झाड इगवले नाही. शेवटी कंटाळून तो रामूकडे आता व त्याला म्हणाला, 'काय रे राम मीच दिलेल्या बियांचे तुझ्या शेतात चांगले प्लॅस्टीकचे इत्पन्न निघाले, पण माझ्या शतात तर काहीच नाही. प्लॅस्टीकच्या बियांमुळे माझी जमीन मात्र बंजर झाली गड्या, हे कसे झाले?" मंबाजी, तुम्ही माझी फजिती करण्यासाठी मला प्लॅस्टीकच्या बिया दिल्या होत्या. त्याच वेळी तुमचा येत माझ्या लक्षात आला अहो प्लॅस्टीकला कधी अंकुर फुटतो का? तुमची ही खोडी तुमच्यावरच उलटवा म्हणून मी प्लॅस्टीकच्या वाट्या, पेले, चमचे, ताटल्या आणून झाडांवर अडकवल्या, तुम्हाला ते खरेच पीक वाटले. मला मूर्ख बनविण्याच्या नादात तुम्ही फसतात. आतातरी आळशीपणा सोडा, कष्ट करा आणि बघा तुम्हालाही माझ्यापेक्षा जास्त उत्पादन काढता येईल. 'मबाजी  खजील झाला त्याला स्वतःची चूक कळली. त्याने रामूची क्षमा मागितली व त्याच्या सल्ल्याप्रमाणे शेतीत राबणे सुरू केले. दोघे जीवलग मित्र झाले. मात्र प्लॅस्टीकच्या शेतीची आठवण करून आजही सारा गाव मंबाजीला हसत असतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा