epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १७ जून, २०२४

27 जून-विज्ञान दिनविशेष

                27 जून-विज्ञान दिनविशेष


★१८२२ : ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ योहान ग्रेगर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी) 

★१८२७ : ब्रिटिश संशोधक सॅम्युअल क्रॉम्टन यांचे निधन. यांनी सूत कातण्याच्या मागामध्ये अनेक सुधारणा घडवून एक नवा माग तयार केला. यामुळे कापड विणण्याच्या क्षेत्रात प्रगती घडून आली. (जन्म: ३ डिसेंबर) 

★१८६९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणिशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर)

 ★१८७६ : जर्मन निसर्गशास्त्रज्ञ ख्रिश्चन गॉट फ्राईड एहरेनबर्ग यांचे निधन. 'समुद्राच्या पाण्यातील स्वयंप्रकाशन हे त्यातील सेंद्रिय सृष्टीशी संबंधित असते असे यांनी सिद्ध केले. 

★१८८३ : प्रसिद्ध ब्रिटिश गणिती व पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ विल्यम् स्पॉटिवूड यांचे निधन. यांनी प्रकाशाचे धृवीकरण यासंबंधी यांनी मोलाचे संशोधन केले. काही काळ रॉयल सोयायटीचे अध्यक्ष होते. (जन्म: ११ जानेवारी)

 ★१८९७ : फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ पॉल शुल्झेनबर्ग यांचे निधन. रंग आणि फर्मेन्टेशन क्रिया या संबंधी महत्त्वपूर्ण संशोधन केले. (जन्म : २३ डिसेंबर)

 ★१९५४ सोवियत रशियामध्ये मास्कोजवळ ५००० किलोवॅट क्षमतेच्या रशियातील पहिल्या अणुउर्जा केंद्राची स्थापना झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा