epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

काजीचा न्याय

                काजीचा न्याय 

             खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बगदादमध्ये हमीदुल्ला नामक व्यापारी राहत होता. त्यांचा एक कर्मचारी होता अब्दुल अब्दुलला वाळवंटातून लांबचे प्रवास करण्याची फार आवड होती. हमीदुल्लाने या आवडीचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर रेशम वस्त्र जी अतिशय किंमती होती, दूर-दूरच्या शहरांमध्ये पाठवण्यास विकण्यास सुरूवात केली. तिथे रेशमाला भरपूर किंमत मिळत असे. पाना अद्भुत व्यापाऱ्यांकडून पैसे व आणखी मालाची मागणी घेत असे. अब्दुल मेहनती व ईमानदार असल्यामुळे त्यांच्या व्यापाराची प्रगती दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे हमीदुल्लाने अब्दुलचा पगारही वाढवला. हमीदुल्ला त्याला आपल्या परिवारातील व्यक्तीप्रमाणेच वागवत असे. काही दिवसांनी अब्दुलचे लग्न झाले. त्याची बायको एक दुष्ट स्त्री होती, तिने अब्दुलचे कान भरण्यास सुरूवात केली. सुरुवातीला अब्दुलने तिकडे दुर्लक्ष केले पण नंतर तर लयालाती तसेच वाटू लागले. ती म्हणाली, “खरे कष्टाचे काम जीवावर उदार होऊन तुम्ही करता यावेळी तुम्ही या कामात थोडा बदल करा व आपला माल घेऊन जाऊ आणि दूरच्या एखाद्या प्रसिद्ध शहरातच मुक्काम करू." अब्दुलला ही कल्पना पटली तो माल घेऊन जो गेला तो परत आलाच नाही.सरा नामक प्रसिद्ध शहरात वास्तव्य करून राहिला. अनेक वर्षांनी तो तेथील एक प्रसिद्ध व्यापारी बनला होता हमीदुल्लाने त्याला खूप शोधण्याचा केला अब्दुलचा कुठेच पत्ता लागला नाही. एकदा हमीदुला काही कामानिमित्त बसरा गावात गेला. तेव्हा तिथे त्याला एका दुकानात बसलेला अब्दुल दिसला.अब्दुल्ला पाहुन हमी दुल्लाला खूप आनंद झाला व जवळ जाऊन त्याला म्हणाला, "अब्दुल तू कुठे होतास? मी तुला कुठे-कुठे नाही शोधले?" पण अब्दुल नकार दिला व त्याच्याकडे दुर्लक्ष केले. खरे तर त्याने हमीदुल्लाला ओळखले होते. पण त्याचे मागचे पैसे द्यावे लागतील ह्या भीतीनेच त्याने नाटक केले होते. हमिदुल्लाने अब्दुलला लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न केला पण अब्दुल काही तयार होईना, हमीदुलाला समजले की, याने बेईमानी केली आहे. धोका दिला आहे. म्हणून त्याने काजीकडे जाऊन आपली तक्रार नोंदवली. काजीने दोघानाही बोलावून घेतले पण अब्दुल तिथेही तयार नव्हता. त्यामुळे काजी विचारात पडला व त्याने दोघांना दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अब्दुल जेव्हा काजी कडे येत होता तेव्हा एका म्हाताऱ्याने त्याला वाटेत अडवले व म्हणाला, "मला ओळखले नाहीस? अरे मी रहमत." अब्दुल आणखीनच गोंधळला आधीच तो एका बिकट प्रसंगात होता त्यातून ही नवी कटकट समोर उभी होती. "कोण रहमत ?" अब्दुलने वैतागून विचारले, "अरे तोच कतारमध्ये राहणारा, ज्याला अनेक वर्षांपूर्वी तू बगदादमध्ये उधारीवर रेशीम दिले होतेस, त्याचे राहिलेले उसने पैसे मी तुला द्यायला आलोय मी हजच्या यात्रेला निघालोय, काय माहीत परत येईन. जाण्याआधी कुणाचेही कर्ज ठेवायची माझी इच्छा नाही. अन्यथा मला अल्लाला तोंडही दाखवता येणार नाही. मी तुझ्या मालकाकडे हमीदुल्लाकडे गेलो होतो त्याची अशी समजूत झाली की, तुझ्याबरोबर काहीतरी विपरीत घडले व तू मरण पावलास, त्यामुळे त्यानेही पैसे घ्यायला नकार दिला. पण आता तू मिळाला आहेस." व्याजासहीत ह्या १०० दिनार मोहरा घे आणि मला मोकळे कर. फुकटच्या मोहणाचा मोहरांची हाव सुटली व त्याने त्या मोहरा सर्व काही आठवल्याचा अभिनय करून घेतल्या व तसाच काजीच्या ऑफिसात गेला. गेल्या गेल्या काजीने त्याला पकडण्याचा आदेश दिला. त्याच्या समोर उभा असलेला काजी दुसरा तिसरा कुणी नसून वेषधारी रहमत होता. अब्दुलला त्याने रंगेहात पकडले होते. आता मात्र अब्दुलची बेईमानी अगदी स्पष्टपणे समोर उघडी पडली. काजीने त्याला तुरुंगात टाकले व हमीदुल्लाला त्याचे पैसे परत केले. लोकांनीही काजीच्या न्यायाची प्रशंसा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा