'लाला लजपतराय'

(जन्म २८ जाने. १८६५, मृत्यू १७ नोव्हेंबर १९२८) पंजाबाचा सिंह म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यचळवळीतील धडाडीचे नेते लाला यांचा जन्म पंजाबमधील जगराण (जिल्हा लुधियाना) या गावी लाला राधाकिशन व गुलाबदेवी या दापत्यांच्या पोटी झाला. विशीच्या आतच कायद्याची परीक्षा उत्तीर्ण करून ते लाहोरला वकिली करू लागले. स्वामी दयानंदाचे ते निष्ठावंत अनुयायी असल्यामुळे लाहोर येथे उभारावयाच्या दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजासाठी त्यांनी त्या काळी ५ लाख रूपये जमवून त्या कॉलेजचे काम पूर्ण केले. आर्य समाजाचे अनुयायी म्हणून अनाथ मुले, विधवा, भूकंपग्रस्त व दुष्काळग्रस्त लोकांच्या सहाय्याला धावून जात. १९०५ साली काँग्रेसने त्यांना इंग्ल डमधील लोकाना भारतीयांच्या न्याय्य मागण्यांची व ब्रिटिश सरकारने भारतात चालविलेल्या अत्याचारांची माहिती देण्यासाठी इंग्लंडला पाठविले. त्या वेळी त्यांना खर्चासाठी दिलेले ३००० रुपये त्यांनी आर्य समाजाला देणगी म्हणून दिले व ते स्वतःच्या खर्चाने इंग्लंडला गेले. तिकडून परत आल्यावर पंजाबमधील शेतकऱ्यांना सरकारविरुध्द इठवल्याच्या आरोपावरून त्यांना कारावासाच्या शिक्षेसाठी मंडालेस पाठविण्यात आले. सहा महिन्यांनी त्यांना तुरुंगातून | मुक्त केल्यावर ते परत लाहोरला आले पण त्यांच्या पाठीशी लागलेल्या सरकारी हेरांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते अमेरिकेस गेले व तिथे असलेल्या | भारतीयामध्ये स्वदेशाच्या स्वातंत्र्याची लालसा निर्माण करण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' हे वृत्तपत्र काढले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी 'सायमन कमिशन' लाहोरला भेट द्यायला गेले असता त्याच्या निषेधार्थ हाती काळे झेंडे घेतलेल्या लोकांचा जो मोर्चा निघाला त्याचे नेतृत्व लालाजींनी केले. त्यात भयंकर लाठीमार बसल्याने लालाजी आजारी पडले व त्यातच त्यांचे निधन झाले. मॅझिनी, गॅरीबाल्डी, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज यांची | स्फूर्तीदायी चरित्रे जशी पंजाबी भाषेत लिहिली तशीच 'अॅनहॅपी इंडिया' ‘ग इंडिया' वगैरेसारखी इंग्रजी पुस्तकेही त्यांनी लिहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा