epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस

          'नेताजी सुभाषचंद्र बोस'

           नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे प्रख्यात वकील होते सुभाषबाबू एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेले होते कलकत्याला बी. ए. ची पदवी घेतल्या नंतर वडिलांच्या इच्छेनुसार ते आय सी एस होण्यासाठी इंग्लंडला गेले. ही पदवी धारण केल्यानंतर सरकारी नोकरी करावी लागणार म्हणून ते सनद न घेताच भारतात परतले. आणि राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. या चळवळीत त्यांना आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. सन १९३८ व १९३९ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. परंतु महात्मा गाधीशी तात्विक मतभेद झाल्याने त्याना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांना इंग्रज सरकारने त्याच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. परंतु देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असल्याने ते गुप्तपणे तेथून निसटले व काबूलमार्गे जर्मनीला पोहोचले इंग्रजांचा शत्रू हिटलर त्याचे म्हणावे असे सहाय्य न मिळाल्याने ते पाणबुडीचा खडतर व धोकादायक प्रवास करून जपानला पोहोचले. जपान सरकारचे सहाय्य मिळवून त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हंगामी | आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जपानने युध्दबदी केलेल्या ४० हजार भारतीय सैन्याची त्यांनी आझाद हिंद सेना उभारली व ब्रम्हदेशातील | आराकान टेकड्यांच्या मार्गाने या सेनेने आसामधील इम्फाळपर्यंत मजल मारली तरीही ऑगस्ट १९४५ मध्ये जपानला दोस्त राष्ट्रापुढे शरणागती पत्करावी लागली. जपान सरकारशी चर्चा करण्यासाठी सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमानाने निघाले असता फोर्मोसा बेटाजवळ त्याच्या विमानाला अपघात झाला व त्यात त्याचे निधन झाले त्यांचे ब्रीदवाक्य 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा' हे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा