epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बिरबल व न्हावी

                बिरबल व न्हावी



      - बिरबल हा अकबर बादशहाच्या दरबारातील चतुर मंत्री दरबाराचा तो प्राण समजला जाई. त्याच्या चतुर बुध्दीमुळे तो अकबर बादशहाचा सर्वात आवडता झाला होता. बादशहा कोणतेही काम बिरबलच्या सल्ल्यानेच करीत असे. हे मात्र बिरबलाच्या विरोधकांना खपत नव्हते. या दरबारातून बिरबलला कायमचे काढून टाकावे हे विरोधकांचे बिरबला विषयीचे विचार होते. बिरबलला काढण्यासाठी त्यांनी बरेच षडयंत्र रचले, पण बिरबलच्या चातुर्यासमोर ते बाद झाले बादशहाची आपल्या पित्यावर अपार अशी निष्ठा होती त्याचे पिता स्वर्गवासी झालेले होते. बादशहाची आपल्या पित्यावर निष्ठा आहे. या संधीचा फायदा घेवून बिरबलाला दरबारातूनच नाही तर, दुनियेतून कायमचे काढता येते. अशी युक्ती विरोधकाना सुचली. त्यानुसार त्यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली. बादशहाचा दरबार भरला नियोजनानुसार विरोधक न्हावीबुवा बादशहा समोर मुजरा घालून हजर झाला व म्हणाला, 'शाह पनाह, मला रात्री स्वप्नात आपल्या वडिलांशी संवाद घडला हे ऐकून बादशहा अत्यंत आनंदीत झाले. पुढे सांगण्यास सांगितले तेव्हा न्हावी बुवा सांगू लागले, 'हुजूर त्यांना आपल्या दरबारातील बिरबलाची फारच आठवण येत आहे. बिरबलाशिवाय त्यांना जराही करमत नाही. त्यांना वाटत बिरबलाची एकदा भेट व्हावी भेट न झाल्यास ते फार दुःखी होतील. आता काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा. यावर बादशहा म्हणाले, 'त्याची काहीच काळजी करून नका, होळी करून त्या होळीत बिरबलला टाकले म्हणजे जळल्यानंतर बिरबल आमच्या पित्याला जरूर भेटेल' ही युक्ती बादशहा बरोबर बिरबलालाही मान्य होती. बिरबल फारच चतुर त्याने होळीच्या खाली तळघर खोदले, तो दिवस उजाडला बिरबल होळीवर जावून बसला व होळी पेटविण्यात आली. बिरबल ताबडतोब होळी खालील तळघरात शिरला. दरबारातील इपस्थितांना हेच वाटले की, बिरबलचा जळून अंत झाला. बिरबलच्या मरणावर त्याचे विरोधक आनंद लुटत होते . बिरबलाचा कायमचा काटा काढण्याचा आनंद त्यांना झाला होता. या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले होते. अचानक दरबारात बिरबल हजर झाला बादशहाला व बिरबलच्या चाहत्यांना आनंद झाला मात्र विरोधकांनी तोंडात बोटे गेली व दातखीळीच बसली. बादशहा खुप होऊन वडिलांची हकीकत विचारू लागला. यावर बिरबलने सांगीतले, 'घाबरण्यासारखे काही नाही. आपल्या पित्याची दाढीच फार वाढली आहे. दाढी लावण्यास एखादया न्हाव्याला पाठवून द्यावे म्हणून म्हणाले, हे ऐकून न्हावी अर्धमेला झाला बादशहाने त्याच न्हावी बुवाला दाढी लावण्यासाठी जाण्याचा हकूम दिला, ज्या पध्दतीने बिरबल पाठविण्यात आले. बिरबल सारखी न्हावीबुवाची चतुराई कसली जसी होळी पेटवली तसाच न्हावी बुवा जळून मरण पावला व सर्व हेच समजून बसले की, न्हावीबुवा दाढी लावण्यास गेला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा