epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

परिवर्तनशील जिजाऊ

          परिवर्तनशील जिजाऊ 



     निजामशहाचे पहिल्या दर्जाचे सरदार असलेले लघुजीराव जाधव सिंदखेडला राहत. त्यांची तहानगी लाडकी लेक जिजामधूनच केव्हा तरी दरबारात जाई व पित्याच्या मांडीवर बसून त्याला नाना प्रश्न विचारीत राही. एकदा असा प्रकार झाला की, परकर पोलक्यातली चार-पाच वर्षांची जिजा आपल्या वडिलांसंगे रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबाराला गेली होती त्याच दरबाराला लखुजींच्या हाताखालचा एक सेनाधिकसी मालोजी भोसले हाही मर्दानी पोषाखातील आपल्या आठ-नऊ वर्षांच्या मुलाला म्हणजे शहाजीला घेऊन गेला होता. त्या लहानच्या मुलामुलीची दृष्टिभेट होताच, सी दांचे एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळू लागली. ते दृश्य पाहून लखुजी जाधव दरबारी मंडळींना म्हणाले, "कसा छान जोडा शोभून दिसतो आहे नाही? तखुजी हे वाक्य सहज बोलून गेले, पण त्यांचे ते वाक्य पटक पकडून मालोजी भोसले दरबारातल्या मानकच्यांना उद्देशून म्हणाले, "ऐकलेत ना मानकन्यानो, लखुजीरावानी तुम्हा सर्वांसमक्ष माझे व्याही होण्याचा मला शब्द दिला आहे. " दरबारात पडलेली ही गोष्ट बिजाची आई म्हाळसाबाई हिच्या कानी जाताच ती पतीवर कडाडती, “आपण अगदीच 'हे' कसे? मालोजी भोसले हे जरी राजस्थानातल्या सुप्रसिद्ध शिसोदिया घराण्यातले असले, तरी काही झाले तरी ते आपल्या हाताखालचे नोकर आहेत ना? मग आपली सोन्यासारखी जिजा त्यांच्या मुलाला देण्याची भर दरबारात घोषणा करायची? शिर्के, निंबाळकर, महाडिक यांच्यासारख्या आपल्या तोडीस तोड असलेल्या एखाद्या शिवनेरीवर सरदाराचा मुलगा पाहायचा सोडून, हाताखालच्या नोकराच्या मुलाला मुलगी देण्याची एवढी घाई आपल्याला का झाली?" पत्नीचे हे म्हणणे लखुजीरावांनाही पटले व ते पडल्या 'प्रमादा' वर पडदा पाडायला पाहू लागले पण मालोजी इरेस पेटले. त्यांनी स्वतःच्या पराक्रमावर निजामशाहीत 'पंचहजारी' पटकावून पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या गावांची जहागिरी मिळविली व 'राजा' हा किताबही मिळविला. ते गढ़ अनेक देवळे, तलाव स्वखर्चाने बांधून त्यांनी नावही कमाविले. त्यानंतर निजामशहाकडून लखनवर वजन आणून त्यांनी आपला पुत्र शहाजी याचा सच्या जिजाशी विवाह घडवून आणला व आपला हेतु तडीस नेता जिजा माहेरी असतानाच घोड्यावर बसणे, अचूक राहू लागले. रु नेमबाजी करणे, लिहिणे, वाचणे इत्यादीत तरबेज झालेली असल्याने, तसेच अत्यंत बुद्धिमान असूनही सुस्वभावी असल्याने ती मालोजीची आवडती सून होती. पुढे इ.स. १६२० मध्ये निजामाच्या बाजूने शत्रूशी लढत असता मालोजी कामी आले. त्यांच्यानंतर निजामशाहीत किलायी जागा शहाजीराजांनी मिळविली. निजामाच्या दरबारी ते दिवसेंदिवस वर वर येऊ लागले व त्यांचे वर्चस्व वाढू लागले, त्यांच्यात व सासरे लखुजी जाधव यांच्यात स्पर्धा सुरु झाली. अखेर लखुजी जाधव हे निजामाला सोडून मोगलांना जाऊन मिळाले. सासरा जावई यांच्यात लढाया झाल्या, पण प्रत्येक वेळी शहाजीराजांनी निजामाची बाजू पण एकदा मोगलांचे सरदार म्हणून निजामशाही मुलुखावर चालून आले. शहाजीराजांनी पराक्रमाची शर्थ केली, पण मोगलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपला टिकाव लागेल असे वाटेनासे होताच त्यांनी फोडून पळ काढला. जिजा गरोदर असल्याने तिला आपल्या बरोबरीने धावपळ करायला लावणे धोक्याचे आहे व तिला पित्याकडून धोका होणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन शहाजीराजांनी तिला शिवनेरीवर पाठविले व स्वतः दूरबर निघून गेले जिजाला शिवनेरीवर पोहोचते केले गेल्याची बातमी लागताच लखुजी जाधव तिकडे गेले व लेकीला चळवळून म्हणाले, "बेटी अग तू सध्या दोन जिवाची आहे. अशा स्थितीत व तून नसताना तू या गडावर एकटी राहू नकोस. तू माझ्या माहेरी चल." यावर बाणेदार जिजा म्हणाली, माझे पती माझे रक्षण करू शकले नाहीत तर मी इथे एकाकी मरेन, पण तुमच्या आश्रयाला येणार नाही." संकटात सापडली असतानाही जिजाबाईने प्रत्यक्ष पित्याला असे बाणेदार इतर देऊन परत पाठविले आणि थोड्याच दिवसांनी या शिवनेरीवासी महाराष्ट्रमातेच्या उदरी राष्ट्रपुरुष शिवप्रभु जन्माला आले. हीच जिजाऊ प्रखर परिवर्तनशील होऊन राष्ट्रमाता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा