epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

थोर अश्रू

                  थोर अश्रू



 'लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने तेच खरे सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपडाव, लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे आई घगळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चागली. रात्री निजण्याचे आधी आघोळ झाली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व घोडीवर जाऊन बसलो आघोळीची एक मोठी घोड होती. आघोळीचे पाणी तोंडलींच्या वेलास जात होते. संध्याकाळची आघोळ, तिला फारसे पाणी लागत नसे, आईने खसखसा अग चोळून दिले. इरलेले पाणी मी अगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारु लागलो. 'आई' अंग पूस माझे आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ' मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस' आई तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग इडी मारीन आई म्हणाली, हट्टी आहेस हो शाम अगदी. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही ? मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो, आई निराजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम ! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस !" तसाच | मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला साग शुध्द बुध्दी दे म्हणून. गड्यानों ! किती गोड शब्द ! आपले शरीर आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, , बूट स्वच्छ रहावे म्हणून बुटपुश्ये आहेत, अगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्याचे प्रयत्न आहेत, परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तुपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी ? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान निराळा. ते थोर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा