epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

आईचा आत्मत्याग

       आईचा आत्मत्याग


 :- आज अत्यंत भावस्पर्शी गोष्ट लिहावीशी वाटली 'त्याच्या' आईला एकच डोळा होता. तो शाळेत शिकत होता त्याची आई गवत कापून विकत असे तसेच छोट्या-मोठ्या वस्तू विकून घरचा खर्च भागवत असे. तो आईचा राग करीत असे. एकदा त्याच्या शाळेत श्रमदानाचा दिवस होता. मित्रांसोबत जाताना त्याची आई गवत कापताना दिसली. त्याला कसेतरीच वाटले. सर्व मित्र चिडवायला लागले, 'एका डोळ्याची आई, एका डोळ्याची आई त्याला आईचा अधिकच राग आला. घरी येवून तो आईला मोठ्याने म्हणाला, तुता एकच डोळा का आहे? या जगातून तू नाहीशी का नाही होत? सर्व मित्र मला हसतात." आई त्याला काहीच बोलत नाही. त्याला थोडं मनातून बां वाटतं का की आपण आपल्या आईला बोलून तर टाकल. त्याची आई त्याला कधीच शिक्षा करत नसे. त्यामुळे आईला आपण कधी वाटत नसे, रात्री तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी तो उठला तर त्याची आई कोपन्यात आवाज न करता एका डोळ्याने रडत होती. रडण्याच्या आवाजाने तो झोपेतून उठू नये यासाठी त्याने आईकडे रागाने बघितले पाणी प्याले आणि परत झोपी गेला. त्याने मनाशी ठरवले आपण खूप मेहनत करू मोठे होऊ कारण त्याला गरिबीचा आणि त्याच्या आईचा राग होता. त्याने खरच खूप मेहनत केली. आईला एकटं सोडून मुंबईला विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले. लग्न केले. स्वतःच घर केलं. त्याला एक मुलगी झाली तो स्वत:वर खूष होता. मुंबईबर खूप होता. कारण इथे त्याची आई नव्हती. एक दिवस अचानक दार उघडून पाहतो तर त्याची आई पुढे होती. त्याची लहान मुलगी घाबरून धावत घरात गेली. त्याला तर आभाळच कोसळले की काय असं क्षणभर वाटलं. त्याने जोरात तिला म्हटलं, कोण आहेस तू.. ? मी तुला ओळखत नाही. माझ्या मुलीला तुला बघून भीती वाटली. इथून लगेच चालती हो. ते ऐकून ती म्हणाली, माफ करा, मी चुकीच्या पत्यावर आले. त्याने देवास आभार मानले की आईने त्याला ओळखले नाही. एक दिवस त्याच्या शाळेतून पत्र आले. सर्व माजी विद्यार्थ्यांच्या गॅदरींगबद्दल. तो बायकोला खोट सांगतो की बिझनेसच्या कामासाठी दोन दिवस बाहरेगावी जातो आणि शाळेच्या गॅदरींगसाठी जातो. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाल्यावर त्याच्या लहानपणीच्या घरी तो जातो. त्याला त्याची भाई थंड जमिनीवर मरून पडलेली दिसते आणि तिच्या हातात एक कागद असतो ते त्याच्या आईने त्याला लिहिलेले पत्र असते. माझ्या लाडक्या मुला, माझं आयुष्य मी पूर्ण जगले. मी मुंबईला परत कधीच येऊ शकणार नाही. पण तू इथे येऊन मला एकदा भेटावं असं माझं मला मागणं पण खूप आठवण येत आहे. तू इथे शाळेच्या कार्यक्रमासाठी येत आहेस कळल्यावर मला खूप आनंद झाला. पण मला फक्त एकच डोळा असल्याने मी शाळेत न येण्याचं ठरवलं. कारण त्यामुळे तुला खाली पाहण्याची वेळ आली असती. हे बघ जेव्हा तू लहान होता तेव्हा तुझा अॅक्सीडंट झाला होता. तुझी आई म्हणून मी " एका डोळ्याने तू मोठा होताना कसे पाहू शकणार? म्हणून मी माझा डोळा तुला दिला. माझ्या बाळा मला तुझा खूप अभिमान वाटतो की माझ्याऐवजी माझ्या डोळ्याने तू सगळं नवीन जग पाहतो... तू जेव्हा जेव्हा माझ्यावर रागावला मला कधीच वाईट वाटले नाही. कारण तू माझ्यावर प्रेम करतो. मला अजूनही तुझे लहानपण आठवते. मला तुझी खूप आठवण येते. तूच तर माझ्यासाठी जग आहे. तो कोसळतो... खूप खूप रडतो... त्याच्या आईसाठी जी पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी जगली... तिच्यापुढे सदैव नतमस्तक राहतो. → चिंतन परिश्रम करण्याची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते. जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर अखंड परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. आळस, निरुत्साह या दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे विज्ञानाच्या क्षेत्रात विविध शोध लावणारे संशोधक, शास्त्रज्ञ तसेच उद्योग विश्वात आपला ठसा उमटविणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, जमशेदजी टाटा आदि महापुरुषांनी केलेल्या अखंड परिश्रमांनी त्यांच्या आयुष्याचे सोने केले. मित्रहो, ईश्वराजवळ प्रार्थना करून आपल्या आईवडिलांना सर्व त्यांच्या मनाप्रमाणे मिळो.. भरभरून प्रेम... काळजी... सर्वकाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा