epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

अंतरंग दर्शन

                  'अंतरंग दर्शन



कथा आहे सूफी संप्रदायातील सत स्त्री राबियाची एका वेगळ्याच प्रवृत्तीची. अशा फार कमी झाल्या आहेत या जगात ती आपल्या पर्णकुटीत राहात असे प्रातः प्रार्थना करीत असे, तिच्या परात - झोपडीत एक मुसलमान फकीर राहात होता नाव होते हसन, देवाचा लाडका व मोठा वैराग्यशील साधू, सकाळ झाली होती. अरुणोदयाची गुलाबी झाला पूर्व क्षितिजावर पसरली होती. सूर्यर्थिय येत होते. पक्ष्यांची मधुर किलबिल सुरु झाली होती. मोठी सुंदर गोड प्रभात होती. हवेत विलक्षण हसत विलोभनीय मुखद गारवा पसरला होता. फकीर बाहेर आला. त्याने ते प्रभातकालचे सौंदर्य पाहिले. त्याने राबियाला जोरात हाक मारली, राधिया। अग झोपडीत काय बसली आहेस? परमेश्वराने एक अतिसुंदर प्रभातला जन्म दिला आहे. पक्ष्यांचे मधुर संगीत आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांचा झिरमिरीत जाल पडदा पसरला आहे. बाहेर ये. पहा हे सौंदर्य! आत काय बसून राहिली आहेस?" राबिया खळखळून हसली आणि म्हणाली "हसन, अरे असा किती वेळ बाहेर राहणार आहेस? दूच आत ज्या परमात्माने ही सौंदर्यशाली पहाट पढविली, तो परमात्माच इथं माझ्यापुढे उभा आहे. सकाळ सुंदर आहेच पण ज्याने ती निर्माण केली पहा प्रभातकालीन सूर्यबिंदू तर प्रेक्षणीय आहेतच. त्याचे किरणजातही आकर्षण आहे. पण, ज्याच्या आशेवरून तो सर्व ब्रह्माद्धाला प्रकाश देतो तो परमात्मा पहा र आहे. तू पक्ष्यांचे संगीत ऐकतो आहेस पण त्याना मधुर कंठ देणारा परमेश्वर अल्लाह त्याचे गीत मी ऐकत आहे. तोच त्या सुंदर पक्ष्यांच्या कंठात जाऊन बसला आहे. पण इथे माझ्या समोर उभा ठाकला आहे. माणसाची ही दोन प्रतिके आहेत. एक बाह्य सौंदर्यावर मोहित होतो तर दुसरा आंतरिक सौंदर्याचा भोक्ता असतो. चंद्राचे प्रतिबिंध निर्मल जलाशयात पढते ते पाहून एक प्रसन्न होतो. तर शरद पौर्णिमेचा वा वैशाखी दुसरा शरद पौर्णिमेचा प्रत्यक्ष चंद्र पाहून प्रसन्न होती. मुडौल, सडपातळ शरीर, कमलासारखे नेत्र, चाफेकळी नाक, आजानुबाहू, मलमली रेशमासारखे केस, बलदंड शरीर आदि सौंदर्याची बत्तीस लक्षणे असणारा श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर, गौतमबुद्ध यासारखे धोर महात्म्ये त्याच्या बाह्य व अंतरग सौंदर्यामुळे जगात प्रसिद्ध होते व आहेत. पण मनुष्य जन्माला आल्यापासून डोळ्यांना दिसू लागल्यापासून बाहेरच पाहत असतो. तो अंतरंगात कधी डोकावतच नाही. सत्य कधी अनुभवतच नाही. जेव्हा ते सत्याचे दर्शन घडते तेव्हा माणूस परमात्म्याचे रूप ओळखतो. सुंदर नाक पन शेंबडाने सडवडते. कमलनयनातूनही चिखल दिसतो. कानातील मळाने कान ठणकू लागतो. पंचपक्वानांचा फन्ना पाडल्यानंतर पोटातील रासायनिक क्रियांनी त्यांचे काय बनतेर सुंदर बासमती तादळातील बिर्याणीत जेव्हा आपल्या प्रियतमेचाच केस सापडतो तेव्हा त्या बियांणीची सारी लज्जतच नाहीशी होते ना? दर्शन कितीही मनोहारी दिसले, कल्पनारम्य वाटले तरी सत्य दर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. तो ब्रह्मानंद देत राहतगातून प्रत्येक क्षणाला एक संवेदना जाणवते. बाह्य दर्शनाचे तुकडे तुकडे होत जातात. आणि त्या सूक्ष्म संवेदनातून अंतरंगाचे सत्य स्वरूप दिसू लागते. मनातील विकार बासना, राग, लोभ, अहंकार, द्वेष, सूडाची भावना इ. दुर्गुणांचा नाश होऊ लागतो, प्रेम, बंधुता, दया उदारता, मानवता, सत्यता, संयम इ. सद्गुणांचा विकास होऊ लागतो. कल्पना, स्वप्ने, आशा, अपेक्षा, निराशा इ. पूर्णविराम मिळतो. जीवनातील अंतर्दशे दिव्य अनुभूती येऊ लागते. तो रामकृष्ण परमहंस बनतो. 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' पिकलेल्या फळाप्रमाणे अहंकार गळून पडतो.. . तेव्हाच ब्रह्मानंदाची अनुभूती •

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा