epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

पु. ल. देशपांडे

                  पु. ल. देशपांडे 


अवघ्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांचे अवये भावविश्व त्यांनी समृद्ध केले. बालगंधवानंतर प्रचंड लोकप्रियता आणि प्रेम लाभलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व, पु.तच्या परिवारातले याचे निस्सीम चाहते आणि मित्रपरिवार त्यांना 'भाई' ह्या लाडक्या नावाने पुकारत अशा ह्या भाईना बाबूल म्हणून हाक मारण फक्त त्यांची आईच होती. आपल्या ह्या दिग्विजयी मुलाबद्दल एकदा ती गमतीने म्हणाली होती की, राम गणेश गडकरी यांच्या मृत्यूनंतर न महिन्यांनी आमचा बाबूल जन्माला आला. पु. लं. चे वडील सतत फिरतीवर असायचे. त्यामुळे पु. ल. च्या भोवती भोवती आईच असायची. आपल्या आईच्या कुशीत छोटा बाबूत झोपायचा तेव्हा आई अंगाईगीते म्हणायची. पु.लं. च्या आईचा आवाज खूर मधुर आणि निर्मळ होता. तिला वाटायचे की लेक झोपला. म्हणून ती गाणे थांबावायची. तेव्हा छोटा बाबूत आईला म्हणायचा, 'आई, धांबलोस का.. 'आणखी म्हण ना...।' आपल्या ह्या लेकाला गाण्याची आवड आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या आईने एक सुंदर बाजाची पेटी आपल्या लाडक्या लेकाला आणून दिली होती. पु.ल. देशपांडे यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई पु.लं. चे भाग्य असे की त्यांना आपल्या आईचा प्रदीर्घ सहवास लाभला. पु.लं. च्या षष्ठ्यब्दीला आणि पंचाहत्तरीला त्यांची आई हजर होती हे पु.ल. देशपांडे यांचे महदभाग्य' पु.ल. देशपांडे यांची आई एक व्युत्प आणि रसिक व्यक्तिमत्व होते. गणपतीची पूजा प्राणप्रतिष्ठेसह करणारी ही आई अनेक वेळेला पूजा सांगण्यासाठी जात असे. त्या जुन्या काळात पु.लं. च्या आईचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. आपल्या मुलाला गाण्याची विलक्षण आवड आहे हे लक्षात आल्यावर कण्यांचा फोनो दिने मागवला. थोडक्यात काय महाराष्ट्रावर आणि मराठी संस्कृतीवर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणान्या पु.लं. देशपांडे एका अजब रसायनावर पु.ल. च्या आईने लहानपणी खूप छान संस्कार केले मुलांनो, तुम्ही पु. ल. देशपांडे यांचे साहित्य वाचून काढा विशेषतः त्यांनी लिहिलेली अ व्यक्तिमत्वे वाचून काढा. त्यातून तुम्हाला हे व्यक्तिमत्व कसे पडले हे कळेल. एक लक्षात घ्या की एवया मोठ्या कलावंताची आपण आई आहोत हे सुख 'पु.लं.' नी आपल्या आईला आपल्या कर्तृत्वाने दिले, हे कधी आपण विसरता कामा नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा