epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

साने गुरुजी

           साने गुरुजी 

         (आईचे उपकार



            आई देह देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. आई माझा गुरु आई तिचे उपकार कसे मी विसरु ? माझ्यात जे काही चांगले आहे. प्रेमळपणे वागायला बोलायला विचार करायला तिने मला शिकवले. क्षमाशीलता हे सारे आईचे देणे, कोंंड्याचा मांडा करून कसा खायचा आणि दारिद्रयातही स्वत्व तत्त्व न गमावता कसे वागावे हे तिने घटना प्रसंगातून शिकवले. आईची स्मृती आळवून तिचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन" साने गु  "श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसच मनाला पण घाण लागू नये म्हणून जप हो, देवा सांग शुद्ध बुद्धीची आई. राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यास लागलेल्या सानेगुरुजींनी मुलांवर विलक्षण प्रेम केले. कारण त्यांना एक खात्री होती की, मुलेच हे विश्व सुंदर बनवतील आपण मुलांना प्रेम दिले तर हे विश्व सर्वच मुले प्रेमाने भारून टाकतील असा गुरुजींचा विश्वास होता. आईवर विलक्षण प्रेम करणाऱ्या साने गुरुजींनी आपल्या आईविषयी असे उद्गार काढले होते की, "आई माझा गुरु आई कल्पतरु 'श्यामची आई' या आपल्या पुस्तकात गुरुजींनी आईविषयक भरभरून लिहिले आहे. त्यांच्या आईने श्यामवर म्हणजे साने गुरुजींवर असे प्रेम केले की ते आईचे वात्सल्य गुरुजींमध्ये सहजपणे उतरले. साने गुरुजी अमळनेरच्या शाळेत नजरेने से सर्व मुलांकडे पाहत ते नेहमी मुलांना म्हणत, "मुलांनो, तुम्ही फुलांसारखे आहात. फुल जसे स्वतः आनंदी राहून सर्व जगाला आनंदी करतेतसे तुम्ही स्वतः आनंदी रहा आणि संपूर्ण विश्वाला आनंदी करा. साने गुरुजी मुलांना नेहमी सुंदर सुंदर गोष्टी सांगत असत त्यांचे मनोरंजन करीत. त्यांनी मुलांना स्वावलंबनाचा धडा दिला. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. ते मुलांना नेहमी एक गोष्ट सांगत की, "आपल्याला देवाने दोन हात दिले आहेत ते सदैव सेवेसाठी राबायला हवेत. आपल्याला देवाने वाणी दिली आहे. त्या वाणीच्या माध्यमातून आपण सुंदर आणि केवळ सत्याने बोलायला हवे आणि आपल्या हृदयात सर्वाविषयी प्रेमच उचंबळून यायला हवे. मुलानो ही त्रिसूत्री तुम्ही प्रामाणिकपणे पाळा. तुमचे आयुष्य आनंदाने भरभरून जाईल. मुलांनो हे सारे का सांगितले तर साने गुरुजींनी मुलांवर आणि समाजावर आईसारखे प्रेम केले. जसे मत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो तसे साने गुरुजी माऊली स्वतः होते हे प्रथम जाणून घ्या. त्यासाठी त्यांचे चरित्र वाचा, खरे सांगू का ? अलीकडच्या काळातला हा संत पुरुष होता. सच्चा निष्काम कर्मयोगी पुरुष होता..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा