epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

सत्याला मरण नाही

          'सत्याला मरण नाही' 



      गोष्ट कबीराच्या काळातील आहे. कदाचित कबीराचीही असेल पण कधीर शेले विणत असे पण हा कोष्टी कांबळी विणत होता मरिना जातीच्या मेंढ्यांची उत्तम लोकर तो काबळी विणायला वापरी कबीराचे दोहे, भक्तीगीते गात तो कावळी विणत असे. सत्य हा त्याचा परमेश्वर होता नेहमी प्रामाणिकपणे धंदा करी त्याच्या मालात जराही भेसळ नसे. एकदा त्याने एका सावकाराला दोन कांबळी विकत दिल्या सावकार म्हणाला दोन दिवसांनी पैसे घेऊन जा. लोकाना दाखविण्यासाठी धर्मकर्म करणारा तो माणूस होता कपाळावर टिळा लावी, हातात जपमाळ घेऊन बसे नेहमी लाडीलबाडी करून व्यापार करी दोन दिवसानंतर तो कोष्टी आपल्या काबळ्याचे पैसे मागायला गेला सावकाराच्या मनात कपट होते त्याला कांबळ्याचे पैसे द्यायचे नव्हते सावकार म्हणाला, "बाबा र माझ्या घरात एकदम आग पेटली. त्यात ती दोन्ही काबळी जळून गेली. आता पैसे कसले मागतोस?" कोष्टी म्हणाला, "अस होणंच शक्य नाही मी सच्चाईने धंदा करतो सत्याला कधी मरण नाही. त्याला आग कधीच लागत नाही. " कोष्ट्याच्या खाद्यावर एक कांबळे होते. ते त्याने सावकाराच्या पुढे केले व म्हणाला, “हे घे माझे कांबळे लाव त्याला आग नि जाळून दाखव. सावकार म्हणाला, "माझ्या काबळ्यानजीक रॉकेलचे डबे होते." कोष्टी म्हणाला, "या कांबळ्यावर रॉकेल ओत नि मग आग लाव" दोघाचा बाद सुरु झाला की बघ्यांचा तमाशा जमतो वादविवाद, भांडणतंटे कोणी सोडविण्यासाठी पुढे येत नाही पण तमाशा पाह्यला बरेचजण तोंड उघडे टाकून तिथे उभे राहतात. इथेही तसेच घडल. सर्वांच्या देखत सावकाराने कांबळ्यावर रॉकेल ओतले व आग लावली. कांबळी पेटली लोकाना वाटले, आता कांबळी जळून जाणार! पण तेल जळून गेले कांबळी तशीच राहिली लोक पाहातच राहिले कोष्टी म्हणाला, "साँच को आँच नाही' सावकाराने मान खाली घातली. मुकाटपणे घरात गेला. कोष्टाच्या कांबळ्यांचे पैसे आणून दिले, खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सत्याला कधीच आरडा ओरडा करावा लागत नाही सत्याचे मौनच प्रभावी ठरते. सत्य हा एक संस्कार आहे प्रभावी मंत्र आहे तो जपल्याने आत्मशुद्धीबरोबर मनाची विशालता वाढते. ते निर्मल होते आणि निर्भयतेने जगात वावरते ते एक सूर्यप्रकाशाइतकेच स्वयंसिद्ध मूल्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा