epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

ताराबाई शिंदे

                ताराबाई शिंदे 



जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका बुद्धिमान, कर्तृत्ववान स्त्रिया सर्व काळात सर्व संस्कृतीत दिसून येतात; परंतु तरीही सामान्य स्त्रीचे स्थान पुरुषांच्या तुलनेत सर्वत्र दुय्यम मानले गेले. आधुनिक विज्ञान व यंत्रयुगाचा हृदय (औद्योगिक क्रांती) यांमुळे उत्तरोत्तर स्त्री-स्वातंत्र्याला अनुकूल असा काळ येऊ लागला २० व्या शतकाच्या इतरार्धात 'माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ज्ञानबुद्धिमत्ता या बाबींन असाधारण महत्त्व आले आहे. शरीरसामर्थ्यात स्त्री-पुरुषांत फरक असला, तरी बुद्धिमत्तेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा प्रचंड बुद्धिमान असल्याचे आढळले. त्यामुळे २१ व्या शतकात स्त्री-मुक्ती, स्त्री-पुरुष समानता ही ध्येये गाठणे अधिक सोपे जाणार आहे. या निमित्ताने थोडे पाहू या जगातील स्त्री-मुक्तीची वाटचाल : फ्रेंच राज्यक्रांतीच्या पूर्वसंध्येस माक्विंस डी' कॉण्डॉरसेट या फ्रेंच तत्त्वज्ञाने स्त्रियांच्या मतदान हक्काचा पुरस्कार केला. मेरी बॉलस्टोन क्राफ्ट या ब्रिटिश लेखिकेने आपल्या 'एव्हिडिकेशन ऑफ द राइटस ऑफ वुमन' (१७९२) या पुस्तकात स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. १८७० मध्ये इंग्लंडमध्ये स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश मिळू लागला. १९ व्या शतकात इंग्लंड व अमेरिकेत स्त्रियांना संपत्तीविषयक अधिकार मिळाले. एलिझाबेथ स्टॅण्टन व सुसान बी अॅन्थनी या दोघींनी अमेरिकेत स्त्रियांच्या मतदान हक्काचा पुरस्कार केला त्या देशात १९२० मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. इंग्लंडमध्ये एमेलिन पॅन्खर्स्ट आणि तिच्या ख्रिस्ताबेल व सिल्व्हिया या दोन मुली यांनी स्त्रियांच्या मतदान हक्कासाठी आपल्या 'विमेन्स सोशनल अॅण्ड पो (टिकल युनियन' या संघटनेतर्फे लढाऊ आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर १९१८ मध्ये प्रथम ३० वर्षांच्या ब्रिटिश स्त्रियांना मताधिकार मिळाला व नंतर १९२८ मध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. फ्रान्स व इटलीत अनुक्रमे १९४७ व १९४८ मध्ये आणि १९७१ सालात स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला. डॉ. अॅनी बेझंट (१९ वे शतक) व पुढे मेरी स्टोप्स (२० वे शतक) यांनी इंग्लंडमध्ये संततिनियमनाचा पुरस्कार केला. मादाम सिमॉन डी 'बूव्हा' या फ्रेंच लेखिकेने आपल्या 'द सेकंड सेक्स' (१९४९) या ग्रंथाद्वारे स्त्री-मुक्तीचा विचार नव्या जोमाने जगापुढे मांडला. १९७५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून करण्यात आले. त्यानंतर भारतासह सर्व देशांत स्त्रियांच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळू लागला आहे. १९९८ मध्ये बीजिंग (चीन) येथील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीविषयक प्रश्नांचा सर्वांगीण विचार करण्यात आला आणि यावेळी सर्वत्र चर्चिले गेले, भारतातील ताराबाई शिंदे यांचे नाव. तेव्हा भारतही खडबडून जागा झाला आणि ताराबाई शिंदे यांचा शोध घेऊ लागला. ताराबाई शिंदे यांचे जगातील नामवंत स्त्रियांमध्ये पहिली स्त्रीवादी लेखिका (स्त्री-पुरुष तुलनाकार) म्हणून अग्रक्रमाने नाव घेतले जाते. ताराबाई शिंदे या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचा जन्म जानेवारी झाला, तर मृत्यू १९१० मध्ये झाला. त्यांच्यावर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. १८८२ १८५०ला मध्ये त्यांनी 'स्त्री पुरुष तुलना' हा ५० पानांचा निबंध लिहिला आहे. आजही एम्. ए. च्या अभ्यासक्रमात तो समाविष्ट आहे. या निबंधात त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचे अत्यंत प्रभावी प्रतिपादन केले आहे. समता, बुद्धिनिष्ठा, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार केला तर बालविवाह, केशवपन, जातिप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद, अनिष्ठ रूढी-परंपरा, जाचक चालीरीती यांसारख्या प्रथांना विरोध केला असून, स्त्री अस्तित्व व स्त्री स्वातंत्र्यावर त्यांनी भर दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा