epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

रमजान

                          रमजान 

इस्लामी कालगणनेनुसार नववा चांद्रमास. याच रमजान महिन्यात पवित्र कुराणाचे अंशतः प्रकटीकरण होण्यास सुरुवात झाली. इस्लामी पंचकर्मविधानांपैकी रमजानचा  उपवास हे एक कर्मविधान होय. या महिन्यात उषःकालापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक उपवास  पाळण्याबद्दल स्पष्ट आदेश आहे.  रमजान 'उष्ण दगडा'ला म्हणतात. या  महिन्यास रमजान या कारणास्तव म्हणतात, की या महिन्यात पाप जळून जाते. या महिन्यात परलोकाची चिंता व उपदेशाच्या उष्णतेमुळे मने प्रभावित होतात; ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे वाळवंट व दगड गरम होऊन जातात,  नेमका त्याचप्रमाणे वरील प्रभाव होतो. रमजान शब्दाची व्युत्पत्ती 'रम्ज'या शब्दापासून झालेली आहे. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसास रम्ज म्हणतात. या महिन्याचे तीन खंड

(विभाग) आहेत : आरंभी कृपा-खंड, | मध्ये क्षमा-खंड आणि शेवटी मोक्ष खंड. या महिन्यात पावसाप्रमाणे | परमेश्वराची कृपा व क्षमेचा वर्षाव होत असतो आणि नरकाग्नीपासून सुटका होऊन मोक्षप्राप्ती होते. प्रेषित मूसा ला दिल्या गेलेल्या तौरेत वा तोरा नामक दैवी ग्रंथात रमजानला 'खत' असे संबोधिले गेले आहे आणि याचा अर्थ 'अपराध दूर सारणारा' असा आहे. प्रेषित ईसा (येशू ख्रिस्त) याच्या इंजील (बायबल) मध्ये 'ताब' म्हणून उल्लेख आहे. याचा अर्थ अपराधापासून शुचिर्भूत करणारा असा आहे. प्रेषित | दाऊदच्या जबूर (डेव्हिड्स साम्स) मध्ये 'कुर्बिया' अर्थात बरकत देणारा असा त्याचा अर्थ आहे. देवदास अपराधापासून शुद्ध होऊन त्याच्या बरकतीमुळे त्यास ईशसामिप्याचा लाभ होतो. एकूण एक दैवी ग्रंथ याच | महिन्यात अवतरितझालेले आहेत.

 रमजान सर्व महिन्यांत श्रेष्ठ महिना आहे. या महिन्याची एक रात्र हजार महिन्यांहून अधिक चांगली असते. या महिन्यातले महिनाभरचे उपवास ईश्वराने (अल्लाहने) अनिवार्य ठरविले आहेत. हा संयम पाळण्याचा महिना आहे आणि संयमाचा मोबदला स्वर्ग होय. हा सदाचरणाचाही महिना आहे. दिवसभर अन्न-जल वर्ज्य, धूम्रपान निषिद्ध, अभद्र भाषण टाळावयाचे व पवित्र कुराणपठणात निमग्न रहायचे इ. आचार सर्व मुस्लिम स्त्रीपुरुषांना | सारखेच बंधनकारक आहेत; मात्र गर्भवती वा तान्हे मूल असलेल्या वमासिक पाळीत असलेल्या स्त्रिया; रुग्ण व प्रवासी यांना मात्र या नियमांत थोडीफार सूट मिळू शकते. या महिन्याच्या सत्ताविसाव्या तारखेस 'लैलतुलकद्र' म्हणजेच मंगलप्रदात्र येते. सदरहू 'कद्र'ची रात्र पुण्यप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते. त्या रात्री आगामी वर्षाच्या प्रत्येक व्यवस्थेसाठी देवदूत हे आपल्या पालनकर्त्यांच्या आज्ञेने भूतलावर उतरतात. ती अभय व शांतीची रात्र पुण्य व समृद्धीसाठी अरुणोदयापर्यंत असते. ह्या पवित्र मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली. मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली जातात तसेच ह्या मासात श्रद्धेनेउपवास (रोजा) पाळणारास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांची परमेश्वर क्षमा करतो. या महिन्यात उर्मट सैतानास जखडून ठेवले जाते. 'रमजान' या अरबी शब्दातसमाविष्ट असलेल्या पाच  वर्णाक्षिरांवरून त्याचा महिमा पुढीलप्रमाणे स्पष्ट होतो : परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश यासर्व गोष्टींचा समावेशक म्हणजे पवित्र रमजान मास होय.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा