epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, ६ जून, २०२४

10 जून -विज्ञान दिनविशेष

 10 जून -विज्ञान दिनविशेष



१० जून (जागतिक दृष्टिदान दिवस) 

सन १९२४ हा डॉ. के भालचंद्र यांचा जन्मदिवस हे एक महान शल्य चिकित्सक होते. यांनी अंधाच्या दुःख निवारणासाठी आपले आयुष्य वेचले शक्य तितक्या अंधांना दृष्टिदान करणे हेच आपले जीवनध्येय मानले. यानी आपल्या हयातीत ८०,००० व्यक्तींचे अधत्व दूर केले म्हणून याचा जन्म दिवस हा दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करतात

१८३६  : 'इलेक्ट्रोडायनॅमिक्सशास्त्र शाखेचे जनक' फ्रेंच गणिती व तत्त्वज्ञ अँड्री मारी अँम्पीअर याचे निधन यांनी अत्यंत गरिबीशी संघर्ष करून शिक्षण घेतले लोहचुंबक व विद्युतप्रवाह या संबंधी मोलाचे संशोधन केले. यांच्या कार्याच्या सन्मानार्थ विद्युतप्रवाहाच्या परिमाणास 'अॅम्पीअर' हे नाव देण्यात आले. (जन्म: १२ जाने)

१८५८: स्कॉटिश वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्राऊन यांचे निधन रसायनशास्त्रातील 'ब्राऊनिंग गती' याच्याच नावे प्रसिद्ध आहे यानी वनस्पतीच्या २००० विविध जाती जमा करून मौलिक संशोधन केले. (जन्म २१ डिसेंबर)

 १९०३ : इटालियन गणिती लुईगी क्रेमॉना याचे निधन यानी गणिताच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडवून आणले. (जन्म ७ डिसेंबर) १८५८ 

१८१४: वाहतुकीच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणून रेल्वे इंजिनचा उल्लेख करावा लागेल. इ.स. १८१४ मध्ये जॉर्ज स्टिफन्सन यानी लोहमार्गावरून धावणारे वाफेचे इंजिन तयार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा