epranali

This is educational blog.

Res

Breaking news

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

शीलं परम् भूषणम्

       शीलं परम् भूषणम्



                   इफ मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट 

शिकवले जाते. डॉ. आंबेडकरही आपल्या 'विद्यार्थ्यांनो जागृत व्हा!' या लेखात म्हणतात की शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. विद्या असून शील नसेल तर ती माणसे खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करतील. “लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अथवा फसवाफसवी करू शकणार नाही. आणि म्हणूनच शिकल्यासवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकलेसवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे." वकील किती शिकलेले असतात. म्हणूनच ते खोट्याचे खरे करू शकतात. यातून गुन्हेगारीला उत्तेजन मिळते. 

                    पुराणकाळी एक पुण्यश्लोक राजा होता. तो आपल्याला वरचढ होऊ नये म्हणून इंद्र त्याच्याकडे भिक्षुकाचे रूप घेऊन आला. इंद्राने त्याला भिक्षा मागितली. त्याने रत्ने, माणिक, मोती व सोनेनाणे दिले. पण भिक्षुक इंद्राने त्यातले काहीही घ्यायचे नाकारले. राजा म्हणाला 'भिक्षुका' तुला काय हवे आहे? भिक्षुक म्हणाला, 'मी मागेन ते तुम्ही द्याल असे मला वचन द्या, तरच मला हवे ते मी मागेन.' राजाने वचन दिले. भिक्षुक म्हणाला, 'राजा, मला तुझे शील दे.' राजाने त्याला आपले शील दिले. लगेच एक तेजःपुंज पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर पडला. त्याच्या तेजाने सारा दरबार थक्क झाला होता. 'तू कोण आहेस?'राजाने विचारले. तो म्हणाला मी तुझे शील आहे. आता मी तुला सोडून चाललो आहे. 'तेवढ्यात आणखी एक सूर्यासारखा दीप्तिमान पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर आला. राजाने विचारले. कोण आहेस? म्हणाला, 'मी सत्य आहे. जेथे झील जातो तेथेच मोही जात असतो. लगेच राजाच्या शरीरातून चंद्रासारखा शांत प्रकाश असलेला तिसरा पुरुष बाहेर पडला. तो म्हणाला, 'राजा, मी धर्म आहे. सत्यामागून मीही जात असतो.' मग एक विलक्षण भरदार पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर आला. त्याने राजाला सांगितले की तो विवेक आहे आणि धर्माच्या पाठोपाठ तोही जात असतो. नंतर तलवारीच्या धारेसारखा पाणीदार पुरुष बाहेर पडला. डोळे दिपून जावेत असे त्याचे तेज होते आणि त्याला चार भुजा होत्या. तो म्हणाला, 'मी पुरुषार्थ आहे. विवेक जाईल तेथे मीही जात असतो.' यानंतर सुवर्णकांतीची अत्यंत लावण्यवती स्त्री बाहेर आली. तिने सांगितले, 'राजन' तू आपले शील दिलेस. शीलापाठोपाठ सत्य, धर्म, विवेक, पुरुषार्थ आणि मी लक्ष्मीही जात असते.

                      म्हणून पैसा गेला तर काहीच गमावले नसते आरोग्य गेले तर काहीतरी गमावले असते पण शील गेले तर सारे काही गमावले असते! असे शिकवण्यात येते.

                        शील म्हणजे चारित्र्य, चित्तशुद्धी, संस्कार प्रेम, सहानुभूती, नीतिशीलता इत्यादी सदाचार होत. कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून संबोधणारे छत्रपती शिवाजीमहाराज चारित्र्यसंपन्न म्हणजे शीलवान होते.

                         चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्प तया .. आवडेल जीवां जीवाचिये परी सकळा अंतरी एक भाव 

असे चित्तशुद्धीचे मर्म सांगणारे तुकोबा शीलवंत होते. गांधीजी शीलवान होते कारण लोकमान्य टिळकांनी गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म सांगताना म्हटले आहे की 'सत्यावरील व न्यायावरील निष्ठा इतकी तीव्र होती की स्वतःच्या किंवा आपल्या बायकामुलांच्या सुखासुखाचा, बलाबलतेचा विचारही मनात न आणता मनुष्य आपले कर्तव्य करण्यास झटदिशी प्रवृत्त होत. ज्याला मानसिक धैर्य, खरी सत्यनिष्ठा किंवा सात्विक शील आणि दानत म्हणतात ते हेच होय.'

                    पण आज अगदी विपरीत घडले आहे. शील गेले तर काहीच गमावले नाही पण पैसा गेला तर सारे काही गमावले असे दृश्य दिसत आहे. कारण पैशाने शील विकत घेता येते शीलाने पैसा विकत घेता येत नाही असे प्रसंग पदोपदी आढळून येत आहेत.

                     हवालाकांडाने हेच सिद्ध केले आहे ना पैशापायी शिक्षक पेपर फोडतात न्यायाधीशही न्याय फिरवितात. शिरवाडकरांनी याचे मोठे मार्मिक चित्रण केले आहे. ते म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे चुकीचे असून पृथ्वी पैशाभोवती फिरते हेच खरे होय. आज प्रत्येकजण पैशामागे लागलेला आहे. कारण पैसा असेल तर शिक्षणासाठी अॅडमिशन घेता येते, पैसा असेल तरच नोकरी मिळवता येते, पैसा असेल तरच निवडणूक लढता येते, जिंकता येते, पदही मिळवता येते. निष्ठादेखील पैशाने बदलता येते. त्यामुळे आज शील म्हणजे पैसा असे समीकरण होऊ पाहत आहेत व या अर्थाने 'शीलम् परम् भूषणम्' हे तत्त्व अधिकाधिक लोकप्रिय व लोकमान्य होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा