epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

सावित्री वंदना

        सावित्री वंदना



 सावित्री आमुची, विद्येची देवता 

ओवाळू आरती, आराध्य देवता ॥ धृ ॥ 

आहे सरस्वती, आहे तू शारदा 

आम्हास दिधली, ज्ञानाची संपदा

 'वाचू तुझ्या कथा, गाऊ तुझ्या गीता 

सावित्री आमुची . .

 वाटे सदा उभी, आहेस पाठीशी 

उपकार गे तुझे, बांधीन गाठीशी 

वटवृक्ष तूच गे, आम्ही तुझ्या लता 

सावित्री आमुची ...........॥२॥ 

स्त्री जातीला जगी, आहेस प्रेरणा 

आई स्विकार तू, माझी ही वंदना 

काळोख संपतो, दिपज्योती लावता

 सावित्री आमुची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा