epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

बडबडगीते

                                 उंदीरमामा आणि मनीमावशी



 - ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग 

ऐकू आली फोनची रिंग

 - कुणीच नाही फोनपाशी

 उंदीरमामा बिळापाशी ! 

उंदीरमामा हसले मिशीत, 

टेबलावरती चढले खुषीत 

- फोन लावला कानाला 

जोरात लागले बोलायला

 - " उंदीरमामा मी इकडे ; 

कोण बोलतय हो तिकडे ? 

- विचारले मामानी झटकन 

उत्तर आले की पटकन 

" मी तुमची मनीमावशी, 

कालपासून आहे उपाशी."

 - मनीमावशी भलती हुषार, 

कन मामा बिळात पसार !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा