epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

महात्मा गांधी

           महात्मा गांधी 

  (Mahatma Gandhi) 

          महात्मा गांधी हे जगात त्यांच्या चार उत्कृष्ट गुणांमुळे ओळखले जातात ते म्हणजे अहिंसा, सत्य, प्रेम आणि बंधुभाव त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे या गुणांच्या साहाय्याने नेतृत्व केले. ते भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात.             मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधीचे पूर्ण नाव होय. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्याचे वडिल एका प्रांताचे अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. हायस्कूलमध्ये असताना त्यांचे लग्न कस्तुरबा गांधींशी झाले.

         तरुण मोहनदास यांनी जेव्हा राजा हरिश्चंद्राच्या आयुष्यावरील नाटक पाहिले तेव्हा तो अतिशय प्रभावित झाले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. १८९३ मध्ये ते भारतात परतले आणि वकिल म्हणून कारकीर्द सुरू केली त्यांनी नेहमीच गरीब आणि खऱ्या लोकांना पाठिंबा दिला नंतर ते दक्षिण आफ्रिकेला गेले.            दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ब्रिटीश मूळ अफ्रिकन नागरिकांना आणि भारतीयांना चूकीची वागणूक देतात असे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध लढाई सुरू केली. त्यांना स्वतःला अनेकवेळा अपमान सहन करावा लागला त्यांनी तेथे सत्याग्रहाची सुरुवात केली.          जेव्हा गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांचा संबंध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी आला आणि लवकरच ते एक महत्त्वाचे नेते बनले आपल्या देशातल्या देशबांधवांच्या हक्कांसाठी लढणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांचा अहिंसेवर ठाम विश्वास होता आणि त्यांनी स्वातंत्र्य लढाई ही शांततापूर्ण मार्गानेच लढली. समाजातील कमकुवत घटकांसाठी आणि स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. त्यांच्या ब्रिटीश मुक्त भारताच्या लढाईसाठी त्यांना अनेकवेळा जेलमध्ये जावे लागेल. शेवटी भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. 

      गांधीजींनी प्रत्येकाकडून अपार प्रेम आणि आदर मिळाला. त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने 'बापू' म्हणून संबोधत. गांधीजी एक धार्मिक व्यक्ती होते. त्यांची प्राथना ते कधीही चूकवत नसत आणि नेहमी देशातल्या लोकांमध्ये बंधुभाव राहावा म्हणून प्रार्थना करीत. ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या झाली. नवी दिल्ली येथे त्यांचे समाधीस्थळ आहे ज्याला अनेक लोक भेट देतात. ܀܀܀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा